संपादकीय पान मंगळवार दि. १० मार्च २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
आरोग्यमंत्री राजीनामा द्या!
गेल्या काही दिवसात आपल्याकडे स्वाईन फ्लू या रोगाने आपला विळखा अधिकच घट्ट केला आहे. मात्र सरकार याबाबत काही गांभीर्याने विचार करते आहे असे दिसत नाही. विरोधी पक्षाने त्यासाठीच आरोग्य मंत्र्यांच्या राजीनाम्याची केलेली मागणी रास्त ठरते. अनेक जिल्हा रुग्णालयात यासाठी स्वतंत्र कक्ष जरुर स्थापन करण्यात आले आहेत मात्र त्यासाठी आवश्यक असणारी औषधे बाजारात उपलब्ध नाहीत. तसेच यासाठी रोग्याला श्वास घेण्यासाठी आवश्यक असणारा व्हेंटिलेटर जिकडे उपलब्ध आहे तो महागडा आहे. अनेक सार्वजनिक रुग्णालयात ही सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे गरीब रुग्णांना मरणाशिवाय अन्य पर्याय नाही. त्यामुळे सरकार केवळ याबाबत दिखावा करते आहे, प्रत्यक्षात या रोगाचे गांभीर्य ओळखून जी आरोग्य व्यवस्था केली पाहिजे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे, असेच खेदाने म्हणावेसे वाटते. २००९ पासून दक्षिण कॅलिफोर्नियातील व टेक्सास येथील सॅन ऍटोनिया भागातील मानवी आरोग्य जगतात धुमाकूळ घालणार्या स्वाइन नावाच्या वादळाने प्रवेश केला व ते स्वाइन नामक रोगाचे वादळ सर्वदूर पसरत गेले ते अजूनही शमले नाही. चार वर्षांच्या खंडानंतर आता पुन्हा या रोगाने उग्ररूप धारण करू पाहत आहे. स्वाइन फ्लूला मेक्सिकन फ्लू, स्पॅनिश फ्लू, एच १ एन १, इन्फ्लूएंझा ए अशी समानार्थी नावे आहेत. या रोगाचा संबंध श्वसनवहन संस्थेशी येत असल्याने यास श्वास रोग असेही म्हणतात. वस्तुत: या रोगाचे विषाणू हवेत वर्षभर असतात. परंतु हिवाळ्याच्या सुरुवातीस व उशिरा पावसाच्या काळात ते रोगनिर्मितीसाठी सज्ज होतात. हवेच्या झोतासोबत बाधित माणसांमुळे ही साथ सर्वदूर झपाटयाने पसरते. थोडक्यात साथीच्या रोगाची लाट थोडयाच कालावधीत आख्ख्या जगभर नेणार्या विषाणूंच्या सुनामीला पांडेमीक म्हणतात. ही साथ, रोगप्रणाली केवळ आपल्या शरीरावरच हल्ला करत नाही तर तिच्यामुळे संपूर्ण जगाच्याच अर्थव्यवस्थेवरही हल्ला होतो. स्वाइन फ्लूचा विषाणू हा एक अतिसूक्ष्मजीव प्रकार आहे. त्याच्यात अन्न पचवायची प्रक्रिया अजिबात होत नसून तो परोपजिवी असतो. हे जंतू इतके इतके सूक्ष्म असतात की त्यांचा आकार ५०० मायक्रॉन म्हणजे टाचणीच्या टोकावर १५० कोटी इतके स्वाईन फ्लूचे विषाणू अगदी आरामात राहू शकतात. साध्या सूक्ष्मदर्शका खालीसुद्धा न दिसणारा असा एक अर्थ व्हायरस या नावाने विसाव्या शतकाच्या सुरुवातीस प्रचलित झाला. व्हायरस शब्दाचा लॅटीन भाषेतला अर्थ विष असा आहे! एका विषाणूत असे ७८०० काटे असतात. त्याचा वापर तो श्वासनलिका पोखरण्यासाठी करतो. फ्लूचा विषाणू हवेतून जाताना स्वत:भोवती एक सुरक्षाकवचासारखा कोट वापरतो. गरम वातावरणात ही चिलखत विरघळली जाते. त्यामुळे या रोगाचा प्रसार थंड वातावरणात होतो. स्वाईन फ्लूचे विषाणू हवेत आठ तास जिवंत राहू शकतात. आपली जनुकीय वेशभूषा सतत बदलत राहणे व आपल्या अनेक आवृत्त्या काढत राहणं हेच विषाणूंचं एकमेव काम असतं. एका दिवसात साडेचार हजार नवीन विषाणू तयार होतात. सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यात वातावरणातील थंडी वाढते. परिणामी या महिन्यात ही साथ आपले उग्ररूप धारण करेल अशी शक्यता वाटते. थंडी, ताप १०० अंश, जास्त सर्दी, खोकला, अंगदुखी, घसा सुजणे, खवखवणे, दुखणे, मळमळ, उलटी, जुलाब व पोटदुखी या लक्षणांचा समावेश या आजारात असतो. याचा प्रसार बाधित माणसाकडून नॉर्मल माणसास होत असतो. स्वाइन फ्लू विषाणू बाधित व्यक्तीच्या खोकल्यातून किंवा शिंकण्यातून हवेत उडणार्या तुषारातील विषाणू धूलिकणाच्या स्वरूपात जिवंत राहतात. नॉर्मल व्यक्ती जेव्हा अशा दूषित वातावरणात जाते तेव्हा श्वसन करताना नाका-तोंडावाटे संसर्ग होऊन मग ती व्यक्तीही आजारी पडते. हवेतून प्रसार होण्याच्या या आजार प्रकारास वैद्यकीय भाषेत एअर बॉर्न डिसीज म्हणतात. बाधित व्यक्तीच्या नाकातोंडावाटे बाहेर पडणार्या दूषित कफास नॉर्मल व्यक्तीने स्पर्श केला तरीही आजार होऊ शकतो. या रोगाचा प्रसार मुख्यत्वे डुक्कर पाळणारे व त्यांचे मांस विक्री, भक्षण करणारे यांच्याद्वारे होण्याची शक्यता दाट असते. ज्यावेळी बाधित माणूस खोकतो-शिंकतो त्यावेळी विषाणू हवेतून नॉर्मल व्यक्तीच्या श्वसन संस्थेत प्रवेश करतो व पुढच्या कुकर्मासाठी सुरुवात करतो. बाधित रुग्णलक्षणे सुरू होण्याच्या एक दिवस आधीपासून पुढील सात दिवस इतरांना आजार पसरवू शकतो.
ज्यांना फुप्फुसाचे जुनाट आजार आहेत, मूत्रपिंडाचे तीव्र आजार, हृदयविकार, यकृताचे आजार, मधुमेही व्यक्ती, रोग प्रतिकारक शक्ती कमी असणार्या व्यक्ती, मेंदूजन्य आजारांची तीव्रावस्था, वृद्ध व्यक्ती व पाच वर्षांखालील मुले, गर्भवती महिला, एड्स बाधित रुग्ण हे या रोगाच्या कचाट्यात झपाट्याने सापडतात. स्वाइन फ्लू हा विषाणूजन्य आजार आहे. बहुतांशी विषाणू कोणत्याच औषधांना दाद देत नाहीत. परंतु सुदैवाने स्वाइन फ्लूचे विषाणू मारणारी औषधे उपलब्ध आहेत हे विशेषच म्हणावे लागेल. मात्र आपल्याकडील सार्वजनिक रुग्णालयात या औषधाचा तुटवडा जाणवत आहे. याला सर्वस्वी जबाबदार सरकार आहे. स्वाईन फ्लू आटोक्यात ठेवण्यासाठी जशी स्वच्छता जरुरी आहे तशी हा रोग झाल्यावर त्यावरील औषध मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन देणे हे सरकारचे काम आहे. अर्थात हे काम चोखपणाने सरकार करीत नाही आहे आणि त्यामुळे आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे ती समर्थनीय आहे.
---------------------------------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा