-->
संपादकीय पान सोमवार दि. ०२ मार्च २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------------------------
नाईट लाईङ्गमागचे वास्तव
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही मायानगरी आहे. दिल्लीहून देशाची सूत्रं हलत असली तरी देशाच्या आर्थिक नाड्या या शहराच्या हाती आहेत. म्हणूनच मुंबई गतीमान असण्याची गरज आहे. पूर्वी मुंबई हे गिरणगाव असताना दिवसाभरात तीन पाळ्यांमध्ये काम होत राहण्याची सवय होती. दिवसाबरोबर रात्रीही कापड गिरण्यांची घरघर सुरू रहायची. पण कापड गिरण्या एकामागोमाग एक बंद होऊ लागल्या पर्यायानं मुंबईतील रात्रीची लगबग कमी होऊ लागली. अर्थात त्यानंतरचा काळ जागतिकीकरणाचे वारे वाहणारा होता. सहाजिकच कामाची नवी संस्कृती उदयाला आली आणि कॉल सेंटर्स, पाश्‍चात्य देशांमधील वेळेनुसार काम करणार्‍या सॉफ्टवेअर संस्था, एअरपोर्टवर काम करणारे कर्मचारी आणि देशी-विदेशी पर्यटकांनी मुंबईचे रस्ते रात्रीदेखील वाहते राहू लागले. पण कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करता मुंबईतील रेस्टॉरंट्‌स, पब्ज, हॉटेल्स, सार्वजनिक वाहतूक सेवा रात्री एक वाजता बंद कराव्या लागतात. अर्थात मुंबई अगदी काही काळच झोपते. पहाटे चारपासून पुन्हा एकदा इथला दिनक्रम सुरू होतो. पण दरम्यानच्या काळात मुंबईत येणार्‍या व्यावसायिक, पर्यटक, नोकरदारांना अडचणींना सामोरं जावं लागतं. गेली काही वर्षं हा मुद्दा प्रकर्षानं चर्चेत होता. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री तसेच परिवहन खात्याचे अधिकारी आणि पोलीस यंत्रणेशी सल्लामसलत केली व रात्रीची मुंबई जागती राहाण्यासाठी काय करावे यासाठी अट्टाहास धरला. मुंबई रात्रीही जागती राहिली तर आधीच दिवसभर तैनात असणारी प्रशासन यंत्रणा रात्रीदेखील तेवढ्याच कार्यक्षमतेनं कार्यरत राहण्याची गरज निर्माण होणार यात शंका नाही. हा यंत्रणेवरील अतिरिक्त ताण असेल. याबाबत अन्य काही मुद्देही विचारात घ्यावे लागतील. पण दिसून येणारे काही चांगले बदल नाईटलाईङ्गबद्दल सकारात्मक दृष्टीकोन देण्यास मदत करत आहेत. यातील एक बाब म्हणजे अन्य शहरांच्या तुलनेत मुंबई महिलांसाठी जास्त सुरक्षित आहे. मुंबईकर एकमेकांच्या भानगडीत नाकं खुपसायला जात नाहीत. महिलाही मुंबईत स्वत:ला सुरक्षित समजतात. रात्रीदेखील मुंबईतील वर्दळ सुरू राहिली तर सुरक्षितता आणखी वाढेल असं अनेकांचं मत आहे. मुंबई हे एक बहुभाषिकता, बहुधार्मिकता जपणारे एक सच्चे कॉस्मोपॉलिटन म्हणता येईल असे शहर आहे. मुंबई जर रात्रीची जागी राहिली तर मुंबईच्या अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्यास मोठा हातभार लागणार हे नक्की. मलेशियासह जगातील अनेक राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था या केवळ पर्यटनावर अवलंबून आहेत. पर्यटकांची गरज लक्षात घेऊन त्या सुविधा पुरवाव्या लागतात. तसं केलं नाही, तर त्याचा परिणाम पर्यटनावर होत असतो. मुंबईत येणार्‍या देश-विदेशातील लोकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासाठी तशा सुविधा निर्माण केल्या तर त्यात सर्वांचाच ङ्गायदा आहे. अनिवासी क्षेत्रात मुंबई जागती राहिली, तर त्याचा इतरांना त्रास होण्याचं काहीच कारण नाही. त्यामुळे उद्योग वाढेल. रोजगाराच्या संधी वाढतील, उलाढाल वाढेल; हॉटेल, मॉल्स, सिनेमागृह, औषधांची दुकानं, दुधाच्या टपर्‍या आदी सेवा २४ तास चालू राहिल्या, तर त्यातून उलाढाल वाढणार आहे. दिवसा वेळ न काढू न शकणारे मुंबईकरही या सेवांचा रात्री ङ्गायदा घेऊ शकतील. गर्दीमुळे दिवसा खरेदीसाठी पुरेसा वेळ देऊ न शकणार्‍यांना रात्री पुरेसा वेळ खरेदीत घालवता येईल. परंतु मुंबईचे नाईट लाईफ म्हणजे केवळ पब्ज उघडे ठेवणे नव्हे. या संदर्भात न्यूयार्कमधील उदाहरण बोलकं आहे. रात्रीच्या व्यापार, उद्योगासाठी न्यूयार्कची पुनर्उभारणी करण्यात आली. बिझनेस ङ्ग्रेंडली सिटी म्हणून तिचा जगभर नावलौकिक  झाला. न्यूयार्कमधील रहिवाशांनी तसंच स्थानिक नागरिकांनीही या योजनेला चांगला प्रतिसाद दिला. शहर रात्रभर जागं राहिल्यानं तेथील गुन्हेगारी कमी झाली. लंडन, सिंगापूरचं उदाहरण यापेक्षा वेगळं नाही. बंगळुरूमध्ये पब कल्चर वाढलं आहे. त्यामुळे बंगळुरूमध्ये व्यापार, उदीम वाढला. दुबई हे नव्या जगातील एक आदर्श ठिकाण झालं आहे. सुरक्षित, आरोग्यदायी, गुणवत्तापूर्ण, मनोरंजनाची चांगली व्यवस्था तसंच उद्योगपूरक भूमिका घेणारी शहरंच पैसा आपल्याकडं आकर्षित करत असतात. दुबई हे त्याचं चांगलं उदाहरण आहे. मुंबईचं शांघाय करण्याची भाषा करण्याऐवजी मुंबईचा उद्यमशील नगरी हा लौकिक कायम ठेवण्यासाठी पुरेशी व्यवस्था केली, तरी ङ्गार झालं. त्या दृष्टीने रात्रीची मुंबई या नव्या संकल्पनेचा स्वीकार करताना त्यासाठी परदेशाइतक्या चांगल्या सुविधा निर्माण करायला हव्यात. रात्री ङ्गिरतानाही सुरक्षित वाटायला हवं. मुंबईत अजूनही उद्योग, आस्थापने खेचून आणण्याची मोठी ताकद आहे. मुंबईचं जागतिक बंदर म्हणून असलेलं स्थान, युरोप आणि पूर्व आशियाच्या मध्यवर्ती असलेलं ठिकाण, आर्थिक वाढीचं वारं लागलेलं ठिकाण म्हणूनही मुंबईचा उल्लेख केला जातो. आदित्य ठाकरे यांच्या मनात जरुर चांगल्या गोष्टी असतील. परंतु तसे करायला आपल्याकडील प्रशासन सज्ज आहे का हा सवाल आहे. रात्रभर मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीची साधनं चांगली हवीत. छोटे छोटे उद्योग, हॉटेल, सिनेमागृहं, पब्ज, मॉल्स रात्रभर चालू ठेवायची असतील तर त्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही रात्रभर चालू राहायला हवी. आता रात्री एक वाजताच बससेवा, लोकल सेवा बंद होते. मेट्रो, मोनोरेलसारख्या सेवाही सुरू राहायला हव्यात. अनिवासी क्षेत्रात हे उद्योग सुरू ठेवण्याची कल्पना आहे. त्यामुळे तेथून निवासी क्षेत्रात जाण्यासाठी वाहतूक व्यवस्थाच नसेल, तर रात्रीचा व्यापार भरभराटीला कसा येणार? खरेदी, काम उरकल्यानंतर प्रत्येकाला खासगी वाहन व्यवस्था वापरणं अवघड आहे. खासगी वाहतूक व्यवस्थेतील सध्याची असुरक्षितता पाहता त्या महिलांसाठी योग्य नाहीत. सामान्य मुंबईकर वा मुंबईत येणारे सामान्य पर्यटक नाईटलाईङ्ग एंजॉय करू शकणार आहेत? याचा कुणीच विचार करीत नाही.
-------------------------------------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel