संपादकीय पान गुरुवार दि. ८ मे २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-------------------------------------
फणस क्रांतींचे कोकणात पडघम
-------------------------------
कोकणचा कॅलिफोर्निया करण्याचे स्वप्न या कोकणी माणसाला शरद पवारांपासून अनेक नेत्यांनी दाखविले. बिचारा कोकणी माणूस आता आपले भविष्य उज्वल आहे अशा स्वप्नातच राहिला. परंतु त्याचे हे स्वप्न काही अजूनही पूर्ण झाले नाही. अर्थात ते स्वप्न काही पूर्ण होणारे नव्हते. कारण शरदरावांना कोकणच्या विकासाचे काही करावयाचेच नव्हते. फक्त स्वप्नच दाखवायचे होते. कोकणाला निसर्गाने आपले अलोट सौदर्य बहाल केले आहे. निळाशार समुद्र आणि आंबा, फणस, काजू, कोकम ही फळे सर्वच खाद्यप्रेमींना भूरळ घालणारी. पाऊसही इकडे भरपूर. त्यामुळे निसर्गराजा कोकणावर नेहमीच बेहद खूष असतो. मात्र कोकणी माणसाला आपल्याकडे असलेल्या साधन समृधीचा वापर करुन आपल्या जीवनात आनंद काही फुलविता आलेला नाही. कोकणातून रेल्वे जाऊनही आपला हा कोकणचा मेवा त्याला देशातील कानाकोपर्यात पोहोचविता आला नाही ही खेदाची बाब आहे. यासाठी लागणारे धडाडीचे नेतृत्व कोकणाला लाभले नाही हे एक आणखी कोकणी माणसाचे दुदैव. मात्र आता केवळ सरकारवर अवलंबून राहून आपला विकास करता येणार नाही. त्यासाठी आपल्यालाच पुढाकार घेऊन आपला विकास साधला पाहिजे ही बाब कोकणी माणसांना पटली आहे. यातून अनेक नव्याने प्रयत्न झाले. कोकणातील रायगड जिल्हा हा मुंबईपासून जवळ असल्याने व बोटीने जोडला गेल्यावर येथील विकास झपाट्याने सुरु झाला. मात्र रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे मात्र त्यातुलनेत विकासाच्या दृष्टीने मागे पडले. एन्रॉन आल्यावर रत्नागिरीचे चित्र पालटेल असे अनेकांना वाटले होते. परंतु एन्रॉन प्रकल्पाना नेहमीच सुरुवातीपासून काही ना काही विघ्नाचा सामना करावा लागला. आतासुध्दा हा प्रकल्प गॅस महाग झाल्याने बंद आहे. त्यापाठोपाठ या किनारपट्टीवर एकूण सहा विद्युत प्रकल्प येणार होते. परंतु यालाही विरोध प्राथमिक पातळीवर झाल्याने या प्रकल्पांचे भवितव्य अंधारातच आहे. कोकणाला प्रामुख्याने तळकोकणाला अशा प्रकारच्या मोठ्या प्रकल्पांपेक्षा लहान पर्यावरण पोषक प्रकल्प आल्यास तेथील विकासाला मोठी चालना मिळू शकते. पर्यटन हा उद्योग जसा इथे विकसीत करण्यास जसा भरपूर वाव आहे त्याचप्रमाणे आंबा व फणस यांच्यावर प्रक्रिया करुन त्याचे विविध पदार्थ बाजारात आणल्यास एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल. गेल्याच आठवड्यात कोकण कृषी विद्यापीठाच्या वतीने फणसावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. फणसाकडे सिंधुदर्ग जिल्ह्याने आजवर दुर्लक्षच केले आहे. फक्त कोकणी माणसाचे मोठेपणा सांगण्यासाठी फणसाची त्याला उपमा दिली जाते. मात्र हा फणस कोकणाची अर्थव्यवस्था पालटू शकतो. तळ कोकणात फणसाला सुरुवातीला चांगली किंमत मिळते. मात्र नंतर भरपूर पीक आल्यावर बाजारपेठ नसल्याने फणस कुसतो. शेवटी नाईलाज म्हणून जनावरांना खायला घालतात. मात्र गेल्या वर्षी कोकण निसर्ग मंचाने चार तालुक्यातून फणस विकत घेऊन दुर्लक्षीत फणसाला राजमान्यता मिळण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. गेल्या वर्षी त्यांनी प्रयोगिक तत्वावर दहा टन फणस विकत घेऊन त्यावर प्रक्रिया केली. यंदा त्यांचा इरादा दोनशे टन फणस खरेदी करण्याचा आहे. याच संस्थेच्या वतीने कोकणात बांबू क्रांती केली होती. लोकांना बांबू लावायला त्यांनी प्रवृत्त केले व आता एका बांबूच्या काठीला शेतकर्याला ५० रुपये मिळत आहेत. कोकण निसर्ग मंचाची बांबूची उलाढाल आता १२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. अशा प्रकारे त्यांनी केलेल्या या प्रयत्नाला चांगले यश आले. आता त्यांनी फणसावर लक्ष केंद्रीत केले आहे. यानंतर अशा प्रकारे अन्य फळांवरही या संस्थेतर्फे लक्ष दिले जाणार आहे. कोकणातील हा प्रयत्न म्हणजे कोकणी माणसाला एक मोठे वरदानच ठरेल असे म्हणावयास काहीच हरकत नाही.
------------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा