-->
करिअरचा नवा फंडा

करिअरचा नवा फंडा

रविवार दि. ०९ ऑगस्ट २०१५ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
करिअरचा नवा फंडा
--------------------------------------------------
एन्ट्रो- गेल्या काही वर्षात इंजिनिअरिंग महाविद्यालय काढणे हा एक उत्कृष्ट उद्योग झाला होता. त्यामुळे ज्या प्रमाणे बी.ए.डी.च्या कॉलेजची स्थापना ठिकठिकाणी करण्यात आली तसेच इंजिनिअरिंग कॉलेजचे पीक उभे राहिले. या कॉलेजना नव्हता दर्जा किंवा पायाभूत सुविधा. अशा स्थितीतील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकून इंजिनिअर तरी काय विद्दवान तयार होणार आणि त्यांना नोकर्‍या तरी देणार कोण? शेवटी या कॉलेजचा फुगा फाटलाच. आता त्यामुळे हजारो सीट रिकाम्या जात आहेत. अशाच प्रकारे बी.ए.ड कॉलेजचा बोजवारा वाजला. एकीकडे अशा प्रकारे उच्च शिक्षणाचा दर्जा खालावला असताना दुसरीकडे जागतिकीकरणामुळे अनेक नवीन करिअरच्या संधी तरुणांसाठी चालून आल्या. केवळ डॉक्टर, इंजिनिअर व वकिल होणे हेच काही करिअर नव्हे हे विद्यार्थ्यांना पटले. अशाच एक करिअर म्हणजे कृषी क्षेत्रातले आहे. सध्याच्या काळात तरुणांसाठी अनेक नवनवीन संधी चालून आल्या आहेत. या संधीचे सोने करणे त्यांच्या हातात आहे...
--------------------------------------------------------
गेल्या काही वर्षात तरुणांना करिअरची अनेक नवीन दालने खुली झाली आहेत. पूर्वी डॉक्टर, इंजिनिअर किंवा वकील हे वगळता अन्य करिअर फारशी कुणाला ठाऊकच नव्हती. खरे तर सध्यासारखी अनेक करिअरचे दरवाजे खुलेही झाले नव्हते. त्यातुलनेत आता तरुणांना अनेक नवीन करिअरच्या संधी चालून आल्या आहेत. आता सध्याच्या काळात कृषी क्षेत्र म्हणजे समस्यांचे माहेरघर असेच म्हणता येईल. २००८ ते २०१४ या कालावधीत कर्जमाफीनंतर आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांची संख्या सरकारने अलीकडेच जाहीर केली, तो आकडा ९ हजार ६१४ एवढा होता. म्हणजे एकीकडे शेतकर्‍यांमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामागची कारणे कोणतीही असतील, परंतु आत्महत्या वाढत चालल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे. अशा वेळी या क्षेत्राकडे इवळणार कोण असे कुणालाही वाटेल. तरुणांनी तर या क्षेत्राकडे का जावे असेही कुणीही म्हणेल. मात्र याच्या नेमके उलटे सध्या चालू आहे. कृषी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी चसध्या विद्यार्थ्यांमध्ये जोरदार चढाओढ लागली आहे. या क्षेत्राकडे आकर्षण कमालीचे वाढलेले आहे. राज्यातील १७३ महाविद्यालयांत प्रवेश घेण्यास इच्छुकांचे तब्बल ६२ हजार अर्ज आले आणि पहिल्या फेरीचे प्रवेश थांबले थेट ९४ टक्क्यांवर पोहोचले. अर्थातच गुणवंत विद्यार्थ्यांचा कृषी शिक्षणाकडे गेलेला हा कल भुवया उंचावायला लावणारा आहे. कृषी क्षेत्रात गुणवंत विद्यार्थ्यांचा हा ओढा प्रत्यक्ष शेती करणार्‍यांचा नाही, हे वास्तव आहे. यातील प्रत्येक जण हा काही शेतकरी होईलच असे नाही. अनेकदा या क्षेत्रात सरकारी नोकर्‍यांची चांगली संधी असते त्यामुळे विद्यार्थी इकडे जातात. परंतु यातील सर्वांनाच काही सरकारी नोकर्‍या मिळतील असे नव्हे. त्यामुळे यातील ५० टक्के तरी मुलांना भविष्यात शेती किंवा शेतीशी निगडीत काम कारावयाचे आहे हे नक्की. कृषी क्षेत्रातली प्रवेशाची ही चढती कमान गेल्या तीन वर्षांपासून कायम आहे. राज्यातील चार कृषी विद्यापीठांशी संबंधित १७३ महाविद्यालयांपकी ३१ महाविद्यालये शासकीय आहेत. २ महाविद्यालये संलग्नित आहेत, तर १४३ महाविद्यालये विनाअनुदानित आहेत. या महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू असून पहिल्या फेरीअखेर ९४ टक्के गुण असणार्‍यांनाच प्रवेश मिळू शकला. प्रवेशासाठीचा शेवटचा टक्का फार तर ८७ टक्क्यांवर थांबू शकतो, असे या तज्ज्ञांचे मत आहे. कृषी पदवी मिळविण्यासाठी सातबारा उतारा जोडल्यानंतर १२ टक्के वाढतात. हा आकडा जरी वजा केला तरी गुणांमध्ये वरचढ असणारा विद्यार्थी कृषी क्षेत्रात प्रवेश घेत आहे. सातबारा जोडल्यानंतर गुणांमध्ये होणारी वाढ हे जरी एक कारण असले, तरी कृषीकडे चांगले गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. त्याचे कारण या विषयात अनेक बाबींचा समावेश होतो. मातीचे शास्त्र, सिंचन, अर्थशास्त्र, अन्न प्रक्रिया, फलोत्पादन यांसह अनेक क्षेत्रे खुली होतात. विशेषत: एम.पी.एस.सी. स्पर्धा परीक्षेसाठी त्याचा फायदा होतो. कृषी क्षेत्रात पदवी घेणार्‍यांचा शेती सुधारणेत वाटा मोठा आहे. खते, बियाणे, अवजारे याच्या प्रगतीमध्ये त्यांचे योगदान आहे. तसेच उत्पादित मालाची बाजारपेठ आणि बँकिंग क्षेत्रातही आता मोठा वाव असल्याने कृषी पदवीकडे अनेक जण वळत आहेत. तर दुसरीकडे ऐकेकाळी हॉट करिअर म्हणून ओलखल्या गेलेल्या अभियांत्रिकी क्षेत्रात या वर्षी तब्बल ६० हजारांहून अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. राज्यात ३६६ अभियांत्रिकी महाविद्यालयांची प्रवेश क्षमता एक लाख ६० हजार आहे. प्रवेशाची आणखी एक फेरी करण्यास मान्यता मिळाली असली तरी या वर्षी अधिक जागा रिक्त राहतील, अशी शक्यता उच्च व तंत्रशिक्षण विभागातील सूत्रांनी व्यक्त केली. गेल्या काही वर्षात इंजिनिअरिंग महाविद्यालय काढणे हा एक उत्कृष्ट उद्योग झाला होता. त्यामुळे ज्या प्रमाणे बी.ए.डी.च्या कॉलेजची स्थापना ठिकठिकाणी करण्यात आली तसेच इंजिनिअरिंग कॉलेजचे पीक उभे राहिले. या कॉलेजना नव्हता दर्जा किंवा पायाभूत सुविधा. अशा स्थितीतील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकून इंजिनिअर तरी काय विद्दवान तयार होणार आणि त्यांना नोकर्‍या तरी देणार कोण? शेवटी या कॉलेजचा फुगा फाटलाच. आता त्यामुळे हजारो सीट रिकाम्या जात आहेत. अशाच प्रकारे बी.ए.ड कॉलेजचा बोजवारा वाजला. एकीकडे अशा प्रकारे उच्च शिक्षणाचा दर्जा खालावला असताना दुसरीकडे जागतिकीकरणामुळे अनेक नवीन करिअरच्या संधी तरुणांसाठी चालून आल्या. केवळ डॉक्टर, इंजिनिअर व वकिल होणे हेच काही करिअर नव्हे हे विद्यार्थ्यांना पटले. अशाच एक करिअर म्हणजे कृषी क्षेत्रातले आहे. सध्याच्या काळात तरुणांसाठी अनेक नवनवीन संधी चालून आल्या आहेत. या संधीचे सोने करणे त्यांच्या हातात आहे. केवळ सरकारी नोकरी म्हणजे करिअरची उत्तम संधी हे गणित आता निदान मोठ्या व मध्यम आकारातील शहरातून बदलले आहे. करिअरचा हा नवीतन फंडा बदलत्या काळास साजेसा आहे.
----------------------------------------------------------------    

0 Response to "करिअरचा नवा फंडा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel