निसर्गाचे बदलेले चक्र
संपादकीय पान गुरुवार दि. २६ नोव्हेंेबर २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
निसर्गाचे बदलेले चक्र
गेल्या दोन वर्षात एकूणच निसर्गाचे चक्र बदलले आहे असेच दिसते. दोन दिवसांपूर्वी पुण्यात पडलेला अवकाळी पाऊस पाहता अजून पावसाळा संपलेला नाही की काय अशी शंका वाटावी, एवढा धो-धो पाऊस कोसळला. सोमवारी पहाटे पुण्यात चक्क ९६ मि.मी. पाऊस कोसळला. या पावसामुळे पुणे पाण्याखाली गेले. अनेक भागात गुडघाभर पाणी होते. पुण्याच्या जोडीला नाशिक, अहमदनगर, उत्तर कोकणाला पावसाने झोडपले. मराठवाडा आजवर दुष्काळाने ग्रासला होता. मात्र काही भागात पडलेल्या या पावसामुळे मराठवाड्यातील जनता सुखावली. बीड जिल्ह्यात तुरळक प्रमाणात गारपीट झाली. अर्थातच त्यामुळे अनेक भागात पिकाचे नुकसान झाले. विदर्भ व मराठवाड्यात या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रायगड जिल्ह्यातही अनेक भागात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने कापलेले भात व मळण्यांमध्ये शिरलेले पाणी यामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर सध्या कडधान्य पेरणीचे दिवस असल्याने कडधान्ये ओली झाल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे. या वर्षी पावसाने अनिश्चितीतता दाखविल्यएानेे भाताचे पीकाचे अपेक्षेएवढे आलेले नाही. असे असले तरीही शेतकर्यांनी आलेले पीक मोठ्या उत्साहाने जपून ठवले होते. मात्र अवेळी आलेल्या या पावसाने मोठा घात केला. अनेक ठिकाणी भाताच्या मळण्या शेतात रचून ठेवल्या होत्या, तर काही ठिकाणी अजूनही कापणी सुरुच आहे. मात्र गेले तीन दिवस दररोज संध्याकाळी पावसाने हजेरी लावल्याने भातशेती भीजली व नुकसानीला सामोरे जावे लागले. भात कापणी झाल्यावर शेतकरी पावटा, उडीद, तूर या कडधान्याची पेरणी करण्यास सुरुवात करतो. ही पेरणी गेल्या काही दिवसात सुरु झाली होती. पेरलेल्या या कडधान्यांमध्ये पाणी शिरल्याने हे पीक कसे काय टिकणार अशी शंका आहे. एकीकडे कडधान्याचे नुकसान तर दुसरीकडे भाताचे झालेले नुकसान असा दुहेरी फटका यावेळी बर्याच शेतकर्यांना बसण्याची शक्यता आहे. अशा शेतकर्यांना सरकार नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे. परंतु सध्याचे अकार्यक्षम सरकार कसली नुकसान भरपाई देणार अशी चिंता लागून राहिली आहे. सध्या निसर्गराजा आपल्यावर खरोखरीच कोपला आहे की काय अशी शंका वाटावी, कारण गेल्या दोन वर्षात अवकाळी पाऊस पडून त्यामुळे होणारे नुकसान ही नित्याची बाब झाली आहे. बरे नुकसान भरपाईच्या नावाने सरकारची बोंबच आहे. नेहमी नोव्हेंबर महिना सुरु झाला की थंडीला सुरुवात होते व डिसेंबरच्या सुरुवातीलाच छान गुलाबी थंडीची चादर सर्वत पसरलेली असते. परंतु नोव्हेंबर महिन्यात पडलेला पाऊस आणि तो देखील तुफान पाऊस पडण्याची ही अलिकडच्या काळातील पहिलीच घटना ठरावी. गेले दोन ते तीन वर्षे पाऊस हा जून महिन्यात सुरुच होत नाही व पार ऑक्टोबर पर्यंत चालतो. त्यातच अवकाळी पावसाची उपस्थितीत ही तर नित्याचीच झाली आहे. एकतर मराठवाडा, विदर्भातील शेतकरी दुष्काळाच्या वातावरणाने मेटाकुटीस आला होता, आता त्यांना अवकाळी पावसाचा काहीच उपयोग होणार नाही. उलट याचे नुकसानच होणार आहे. नवीन सरकारकडून त्यांच्या अपेक्षांची पूर्तता न झाल्यामुळे त्याच्या नैराश्येत भर पडली आहे. अशा स्थितीत शेतकर्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. परंतु सरकारच्या कामाला अजून काही प्रारंभ एक वर्षानंतरही सुरु होत नाही. आता तर अवकाळी पावसामुळे सरकारची पाचावर धारण बसणार आहे. अनेक फालतू खर्च करुन ठेवलेले आहेत. आता सरकारी कर्मचार्यांवर दरवर्षी १८ हजार कोटी रुपये अतिरिक्त खर्च करावे लागणार आहेत. अशा वेळी विकास कामांना कात्री लावली जात आहे. त्यात आता अवकाळी पावसाच्या नुकसानीची भरपाई कुठून देणार? सध्या जो दुष्काळ पडत आहे तो जसा मनुष्यनिर्मित आहे असे तज्ज्ञ वारंवार सांगतात, कारण गेल्या तीस वर्षात वारेमाप पाण्याचा उपसा या भागात करण्यात आल्याने आता दुष्काळाचे दिवस पहावे लागत आहेत. आता देखील निसर्गाचे चक्र बदलण्यास माणूसच जबाबदार आहे. बेसुमार होत असलेली जंगलतोड, शहरात सीमेंटची उभी राहिलेली जंगले यामुळे निसर्गाचा तोल ढासळत चालला आहे. बरे आजवर झालेल्या आपल्या चुका सुधारण्याच्या मनस्थितीतही मनुष्यप्राणी नाही, त्यामुळे निसर्गाचे चक्र असेच बदलत राहाणार आहे. कोणत्चा ऋतू आता चार महिन्यांचा राहिलेला नाही. त्याचा कालखंड सतत पुढेच चालत आहे व पावसाळा तर सहा महिने चालला आहे. गेल्या वर्षात पुण्यात तर दहा महिने कमी-जास्त प्रमाणात पाऊस पडला. एकूणच निसर्गाचे चक्र बदलले आहे हेच खरे.
-----------------------------------------------------------------------

0 Response to "निसर्गाचे बदलेले चक्र"
टिप्पणी पोस्ट करा