-->
डॉक्टरांना आकर्षित करण्यासाठी...

डॉक्टरांना आकर्षित करण्यासाठी...

संपादकीय पान शुक्रवार दि. २२ एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
डॉक्टरांना आकर्षित करण्यासाठी...
सध्या ग्रामीण भागात डॉक्टरांचा असलेला तुटवडा पाहता सध्याच्या सरकारने डॉक्टरांनी ग्रामीण भागात यावे यासाठी अनेक सवलती देण्याचे ठरविले आहे. यापूर्वीच्या सरकारने पदवी झाल्यावर डॉक्टरांना एक वर्षे ग्रामीण भागात नोकरी करण्याची सक्ती केली होती. ज्यांना एक वर्ष नोकरी करावयाची नसेल त्यांना दंड भरण्याची सुविधा देण्यात आली होती. परंतु अनेक डॉक्टर दंड भरण्याच्या तरतुदीचा फायदा उठवित आणि ग्रामीण भागात काम करण्यापासून दूर पळत. परंतु सध्यएाच्या सरकारने डॉक्टरांना अशा प्रकारची सक्ती करण्याऐवजी त्यांना विविध सवलती देऊन ग्रामीण भागाकडे आकर्षित करण्याचे धोरण अवलंबिण्याचे ठरविले आहे. या सवलतीत त्यांना पद्युत्तर शिक्षणास प्रवेश मिळताना खास विचार करणे, तसेच त्यांच्या पगारात भरघोस वाढ करणे याचा समावेश केला जाणार आहे. यापूर्वीच्या कॉंग्रेसच्या सरकारने डॉक्टरांवर सक्ती करुन त्यांना एक वर्ष ग्रामीण भागात काम करण्यास भाग पाडले होते. मात्र अशी सक्ती काही उपयोगास आली नाही. त्यामुळे भाजपाच्या सरकारने आर्थिक व अन्य सवलती देण्याच्या प्रयोगाचा तरी उपयोग होतो किवा नाही ते पहावे लागेल. सध्या आपल्या देशात १७०० माणसांमागे एक डॉक्टर असे प्रमाण आहे. खरे तर जागतिक आरोग्य संघटनेच्या सांगण्यानुसार, एक हजार लोकांमागे एक डॉक्टर असे प्रमाण असण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे गेल्या काही वर्षात बदललेली जीवनशैली व रोगांचे वाढलेले प्रमाण यामुळे रोग झपाट्याने वाढले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात अनेक रोग्यांवर उपचार करायला डॉक्टरच नाहीत अशी स्थिती आहे. अनेक ठिकाणी रुग्णसेवेसाठी उत्कृष्ट रुग्णालय आहे, मात्र डॉक्टर्स नाहीत अशी परिस्थिती आहे. यावर काही तरी उपाय काढण्याची जरुररी आहे. सरकारचा या डॉक्टरांना वेतन वाढवून देण्याच्या निर्णयामुळे फारसा प्रभाव पडेल असे वाटत नाही. कारण या डॉक्टरांना पगाराचे आकर्षण नाही, तर त्यांना वावडे आहे ते ग्रामीण भागाचेे. ग्रामीण भागात आपले सेवा देणे म्हणजे आपला वेळ फुकट घालविणे असेच त्यांना वाटते. शहरी भागात डॉक्टरांना कमविण्याची चांगली संधी असते त्यामुळे हे डॉक्टर्स ग्रामीण भागाकडे पाठ फरवितात. यावर उपाय म्हणून ग्रामीण भागाकरीता एखादा विशेष अभ्यासक्रम सुरु करण्याची आवश्यकता आहे. सरकारने या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
----------------------------------------------------------------------

Related Posts

0 Response to "डॉक्टरांना आकर्षित करण्यासाठी..."

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel