-->
अखेर फास आवळलाच!

अखेर फास आवळलाच!

संपादकीय पान शुक्रवार दि. ३१ जुलै २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
अखेर फास आवळलाच!
मुंबईत ११९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी याकूब मेमन याला गुरुवारी पहाटे सुर्योदयापूर्वी अखेर फाशी देण्यात आली. आपली फाशी टळावी यासाठी याकूबने शेवटपर्यंत न्यायालयीन लढाया केल्या. परंतु त्यात त्याला काही यश आले नाही. अगदी काल सायंकाळी सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचीका फेटाळल्यावर राष्ट्रपतींनी त्याचा दयेचा अर्जही फेटाळला आणि त्याचा फासावर लटकण्याचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु त्यानंतरही त्याच्या वकिलांनी पुन्हा एकदा सुनावणी व्हावी यासाठी न्यायलयात अर्ज केला होता. हा अर्ज देखील पहाटे चार वाजता फेटाळला गेला. एका कुख्यात गुन्हेगारासाठीही न्यायालयाने अखेरपर्यंत आलेले त्याचे सर्व अर्ज विचारात घेतले यातून आपल्या न्यायव्यवस्थेची परिपक्वता दिसते. न्यायालय असो किंवा जनतेचे न्यायालय यात याकूबला फाशी देण्याचे नक्की झालेलेच होते. कारण त्याचा तसा गुन्हा देखील गंभीरच होता. मानवतेला काळीमा लावणारा त्याने गुन्हा केला होता. असे असले तरीही अपराध्यालाही समान संधी मिळाली पाहिजे या न्यायाने न्यायालयाने त्याची बाजू ऐकण्यासाठी रात्रभर न्यायलय चालू ठेवले. शेवटी अपेक्षेप्रमाणे मेमनला फाशी ही झालीच. मेमन हा शरण आलेला होता व त्याने या खटल्याच्या कामात सरकारला मदत केली होती असा युक्तीवाद करीत त्याला फाशी होऊ नये यासाठी प्रयत्न झाले. त्यानंतर कडव्या मुस्लिमांनी तो मुस्लिम असल्यानेच त्याला फाशी दिली जात अशी आरोळी ठोकून पाहिली. तसेच जगातील १४० देशातून फाशी हद्दपार झालेली आहे आणि कितीही गंभीर गुन्हा असला तरी फाशी दिली जाऊ नये असे मत व्यक्त करणारी विचारवंतींची एक फळी देशात आहे त्यांनीही पत्र देऊन पाहिले. परंतु हे सर्व प्रयत्न काही मेमनला वाचवू शकले नाहीत. फाशी बाबत जगात काहीही मत असले तरीही जे गंभीर गुन्हे प्रामुख्याने देशद्रोहाच्या गुन्हाबाबत फाशी ही दिलीच गेली पाहिजे. कारण त्यातून अशा प्रकारचे गुन्हे भविष्यात घडणार नाहीत, निदान त्यातून अशा प्रकारच्या गुन्ह्यांकडे लोक वळणार नाहीत, असे वातावरण तरी तयार होते. फाशीबाबतची भिन्न मते ही जगात असणारच. असे असले तरीही आपल्यासारखअया विकसनशील देशात अशा प्रकारचे गंभीर गुन्हे करणार्‍यांना आयुष्भर जेलमध्ये पोसणे आपल्याला परवडणारे नाही, हे देखील तेवढेच खरे आहे. अयोध्येतील मशिद पाडल्याची प्रतिक्रिया म्हणून सहा डिसेंबर १९९२ नंतर मुंबईत जातीय हिंसाचार वाढत गेला. दाऊद इब्राहीम, टायगर मेमन आणि याकूब मेमन यांनी मुंबईत मार्च १९९३ मध्ये साखळी बॉम्बस्ङ्गोट घडवून आणले. मुंबईत एकाच वेळी विविध ठिकाणी झालेल्या या बॉम्बस्ङ्गोटात २५७ मुंबईकर ठार झाले, तर सातशे नागरिक जखमी झाले. देशात एवढ्या मोठ्या प्रमाणात सामूहिक गुन्हेगारी कृत्ये घडवून आणल्यामुळे मुंबईच नव्हे, तर अवघा देश हादरला. अशा प्रकारे साखळी बॉम्बस्फोट होण्याची ही देशातील त्यावेळी घडलेली पहिलीच घटना होती. गर्दीच्या आणि महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्ङ्गोट घडवून, दहशत माजवून अयोध्येतील घटनेचा व त्यानंतरच्या जातीय दंगलीचा सूड उगवायचा होता. या बॉम्बस्ङ्गोटाच्या वेळी प्रथमच मोठ्या प्रमाणात आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता. या बॉम्बस्ङ्गोटानंतर दाऊद पाकिस्तानमध्ये दडून बसला, तर टायगर ङ्गरार झाला. याकूबसह अन्य काही आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावरचे गुन्हे सिद्ध झाले. संजय दत्तसह काहींना शिक्षा झाली; परंतु या साखळी बॉम्बस्ङ्गोटाच्या कटाचा सूत्रधार असलेल्या याकूबला टाडा न्यायालयाने ङ्गाशीची शिक्षा सुनावली. याकूब हा काही मोठा समाजसुधारक किंवा देशभक्त नाही. त्यामुळे त्याच्या ङ्गाशीवर अश्रू ढाळावेत, अशी परिस्थिती नाही; परंतु आपल्याकडे कोणत्याही गोष्टीचं राजकारण करण्याची सवयच लागली आहे. बॉम्बस्ङ्गोट, दंगलीत सर्वसाधारणतः अल्पशिक्षित लोक पैशासाठी सहभागी होतात, असं मानलं जातं. परंतु उच्चशिक्षित आणि पेशानं चार्टर्ड अकौंटंट असलेल्या याकूबचा त्यात सहभाग आढळला, तेव्हा सर्वांना आश्‍चर्य वाटलं होतं. देशाशी छुपं युद्ध पुकारणार्‍या याकूबला टाडा न्यायालयाने २००७ मध्येच ङ्गाशीची शिक्षा सुनावली होती. तेव्हापासून अपिलांवर अपिलं करत त्याने आतापर्यंत सात वर्षे बोनस आयुष्य जगला. सरकारने ज्या गतीने कसाबला फाशी दिली त्या गतीने पहिल्या व त्यानंतर झालेल्या अशाच प्रकारच्या गुन्ह्यातील आरोपींना फासावर चढविलेले नाही. अर्थात हे काही जाणूनबुजून झालेले नाही तर न्यायालयीन प्रक्रियेतील विलंबाने हे झालेले आहे. परंतु अशा प्रकारचे खटले हे लवकरात लवकर चालवून सरकारने यातील आरोपींना कशाप्रकारे जबर शिक्षा होतील ते पाहिले पाहिजे. अन्यथा आपण अशा प्रकारचे निष्पाप जनतेला ठार करुनही आपल्यावर काही कारवाई होत नाही, अशी समजूत या गुन्हेगारांची होऊ शकते. गेल्या दोन दशकात अतिरेकी व देशविघातक कृत्ये करणार्‍यांची संख्या वाढली आहे. आपली गुत्पचर यंत्रणेवरही त्यामुळे जास्त ताण पडतो. किंवा गुप्तचर यंत्रणेने इशारा देऊनही पोलीस खाते थंड राहाते. पंजाबमध्ये नुकताच झालेल्या अतिरेक्यांच्या हल्यातून हे स्पष्टपणे दिसले आहे. याबाबत गुप्तचर यंत्रणेने इशारा देऊनही पोलीस खात्याच्या धीमेपणामुळे पाकमधून आलेल्या अतिरेक्यांचा हा हल्ला झाला. याकूबला आता फाशी झाल्याने या धर्तीचे गुन्हे थांबतील असे नव्हे तर अशा शिक्षांमुळे यापुढे असे गुन्हे करताना हे गुन्हेगार पुन्हा पुन्हा विचार करतील.
------------------------------------------------------------------------    

Related Posts

0 Response to "अखेर फास आवळलाच!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel