संपादकीय पान सोमवार दि. ०५ जानेवारी २०१५ च्या अंकासाठी अग्रलेख --
-------------------------------------------
मलेशियाच्या विमांनाचे दुष्टचक्र
मलेशियाच्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी २०१४ हे वर्ष दुदैवी अपघातांचे ठरले आहे. २८ डिसेंबर रोजी सकाळी इंडोनेशियातील सुरबाया येथून सिंगापूरला निघालेले एअर एशियाचे विमान अपघातग्रस्त झाले. या वर्षी अतिशय गूढ पध्दतीने अपघातग्रस्त होणारे मलेशियाचे हे तिसरे विमान आहे. १७ जुलै रोजी मलेशियन एअरलाइन्सचे एमएच १७ हे विमान युक्रेनच्या दहशतवाद्यांनी पाडले. त्याआधी ८ मार्च रोजी क्वालालंपूरहून बिजिंगला जाणारे मलेशियाचे एमएच३७० हे विमान गायब झाले. या विमानात २३९ प्रवासी होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर या विमानाचा शोध घेतला गेला. अमेरिका, भारत आणि अनेक देश ते विमान शोधण्याचा प्रयत्न करत होते. पण अद्याप त्या विमानाचा थांगपत्ता लागलेला नाही. आता एअर एशियाच्या विमानाबाबत घडले. आधी निर्माण झालेले गूढ आणि नंतर अपघातग्रस्त झाल्याचे समोर आलेलेे सत्य यामुळे विमानक्षेत्राच्या इतिहासात मलेशियन एअरलाईन्सचे झालेले अपघात विलक्षण मानले जातील. क्यूझेड ८५०१ हे विमान गायब होणे काही कमी आश्चर्यकारक नव्हते. या विमानाला खराब हवामानाची सूचना मिळाली होती. पण आधुनिक विमाने आणि अत्याधुनिक तंत्राने प्रशिक्षित झालेल्या विमानचालकांना खराब हवामान ही काही मोठी समस्या वाटत नाही. एअर ट्रॅङ्गीक कंट्रोलशी या विमानाचा संपर्क तुटण्यापूर्वी विमानाच्या पायलटने कोणत्याही संकटाचा इशाराही दिला नव्हता. अखेर जावा समुद्रात बोर्निया बेटांच्या नैऋत्येला अपघातग्रस्त विमानाचे काही अवशेष आणि मृतदेह आढळून आले. एमएच ३७० आणि क्यूझेड ८५०१ ही दोन्ही विमाने अशा तर्हेने गायब झाली की अनेकांना त्याचा धक्काच बसला. एकाच तर्हेने दोन विमाने गायब होणे ही बाब विमानक्षेत्रासाठीच नाही तर विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रासाठीही मोठे आव्हान आहे. विमानांचे असे गायब होणे आणि त्याचे अवशेषच मिळणे किंवा ते ही न मिळणे तर्काच्या पलिकडचे आहे. एमएच ३७० हे विमान ८ मार्च रोजी पहाटे गायब झाले. हे विमान हिंदी महासागरावरून जात असताना आणि मलाया द्वीपकल्पाच्या पश्चिमेला असताना रडारवरून गायब झाले. उपग्रहांवरून मिळालेल्या माहितीच्या आधारे असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की हे विमान ऑस्ट्रेलियाच्या पश्चिमेला हिंदी महासागराच्या दक्षिणेला कुठे तरी दुर्गम भागात कोसळले असावे. या विमानाचा कोणताही अवशेष आतापर्यंत मिळालेला नाही. या विमानाने आपला हवाई मार्ग बदलून अचानक दिशा का बदलली याचाही थांगपत्ता अद्याप लागलेला नाही. १७ जुलै रोजी आणखी एका मलेशियन विमानाला अपघाताला बळी पडावे लागले. यावेळी युक्रेनच्या दहशतवाद्यांनी या विमानाला लक्ष्य केले होते. या विमानातील सगळेच्या सगळे म्हणजे २९८ प्रवासी ठार झाले. रशियाचे समर्थक असलेल्या अतिरेक्यांनी हे विमान पाडले असा आरोप अमेरिका आणि युक्रेनच्या सरकारने केला. अतिरेक्यांनी हे विमान पाडण्यासाठी जमिनीवरून हवेत मारा करणार्या रशियन बनावटीच्या प्रक्षेपणास्त्राचा वापर केला होता. रशियाने या प्रकरणात आपला सहभाग असल्याचा इन्कार केला होता. या घटनेला युक्रेनचे लष्कर जबाबदार असल्याचा उलट आरोप रशियाने केला होता. २०१४ या वर्षात मलेशियाला जितक्या विमान अपघातांचा सामना करावा लागला, तेवढा अन्य एखाद्या देशाला क्वचितच करावा लागला असेल. इतिहासात तरी असे उदाहरण घडलेले नाही. मलेशियाने सरत्या वर्षात विमान अपघातात हजारभर प्रवासी गमावले आहेत. क्यूझेड ८५०१ विमानाच्या बाबतीत काय घडले असेल याविषयी अनेक तर्क लढवले गेले. या विमानात १५५ प्रवासी होते. इंडोनेशियाच्या समुद्रात या विमानाचा शोध घेतला गेला. जावा समुद्राच्या तळाशी विमानाचे अवशेष असू शकतात, असा अंदाज इंडोनेशियाच्या तपास यंत्रणांनी व्यक्त केला. या विमानाचा शोध घेणार्या ऑस्ट्रेलियाच्या विमानाला विमान गायब झालेल्या ठिकाणापासून ११२० किमी अंतरावर काही अवशेष मिळाले. ते या गायब झालेल्या विमानाचेच आहेत हे नंतर स्पष्ट झाले. बेलितुंग नावाच्या बेटावरील काही मच्छिमारांनी विमान गायब झालेल्या ठिकाणी जोरदार स्ङ्गोट झाल्याचा आवाज ऐकला होता. एअर ट्रॅङ्गीक कंट्रोलशी विमानाचा संपर्क तुटला तेव्हाच हा आवाज मच्छिमारांनी ऐकला. तज्ज्ञांच्या मते हे विमान ज्या उंचीवरून उडत होते, ती उंची हल्लीच्या काळात स्वाभाविक मानली जाते. २००४ ते २०१३ या दहा वर्षांच्या काळात झालेल्या विमान अपघातात उंचीमुळे झालेल्या विमान अपघातांचे प्रमाण केवळ १० टक्के आहे. एअर एशियाच्या गायब झालेल्या विमानात अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आली होती. खराब हवामानातही विमानाचे उड्डाण आपोआप नियंत्रित करणारी स्वयंचलित यंत्रणा त्यात होती. मात्र खराब हवामान आणि पायलटची चूक यामुळे विमान अपघातग्रस्त झाल्याची शक्यताही नाकारता येत नाही. अशा प्रकारच्या चुकीमुळे २००९ मध्ये एअर ङ्ग्रान्सचे एक विमान अटलांटीक महासागरात कोसळले होते. एकूणच विमान अपघाताशी निगडीत काही धागेदोरे हाती लागत नाहीत तोपर्यंत केवळ तर्क आणि अंदाजच व्यक्त होत राहणार आहेत. विमानांचे अशा तर्हेने गायब होणे आणि नंतर अपघाताच्या बातम्या येणे किंवा नीट तपशीलच न मिळणे चिंताजनक आहे.
---------------------------------------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा