-->
कोहिनूरबाबत यु टर्न

कोहिनूरबाबत यु टर्न

संपादकीय पान शुक्रवार दि. २२ एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
कोहिनूरबाबत यु टर्न
अखेर कोहिनूर हिरा भारतात आणण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात कोहिनूर हिरा      भारतात परत आणणं अशक्य आहे सांगणार्‍या केंद्र सरकारने एका दिवसांत आपल्या भूमिकेवरुन यू टर्न घेतले आहे. यासंबंधी सर्वच पातळ्यावर टीकेचा सुरु उमटल्यावर सरकारला आपली भूमिका बदलणे भाग पडले आहे. प्रसारमाध्यमांनी आमच्या भूमिकेचा चुकीचा अर्थ घेतला गेलं असल्याचंही सरकारने म्हटलं आहे. परंतु सरकारने न्यायालयात जी आपली बाजू मांडली त्याच्या बातम्या प्रसार माध्यमांनी दिल्या आहेत. त्यामुळे यात प्रसार माध्यमांचे काही चुकलेले नाही. मुळात चुकली आहे ती सरकारची भूमिका. कारण न्यायालयात जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा ब्रिटनने भारतावर राज्य करीत असताना येथून लुटून किंवा जबरदस्तीने नेलेला नाही, तर पंजाबच्या तत्कालीन राजाने तो त्यांना भेट दिला आहे. त्यामुळे भारत हा हिरा परत करण्याची मागणी ब्रिटनकडे करू शकत नाही, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयास सांगितले होते. कोहिनूर हिरा ब्रिटनकडून परत मिळविण्यासाठी पावले उचलण्यास केंद्र सरकारला सांगावे, अशी विनंती करणारी ऑल इंडिया ह्युमन राईट्स ऍण्ड सोशल जस्टिस फ्रंटने केलेली जनहित याचिका न्यायालयापुढे आहे. हा हिरा ब्रिटनकडे परत मागण्यात अडचणी येतील, असे वाटत असेल तर सरकारने त्याविषयीची आपली भूमिका स्पष्ट करावी, असे न्यायालयाने ९ एप्रिल रोजी सांगितले होते. त्यावर सॉलिसिटर जनरल रणजीत कुमार यांनी निवेदन केल्यावर न्यायालयाने केंद्र सरकारला सहा आठवड्यांत नेमकी भूमिका स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र करण्यास सांगितले होते. सरकारची ही भूमिका पूर्णपणे चुकीची आहे.  सध्या इंग्लंडच्या राणीच्या मुकुटात असलेला हा कोहिनूर हिरा ब्रिटाशांनी लूट करुन नेलेला आहे. यासंबंधी इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये मतभेद असले तरीही आपण तो निश्‍चितच भेट दिलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. अर्थात ही घटना सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीची असल्यामुळे त्यासंबंधी सबळ पुरावे मिळणे कठीण आहे. मात्र कोहिनूर हिरा हा आपल्याकडीलच होता, यात दुमत असण्याचे काही कारण नाही. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने यावर दावा केला होता. परंतु कालांतराने त्याने मौन बाळगले. असो. कोहिनूर हिरा ही आपल्या अस्मितेचा प्रश्‍न आहे. सध्याचे सरकार हे असेम्ता जपणारे आहे अशी एक समजूत आहे. अशा या सरकारने कोहिनूर हिरा हा येथील राजाने भेट दिला होता असे न्यायालयात निवेदन करणे म्हणजे जनतेच्या अस्मितेशी खेळ करण्याचा हा प्रकार आहे. अशा प्रकारे या निवेदनामुळे आपल्या ज्या अनेक वस्तु ब्रिटीशांनी चोरुन नेल्या होत्या त्या यापुढे मिलविण्यात मोठी अडचण होईल. बॅरिस्टर अंतुले यांनी मुक्यमंत्रीपदी असताना भवानी तलवार देशात आणण्याचा एक प्रमाणिक प्रयत्न केला होता. परंतु त्यात त्यांना काही यश आले नव्हते. आता तर सरकारचा अधिकृतपणे अशा वस्तू आमण्यासाठी खो   घालीत आहे. याविषयी बोंबाबोंब झाल्यावर सरकारने युटर्न तरी घेतले हे बरेच झाले.

0 Response to "कोहिनूरबाबत यु टर्न"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel