-->
संपादकीय पान बुधवार दि. ११ मार्च २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
विश्‍वचषकचे अर्थकारण
विश्‍वचषकाचा रंग आता चढू लागला आहे. यंदा पहिल्यांदाच विश्‍वचषकातल्या जाहिरातींवर १२०० कोटी रूपये खर्च होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. क्रिकेट विश्‍वचषकाकडे कॉर्पोरेट जगताचे कायमच लक्ष असते. क्रिकेट सामान्यांदरम्यानच्या जाहिरातींमुळे आपली उत्पादनं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधीच कंपन्यांना मिळत असते. भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ. त्यातच क्रिकेटवर भारतीयांचं प्रचंड प्रेम. म्हणूनच विश्‍वचषकातल्या टीम इंडियाच्या कामगिरीवर अनेकांचं अर्थकारण ठरत असतं. भारतीय संघ जसजसा पुढे जाईल तसा जाहिरातींचे दरही वधारत जातात. विश्‍वचषक सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क मिळवण्यासाठीही वाहिन्यांमध्ये चढाओढ लागून राहिलेली असते. यंदाच्या विश्‍वचषकाचा रंग आता चढू लागला आहे. विश्‍वचषकाची सुरूवात झाली तेव्हा ऑस्ट्रेलियातली भारताची कामगिरी ङ्गारशी चांगली झाली नव्हती. त्यामुळे विश्‍वचषकातल्या भारताच्या कामगिरीबाबत ङ्गारसं आशादायक चित्र नव्हतं. पण धोनी ब्रिगेडने ङ्गिनिक्सभरारी घेत मिशन वर्ल्ड कपला अगदी दणक्यात सुरूवात केली आहे. भारत आता उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे ब्रॉडकास्टर्स म्हणजे वितरकांच्या मनात आता ङ्गुलपाखरं उडू लागली आहेत. म्हणूनच जाहिरातदारांची मागणी लक्षात घेता स्टार इंडियानं जाहिरातींच्या स्पॉट रेटमध्ये वाढ करायला सुरूवात केली आहे. भारताच्या पुढच्या चारही सामन्यांदरम्यानच्या जाहिरातींसाठी स्टारनं हे पाऊ ल उचललं आहे. स्टार इंडियानं स्पॉट रेटमध्ये २५ ते ६५ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. यामुळे भारताची पुढची कामगिरी चांगली राहिल्यास स्टार इंडियाच्या महसुलामध्ये भरघोस वाढ होणार आहे. स्टारच्या सर्वच भाषेतल्या वाहिन्यांची यामुळे चांदी होणार आहे. स्टारच्या आठ वाहिन्यांवर सध्या विश्‍वचषकातले सामने दाखवले जात आहेत. या सामन्यांदरम्यान दाखवल्या जाणार्‍या जाहिरातींच्या प्रती दहा सेकंदांच्या स्लॉटसाठी  १५ ते २० लाख रूपयांची मागणी स्टार इंडियाने केल्याचं कळतंय. साधारण महिन्याभरापूर्वी स्पॉट बुकिंगचा हा दर १२ लाखांदरम्यान होता. पण आता त्यात चांगलीच वाढ झाली आहे. भारताचे साखळीतले तीन सामने उरले आहेत. भारतीय संघाची कामगिरी सुधारल्यावर स्टार इंडियाने जाहिरातींच्या दरात लागलीच वाढ केली. आपल्याकडे साधारण १०० जाहिरातदार असल्याचा दावा स्टारने केला आहे. गेल्या काही वर्षांपेक्षा ही संख्या बरीच जास्त असल्याचं स्टारचं म्हणणं आहे. स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात हे दर अधिक वाढणार आहेत. भारताच्या सामन्यांना मिळणारा टीआरपी पाहता स्टारला हवे तेवढे दर देऊन स्लॉट बुक करण्यावर जाहिरातदारांचा भर राहिल. अजूनही बरेच साखळी सामने बाकी आहेत. त्यामुळे पुढच्या दिवसात स्पर्धेत घडणार्‍या घडामोडींवर  सर्व काही अवलंबून असेल.क्रिकेटच्या विश्‍वचषकाभोवती  जाहिरातदारांचं अर्थकारण कसं ङ्गिरतं हे कळण्यासाठी भारत-पाकिस्तान यांच्या दरम्यानच्या सामन्याचं उदाहरणं पुरेसं ठरेल. या सामन्यासाठी एकंदर ७० जाहिरातदारांना आकर्षित करण्यात स्टार इंडियाला यश आलं होतं. ही जाहिरातदारांची विक्रमी संख्या होती. याआधी कोणत्याही कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर जाहिरारांनी पसंती दिलेली नाही. आयपीएलला प्रत्येक सामन्यासाठी सुमारे २५ जाहिरातदार असतात. एखाद्या मोठ्या बिगबजेट चित्रपटालाही २० ते २५ प्रायोजक मिळतात. पण या हाय प्रोङ्गाइल सामन्याच्या स्लॉटसाठी ७० पेक्षा जास्त जाहिरातदारांनी नोंदणी केली होती. २०११ च्या विश्‍वचषकाच्या अंतिम सामन्याच्या तुलनेत ही संख्या ५० टक्क्यांनी जास्त होती. भारतात हा सामना २८८ दशलक्ष लोकांनी पाहिला. जाहिरातदारांना याचा चांगलाच ङ्गायदा उठवता आला. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये जाहिरातींवर १२०० कोटी रूपये खर्च होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारताची उत्तम कामगिरी आणि जाहिरातींचे चढे दर पाहता हा आकडा ङ्गुगण्याचीच जास्त शक्यता आहे. २०११ च्या विश्‍वचषकात जाहिरातींमधून वाहिनीला ७०० कोटींचं उत्पन्न मिळालं होतं. पण २०१५ मध्ये यापेक्षा दुप्पट कमाई होणार आहे. २०११ च्या विश्‍वचषकाशी तुलना केल्यास यंदाचे जाहिरातींचे दर दुपटीने वाढले आहेत. इंग्रजी आणि हिंदीसोबतच तमिळ, मल्याळम, कन्नड आणि बंगाली अशा चार प्रादेशिक भाषांमध्ये सामने प्रक्षेपित होत आहेत. त्यामुळे जाहिरातदारांमध्ये जास्त उत्साह दिसून येतोय. एकाच वेळी सहा भाषांमध्ये होणारं सामन्यांचं प्रक्षेपण हे या वर्षीचं ठळक़ वैशिष्ट्य म्हणावं लागेल. वाढलेल्या वाहिन्यांमुळेही जाहिरातींमुळे मिळणार्‍या उत्पन्नात वाढ नोंदवण्यात आली आहे. कोणत्याही क्रिकेट स्पर्धेसाठी जाहिरातदारांची संख्या ४५ च्या घरात असते. पण यंदा ती १०० पर्यंत पोहोचली आहे. त्यातच या वर्षीच्या विश्‍वचषकाचं महत्त्व अधोरेखित होतं. मार्केटींगमध्येही यंदा बरेच बदल घडले आहेत. नव्या ब्रँड्‌सनी शिरकाव केला आहे. वोडाङ्गोन, अमूल, हिरो, मारूती सुझुकी, सिएट यासारखे नेहमीचे शिलेदार आहेतच पण ङ्गेवी क्विक, रेमंड, ङ्गेडएक्स या कंपन्याही यंदाच्या विश्‍वचषकात पहिल्यांदाच नशिब आजमावत आहेत. विश्‍वचषकादरम्यान  पहिल्यांदाच या ब्रँडच्या जाहिराती दिसत आहेत. जाहिरातींच्या दरात झालेली विक्रमी वाढ ही प्रत्येक ब्रँडसाठी चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय आहे. ऑन एअर प्रायोजक म्हणून नव्या आठ ब्रँड्‌सनी स्टार इंडियासोबत करार केल्याचं कळतंय. त्यात एअरटेल आणि मारूती सुझुकी हे प्रेझेंटींग स्पॉन्सर्स म्हणून पुढे आले आहेत. भारताच्या चांगल्या कामगिरीमुळे मार्केटींगच्या जगातली चक्रं ङ्गारच वेगाने ङ्गिरली आहेत. यापुढील काळात विश्‍वचषकातली रंगत वाढत जाणार आहे. भारताने उपांत्य आणि अंतिम ङ्गेरीपर्यंत मजल मारल्यास जाहिरातींच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विविध ब्रँड्‌सनी विश्‍वचषकात घेतलेला रस आणि त्यांची वाढलेली संख्या हे यंदाच्या विश्‍वचषकाच्या अर्थकारणाचं ठळक वैशिष्ट्य म्हणायला हवं.
--------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel