-->
संपादकीय पान बुधवार दि. १ एप्रिल २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
अमली पदार्थांचा विळखा
राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये कोट्यवधी रूपयांच्या अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या निमित्ताने अमली पदार्थांचा वाढता वापर, तस्करी हे मुद्दे पुन्हा जोरदार चर्चेत आले. अङ्गूपासून सुरू झालेली व्यसनाची कहाणी गर्द, हेरॉईनपासून आता मेङ्गेड्रोनपर्यंत येऊन पोहोचली आहे. व्यसनांचा हा वाढता विळखा वेळीच सोडवला जायला हवा. अन्यथा संपूर्ण युवा पिढी बरबाद होण्याचा धोका आहे. व्यसनांच्या दुष्परिणामांबद्दल कितीही सांगितले जात असले आणि त्यासंदर्भात काही दुर्दैवी उदाहरणे समोर दिसत असली तरी व्यसनींची संख्या म्हणाव्या त्या प्रमाणात कमी झालेली नाही. उलट नवनवीन अमली पदार्थांची भर पडत असून त्याचे सेवन करण्याकडील ओढाही वाढत आहे. ही गंभीर बाब आहे. पूर्वी अंमली सेवनासाठी अङ्गूचा वापर केला जायचा. हे लक्षात घेऊन अङ्गूच्या विक्रीवर, वापरावर बंदी आणण्यात आली. त्याच बरोबर अङ्गूच्या शेतीवरही निर्बंध घालण्यात आले. परंतु अजुनही छुप्या पध्दतीने अङ्गूची शेती केली जात असल्याचे वेळोवेळी उघड होते. विशेषत: उंच वाढणार्‍या, दाट पिकांमध्ये अङ्गूची रोपे लावली जातात. त्यामुळे ती सहज दृष्टीस पडत नाहीत आणि तिथे अङ्गूची झाडे असल्याचे लक्षात येत नाही. मग अशा झाडांपासून मिळणारी अङ्गू छुप्या मार्गाने व्यसनी व्यक्तिंपर्यंत पोहोचवली जातो. अशा अङ्गूला चांगला दर मिळत असल्याने संबंधित शेतकर्‍यांसाठी ती ङ्गायद्याची बाब ठरते. परंतु याच अङ्गूच्या सेवनाने अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होते याचा विचारच केला जात नाही. तो होईल त्यावेळी अङ्गूच्या लागवडीला आपोआप आळा बसेल. केवळ भारतातच तयार झालेल्या अङ्गूचा वापर केला जातो असे नाही. कारण अङ्गूच्या मागणीच्या मानाने त्याचे या देशातील उत्पादन बरेच कमी आहे. जागतिक पातळीवर अङ्गूचे उत्पादन करणार्‍या देशांमध्ये अङ्गगाणिस्तानचा क्रमांक सर्वात वरचा आहे. या देशात अङ्गूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते आणि तेथून या ना त्या प्रकारे अन्य देशांमध्ये पाठवले जाते. अशा तर्‍हेने भारतात होणार्‍या अङ्गूच्या तस्करीवरही पुरेसे नियंत्रण ठेवणे शक्य झालेले नाही. वास्तविक अमली पदार्थविरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी झाली तरी या पदार्थांच्या तस्करीला बर्‍याच प्रमाणात आळा घालणे शक्य होणार आहे. परंतु सुरक्षा यंत्रणांमधील त्रुटीमुळे अमली पदार्थांची तस्करी सोयीची होते हे ही लक्षात घ्यायला हवे. त्यासाठी अमली पदार्थांचे उत्पादन, त्यांची वाहतूक तसेच विक्री हे जाळे मुळापासून उखडून टाकले जाण्याची आवश्यकता आहे. या पार्श्‍वभूमीवर नुकत्याच घडलेल्या  घटनांचा वेध घ्यायला हवा. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाक्याजवळ एका कारमधून तीन कोटी रूपयांचा मेङ्गेड्रोन हा अमली पदार्थ जप्त केला. या शिवाय इस्लामपूर येथील अमली पदार्थ तयार करणार्‍या एका गोदामावर छापा टाकून ३४० किलो मेङ्गेड्रोन जप्त करण्यात आले. याची बाजारातील किंमत २० कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जाते. त्याच बरोबर नवनवीन अंमली पदार्थ बाजारात येत असून त्याकडे व्यसनी व्यक्ती आकर्षित होतात हेही दिसून आले आहे. त्यामुळे शासनाला यापुढील काळात अंमली पदार्थ विरोधी मोहिम अधिक कडक करावी लागणार आहे. आता सापडलेले मेङ्गेड्रोन हे एक उत्तेजक औषध आहे. एम कॅट नावाने ओळखले जाणारे हे उत्तेजक औषध पावडर किंवा गोळ्यांच्या स्वरूपात वापरले जाते. याच्या सेवनाने शारीरिक तसेच मानसिक दुष्परिणाम होतात. याचा वापर लैंगिक उत्तेजनेसाठी होत असल्याचे दिसून आले आहे. आजवर युरोपमधील देशांमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आला असून आता त्याचे लोण भारतातही पसरत चालले आहे, असे म्हणता येईल. देशात यापूर्वी गर्दच्या व्यसनाने तरुणाईला घेरले होते. काही वर्षांपूर्वीपासून गर्दबरोबर हेरॉईनचाही वापर व्यसनांसाठी होऊ लागला. जागतिक बाजारपेठेत हेरॉईनची किंमतही बरीच असते. त्यामुळे किरकोळ स्वरूपातील विक्रीतही ते मोठ्या किंमतीला विकले जाते. गर्द, हेरॉईनचे व्यसन ही अशी गोष्ट आहे की त्याची चटक लागलेली व्यक्ती अक्षरश: वेडीपिशी होते. इच्छा होईल तेव्हा ते हवेच असा त्यांचा आग्रह असतो आणि ते मिळवण्यासाठी कोणत्याही थरास जाण्यास अशा व्यक्ती तयार असतात. त्यामुळेच तरूणाईला अधिक संख्येने या व्यसनांच्या जाळयात ओढण्याचे पध्दतशीर प्रयत्न सुरू असतात. महत्त्वाची बाब म्हणजे अमली पदार्थांच्या तस्करीतून मिळणारा पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात असल्याचेही दिसून आले आहे. यावरून ही तस्करी किती गंभीर ठरू शकते याची कल्पना येते. त्यामुळेच या तस्करीला वेळीच आळा घालणे आवश्यक ठरणार आहे.हल्ली आपल्याकडे पाश्‍चात्त्यांचे अनुकरण करण्याकडील कल वाढत आहे. पैसा, संपत्ती याच्या बळावर स्वैर जीवन जगण्याचा प्रयत्न करणार्‍यांची संख्या कमी नाही. त्यातून अमली पदार्थांच्या पार्ट्यांंना प्रोत्साहन मिळत आहे. अधूनमधून उघड होणार्‍या रेव्ह पार्ट्यांच्या घटना हा याचाच परिणाम आहे. अशा पार्ट्यांमध्ये अमली पदार्थांचे सेवन हमखास केले जात असल्याचे आढळते. त्यामुळे अमली पदार्थांची विक्री करणारे अशा पार्ट्यांच्या शोधात असतात. ही सारी परिस्थिती संपूर्ण समाजाच्या तसेच देशहिताच्या दृष्टीने चिंताजनक आहे. अवघी तरूणाई या विळख्यात सापडण्यापूर्वीच समाजाने जागे होऊन ही समस्या आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या दृष्टीने सरकारी पातळीवर प्रयत्न होत राहतील. परंतु यात सामाजिक संस्था, संघटना, व्यसनमुक्ती केंद्र यांचाही सहभाग मोलाचा ठरणार आहे.
-----------------------------------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel