-->
अपयश लपविण्याची धडपड

अपयश लपविण्याची धडपड

गुरुवार दि. 22 मार्च 2018 च्या अंकासाठी अग्रलेख- 
-----------------------------------------------
अपयश लपविण्याची धडपड
इराकच्या मोसूलमध्ये चार वर्षांपूर्वी अपहरण केल्या 39 भारतीयांची इसिसच्या अतिरेक्यांकडून हत्या करण्यात आल्याची धक्कदायक माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी संसदेत दिली. या हत्या कधी झाल्या हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही. या भारतीयांच्या शरीरांचे अवशेष मोसूलच्या बदूश गावात एका टेकडीवरील सामूहिक कबरींत सापडले. डीएनए चाचणीद्वारे त्यांची ओळख पटली, असल्याचे स्वराज यांनी सांगितले. 38 अवशेषांचा डीएनए भारतातून पाठवलेल्या नमुन्यांशी जुळला. मृत लोक हे बांधकाम कंपनीत काम करत होते. पैकी 27 पंजाब, 6 हिमाचल, 4 हिमाचल व 2 प. बंगालचे रहिवासी आहेत. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंह अवशेष आणण्यासाठी इराकला जाणार आहेत, त्यानंतर पुढील पंधरवड्यात त्यांचे अवशेष मिळतील अशी अपेक्षा आहे. अशा प्रकारे 39 भारतीयांची हत्या होणे हे भारत सरकारचे मोठे अपयश आहे. एकतर त्यांच्या हत्या होऊ नयेत यासाठी सरकारने काय केले? नेमक्या हत्या कधी झाल्या? सरकारच्या हाती ही बातमी कधी आली? आपली गुप्तचर यंत्रणा काय करीत होती? अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे सरकारकडून अपेक्षित होती परंतु त्यांनी ही उत्तरे देणे टाळले आहे. अशी घटना घडणे ही निंद्यनीय बाब म्हटली पाहिजे. याचा निषेध कडक शब्दात व्हायलाच पाहिजे, यात काही शंका नाही. मात्र सरकार यासंबंधी सर्व माहिती उजेडात आणू इच्छित नाही असेच दिसते. एकप्रकारे आपले आन्तरराष्ट्रीय पातळीवरील अपयश लपविम्याचा प्रयत्न केला जात आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे यांची हत्या झालेली असतानाही नातेवाईंना याची कल्पना न देता सरकारने ही बाब लपविल्याचा संशय आहे. मृतांच्या नातेवाईकांच्या भावनांशी सरकारने खेळ करणे ही निषेधार्थ बाब आहे. जून 2015 मध्ये इराकमध्ये 39 भारतीयांना आय.एस.आय.एस. ने बंदी बनवले होते. मात्र सरकारने ही बातमी फारशी प्रकाशझोतात येऊ दिली नाही. गेल्यावेळी 27 जुलै 2017 मध्ये सभागृहात याची चर्चा झाली होती. त्यावेळी सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या की, जोपर्यंत मला पुरावा मिळणार नाही, तोपर्यंत मी त्यांना मृत घोषित करणार नाही. पुरावे नसताना एखाद्याला मृत घोषित करणे पाप आहे. तसे करणे सरकारसाठी बेजबाबदारपणाचे ठरू शकते. पण जेव्हा केव्हा पुरावे मिळेल तेव्हा संसदेचे अधिवेशन सुरू असेल तर नक्की सभागृहाची परवानगी घेऊन, याबाबत मी माहिती देईल. आता आपण ते वचन पाळाल्याची आठवण करीत स्वराज यांनी ही घोषणा केली. परंतु सुषमा स्वराज या खोटे बोलत आहेत. कारण तेथून सटकण्यात यश आलेल्या 27 वर्षीय हरजित मसिह याने सरकारने भारतीयांचे अपहरण करून त्यांना ठार केल्याच्या वृत्तावर विश्‍वास का ठेवला नाही, असा सवाल केला होता. इसिसच्या जाळ्यातून सुखरूप सुटलेले हरजित मसिह म्हणाले होते की, 11 जून 2014ला केंद्र सरकारला आपण भारतीयांच अपहरण करून हत्या करण्यात आल्याची माहिती दिली होती. इसिसच्या जाळ्यातून सुटलेले मसिह हे एकटेच असल्याचा त्यांना दावा आहे. त्यांच्यासमोर 39 भारतीय मजुरांची हत्या करण्यात आली होती. मसिह त्या 40 नागरिकांमधील एक आहेत. ज्यांचे इराकमधल्या मोसूल शहरात इसिस या दहशतवादी संघटनेने अपहरण केले होते. दहशतवाद्यांनी त्यावेळी बांगलादेशी आणि भारतीयांचे दोन वेगवेगळे गट बनवले होते. तसेच बांगलादेशींना जाण्याची परवानगी दिली होती. हे सर्व मजूर मोसूलमध्ये टेक्सटाइल कारखान्यात कामाला होते. सरकारने मला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते आणि 39 इतरांच्या कुटुंबीयांना खोटी आश्‍वासनं दिली होती. मी 39 लोकांना मारल्याचे वृत्त सरकारला सांगितले होते. परंतु माझ्यावर सरकारने विश्‍वास ठेवला नाही. सरकारने इसिसच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या 39 कुटुंबीयांना खोटी आश्‍वासने दिली, हे मसिह यांचे म्हमणे खोटे म्हणायचे का, असा प्रश्‍न आहे.
मसिह सध्या गुरदासपूरमधल्या बाजारात मजूर म्हणून काम करत आहे. मसिहच्या मते, मला सहा महिन्यांपर्यंत जेलमध्ये ठेवण्यात आले होते, पण मी सरकारला सर्व काही खरे सांगितले होते. त्यावेळी केंद्र सरकारनं माझ्यावर विश्‍वास ठेवला नाही. जवळपास 6 महिने मी तुरुंगात होतो. याची भरपाई कोण करणार?, मसिहच्या कुटुंबीयांनी त्याला इराकला पाठवण्यासाठी 1.5 लाख रुपये उधारीवर घेतले होते. हरजित यांच्या मते, इसिसच्या दहशतवाद्यांनी 40 भारतीयांचे अपहरण करत त्यांचा खून केला. परंतु त्यातून मी थोडक्यात बचावलो आणि लागलीच कारखान्यात गेलो. तिथे मला बांगलादेशी मजुरांनी स्वतःचे कपडे दिले. त्यांच्यासोबत मी अली बनून पळालो. त्यावेळी एका बांगलादेशी नागरिकाने माझी सुषमा स्वराज यांच्याशी संपर्क करून दिला आणि मी भारतात परतलो. परंतु सुषमा स्वराज यांनी हरजित मसिह हा खोटं बोलत असल्याचे सांगितले आहे. मात्र सुषमा स्वराज यांच्या संगण्यानुसार, मसिह यांनी सांगितलेली ही कथा खरी नाही. परंतु प्रश्‍न असा उपस्थित होतो की, मसिह याला खोटे बोलून करायचे तरी काय? त्याला खोटे बोलून काही लाभ तरी होणार नाही. सरकारला मात्र आपली इज्जत वाचवायची आहे, त्यामुळे ते मसिहला खोटे ठरवित आहेत. हे जर खरे असेल तर ते दुर्दैवी असेल.
----------------------------------------------------------

0 Response to "अपयश लपविण्याची धडपड"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel