3 Oct 2013 CHINTAN
ललित मोदींचा खेळ संपला
क्रिकेट या खेळाची लोकप्रियता लक्षात घेऊन त्यातील व्यवसाय ओळखणार्या ललित मोदी यांना बीसीसीआयने अखेर कायमचा दरवाजा दाखविला आहे. जेमतेम तीन वर्षापूर्वी ललित मोदी हे नाव म्हणजे आय.पी.एल.मधील एक चलती नाणे होते. मुळातच ते व्यावसायिक असल्याने त्यांचा पिंड उद्योगातला. त्यामुळे त्यांनी क्रिकेटच्या लोकप्रियतेचा फायदा उठवित लोकांना करमणूक आणि क्रिकेट यांच्या जोडीला सेलिब्रेटींची मांदियाळी करुन आय.पी.एल.चा घाट घातला आणि हा प्रयोग अल्पावधीतच लोकप्रिय करुन दाखविला. क्रिकेटवेड्या रसिकांना प्रामुख्याने तरुण पिढीला ही करमणुकीची क्रिकेट भेळ फारच आवडली. त्यामुळे आय.पी.एल. म्हणजे ललित मोदी असे सूत्र तयार झाले. क्रिकेटमुळे पैशाचा कसा पाऊस पाडता येतो हे त्यांना दाखवून दिले. क्रिकेटची मॅच जिंकणे म्हणजे देशप्रेम असल्याची आजवरची रुजलेली कल्पनाही त्यांनी धुळीस मिळविली. कारण जगातील निवडक आघाडीच्या क्रिकेटपटूंना जवळ करुन त्यांनी संघ तयार केले. क्रिकेटपटूंच्या बोल्या लावल्या. आजवर आपण शत्रू म्हणून पहात असलेल्या पाकिस्तानी खेळाडूंनाही त्यांनी आपल्याच संघात खेळविले. क्रिकेट बघणे ही करमणूक आहे म्हणून त्यासोबत त्यांनी चिअर गर्ल्सही नाचविल्या. अशा प्रकारे क्रिकेटचा त्यांनी मांडलेला बाजार यशस्वी झाला.
या यशाच्या सिक्सरमुळे ललित मोदी यांच्या डोक्यातही हवा गेली. आपण जे करु तीच पूर्व दिशा अशी त्यांची समजूत झाली आणि यातून आय.पी.एल.मध्ये गैरप्रकारांना खतपाणी घातले गेले. आय.पी.एल.चे कमिशनर म्हणून जी गोपनीयता पाळली पाहिजे होती ती त्यांनी पाळली नाही. शेवटी आय.पी.एल.च्या तिसर्या पर्वानंतर आय.पी.एल.नेच ललित मोदी यांच्या नैतिकतेचा बुरखा फाडला. सामना संपल्यावर लगेचच त्यांना बडतर्फ करण्यात आले. कदाचित त्यांना परकीय चलन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी अटक होईल अशी अनेकांना अटकळ होती. परंतु काही राजकारण्यांनी त्यांना वाचविले असे म्हणतात. शेवटी मोदी जे लंडनला जाऊन बसले ते गेली तीन वर्षात मायदेशी परतलेही नाहीत. या काळात ते अज्ञातवासात असल्यासारखेच होते. आता त्यांना बी.सी.सी.आय.ने हाकलून लावल्याने पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले. परदेशातच राहून आपण निर्दोष असल्याचा ते टाहो गेले तीन वर्षे फोडत आहेत. परंतु भारतात येऊन आपण कोणताही गुन्हा केलेला नाही हे सांगण्याची वा सिद्ध करण्याची त्यांची हिंमत झालेली नाही. त्यामुळे यातच काही तरी पाणी मुरते हे स्पष्ट आहे. आता ललित मोदी हे जागतिक स्तरावर आय.पी.एल.च्या धर्तीवर सामने भरविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. मोदी यांना यासाठी आपण सदिच्छा देऊ परंतु भारत सरकारने आय.पी.एल.चे काय करायचे याचा निर्णय घेतला पाहिजे.
मुळातच करोडो रुपयांची उलाढाल असलेली बी.सी.सी.आय.ही खासगी कंपनी म्हणून नोंदविली गेली आहे. यात अनेकांचे म्हणजे विविध पक्षातील नेत्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले असल्याने बी.सी.सी.आय.ला माहितीच्या अधिकारात आणण्याचा क्रीडा मंत्र्यांचा प्रयत्नही फोल ठरला आहे. आय.पी.एल.ची लोकप्रियता कितीही जास्त असली तरीही अशा प्रकारे क्रिकेटचा बाजार मांडावा का याबाबत सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे. मुळातच आय.पी.एल.ने करमणूक आणि क्रिकेटची ही चमचमीत भेळ लोकांना चाखायला दिली खरी पण याचा पायाच अनैतिक असल्याने यातून सट्टेबाजीसारखे अनेक प्रकार होत आहेत. अन्यथा इंग्लंडप्रमाणे आपल्यालाही क्रिकेटवरील सट्टेबाजी अधिकृत करण्याचा धाडसी निर्णय घ्यावा लागेल. यातून सरकारी तिजोरीतही महसुलाची भर पडू शकते. मात्र यातून क्रिकेट रसिकांना चांगल्या क्रिकेटचा विसर पडण्याची शक्यता आहे. यातून ललित मोदी एक नव्हे तर अनेक पैदा होतील. त्यामुळे सरकारने यासंबंधी निर्णय घेण्याची गरज आहे.

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा