-->
जुन्या लोकलना रामराम

जुन्या लोकलना रामराम

संपादकीय पान गुरुवार दि. २१ एप्रिल २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
जुन्या लोकलना रामराम
देशातील डीसी लोकलना आता रामराम करण्यात आला आहे. नुकत्याच या प्रकारातील हार्बर लोकलला शेवटचा सलाम करण्यात आला. तब्बल ४० वर्षापासून सेवेत असलेल्या या लोकल्स त्या काळातील अत्याधुनिक होत्या. परंतु आता या लोकल मागासलेल्या झाल्या. कोंदट, जुन्या अनाकर्षक लोकल्स असे त्याचे अलिकडच्या काळातील वर्णन होते. परंतु एकेकाळी याच लोकल्सने चांगली सेवा बजावली होती. त्याच्या या सेवेची दखल घेत रेल्वेने या शेवटच्या लोकलला दिमाखात, वाजत-गाजत निरोप दिला. आपल्या रेल्वेतील इतिहासातील एक महत्वाचा टप्पा म्हटला पाहिजे. या शेवटच्या लोकलने प्रवास करण्यासाठी रेल्वेने दहा हजार रुपायंचे खास तिकीट ठेवले होते. परंतु अर्थातच त्याला काही प्रतिसाद मिळणे शक्य नव्हते. तसेच झाले व रिकाम्या असलेल्या या लोकलला शेवटचा निरोप देण्यात आला. हार्बर मार्गावर १९२५ म्हणजे तब्बल ९१ वर्षापूर्वी डीसी लोकल चालवण्यात आली होती. त्यानंतर या लोकलची सेवा निरंतर सुरूच होती. सुरुवातीच्या काळात प्रवासी संख्या कमी असल्याने या लोकल प्रवाशांना योग्य सेवा देत होत्या. नंतर काळाच्या ओघात उपनगरातील वाढलेली लोकसंख्या, नव्याने वसलेले नवीमुंबई शहर, यामुळे हार्बर मार्गाची प्रवासी संख्या वाढतच गेली. त्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवासादरम्यान श्वास घेणे देखील कठीण झाले. यामुळे अनेकदा दुर्लक्ष होत असल्याची ओरड प्रवाशांमधून ऐकायला मिळत होती. मात्र, डीसी-एसी परिवर्तन न झाल्याने प्रवाशांना हे चटके सहन करावे लागत होते. गेल्या काही वर्षात डीसी गाड्यांचे परिवर्तन एसी मध्ये करण्यात आले. परिवर्तनाही ही प्रक्रिया पश्‍चिम रेल्वेवर प्रथम त्यानंतर मध्य रेल्वे व आता हार्बर मार्गावरील लोकल्स करण्यात आल्या. हार्बर मार्गाचा विचार केल्यास विद्युत परिवर्तनासाठी या मार्गावर फार अडचणी आल्या नाहीत. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील विद्युत परिवर्तनाचे काम अनेक वर्षे रखडल्याने त्याचा फटका हार्बरला बसला. आता येत्या काळात ताफ्यात येणार्‍या नव्या लोकल आणि आधुनिक तंत्रज्ञानयुक्त लोकल्स हार्बर मार्गावर येतील अशी अपेक्षा करावयास हरकत नाही. डीसी लोकल आता देशातून हद्दपार झाल्या असताना मुंबईत वातानुकुलीत लोकल्सचे युग सुरु होत आहे. मुंबई व त्याच्या भोवतालच्या परिसरासाठी लोकल्स या जीवनवाहिन्याच आहेत. दररोज लाखो प्रवासी त्यातून प्रवास करुन आपल्या नोकरीच्या स्थळी सुखरुप पोहोचतात. मुंबईतील चाकरमन्यांचा हा प्रवास जगातील एकमेव ठरावा असाच आहे. गेल्या काही वर्षात या प्रवासात हळूहळू का होईना सुधारणा होत आहे. परंतु जागतिक पातळीवर ज्या प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहेत तशा सेवा आपल्याकडे मुंबई व त्याच्या उपनगरात व्हायला पाहिजे. जुन्या लोकल्सचा जमाना आता संपला आहे, पुढील काळ तरी चांगल्या लोकल्सचा येवो अशी इच्छा.
----------------------------------------------------------------

0 Response to "जुन्या लोकलना रामराम"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel