संपादकीय पान शनिवार दि. २२ फेब्रुवारी २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
----------------------------------------------------
फेसबुकने का घेतले व्हॉट्स ऍपला ताब्यात?
-------------------------------
सोशल मिडियात हलचल मचविणार्या व्हॅट्स ऍपवर आता फेसबुकने ताबा मिळविला आहे. हल्ली देशभरातील तरुणाईची सकाळ - दुपार - संध्याकाळ- रात्र ज्या व्हॉट्स ऍपनें व्यापून टाकली आहे, ते मसुपरहिट फ्री मेसेजिंग ऍप्लिकेशन आता फेसबुकच्या मालकीचं होणार आहे. तब्बल १९ अब्ज डॉलर्स मोजून आपण व्हॉट्स ऍप विकत घेतोय, अशी दणदणीत घोषणा करून फेसबुक सम्राट मार्क झुकरबर्गनं आज अख्ख्या तंत्रज्ञान विश्वाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. अर्थात, यामुळे ग्राहकांना काडी मात्र परिणाम होणार नसला तरीही फेसबुकला आता एक नवे आयाम यामुळे मिळणार आहे. गेल्या वर्षभरात व्हॉट्स ऍपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चाललेली असताना, सोशल नेटवर्किंग साइट जगतावर अधिराज्य गाजवणा-या फेसबुकला उतरती कळा लागल्याचं चित्र दिसत होतं. त्यामुळे फेसबुकनं वेळीच हातपाय न हलवल्यास त्यांचीही गत ऑर्कुटफसारखीच होईल, असा सल्ला मार्क झुकरबर्गला हितचिंतकांनी दिला होता. त्याचा गांभीर्यानं विचार करून, किसी भी किमत पर व्हॉट्स ऍप खरेदी करण्याचा चंगच मार्कनं बांधला होता. त्यामुळे फेसबुक-व्हॉट्स ऍपमधील या व्यवहाराकडे तंत्रज्ञानविश्वाचं लक्ष लागलं होतं. हे डील अखेर निश्चित झालं आणि तब्बल १९ अब्ज डॉलर्स मोजून फेसबुकनं व्हॉट्स ऍपची मालकी मिळवली. तंत्रज्ञान जगतातील हे आजवरचं सगळ्यात मोठं टेकओव्हर ठरल आहे. चार अब्ज डॉलर रुपये, १२ अब्ज डॉलरचे शेअर आणि व्हॉट्स ऍपच्या संस्थापक, कर्मचा-यांना तीन अब्ज डॉलर देऊन फेसबुकनं हा व्यवहार केला आहे. त्याचप्रमाणे व्हॉट्स ऍपचे सहसंस्थापक आणि सीईओ जॅन कोयूम यांना फेसबुकच्या संचालक मंडळात स्थान देण्यात आलं आहे. येत्या काळात जगभरातील एक अब्ज लोक व्हॉट्स ऍपशी जोडले जाणार आहेत. हा टप्पा म्हणजे मैलाचा दगडच आहे. त्यामुळे जॅन आणि त्याच्या कंपनीसोबत जोडलं जाणं ही आमच्यासाठी नक्कीच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे, अशी भावना मार्क झुकरबर्गनं व्यक्त केली आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचं, त्यांना जवळ आणण्याचं मिशन या अधिग्रहणामुळे शक्य होईल.
व्हॉट्स ऍपची मालकी फेसबुककडे गेली असली, तरी हे ऍप स्वायत्तपणे कार्यरत असेल, असं जॅन कोयूम यांनी स्पष्ट केलं आहे. आजच्यासारखेच अगदी किरकोळ पैसे मोजून स्मार्टफोनधारकांना जगभरात कुठूनही व्हॉट्स ऍपचा पुरेपूर आनंद लुटता येईल. या संवादात जाहिरातींचा अडथळा नसेल, असं त्यांनी अगदी खात्रीपूर्वक सांगितलं. दरम्यान, २०१२ मध्ये फेसबुकनं एक अब्ज डॉलर्सना मइन्स्टाग्रामम खरेदी केलं होतं. परंतु, त्याचा ना फेसबुकला फायदा झाला, ना इन्स्टाग्रामला. उलट, इन्स्टाग्राम काळाच्या ओघात वाहूनच गेलं. आता तसाच प्रकार व्हॉट्स ऍपबाबत होऊ नये, असं फेसबुक, व्हॉट्स ऍप आणि व्हॉट्स ऍपप्रेमींनाही मनापासून वाटतंय. सोशल मिडिया हे क्षेत्र झपाट्याने जसे वाढत चालले आहे तसेच यातील तंत्रज्ञान झपाट्याने बदलत चालले आहे. त्यामुळे सोशल मिडियात वेगाने बदल होत चालले आहेत. अशा वेळी बदलत्या जगाशी जुळवून न घेतल्यास आपण या जगातून फुसले जाऊ अशी अनेकांना भीती आहे. याच भीतीपोटी फेसबूकने हे नवीन टेकओव्हर केले आहे. फेसबूक ही आता शेअर बाजारात नोंद झालेली कंपनी आहे, त्यामुळे त्यांना आता प्रत्येक निर्णयाला समभागधारकांना सामोरे जावे लागते. तत्यामुळे योग्य निर्णय घेऊनच वएाटचाल करावी लागणार आहे. व्हॉटस ऍपचे अस्तित्व आता कायम राहाणार की संपुष्टात येणार हे काळाच ठरवेल. मात्र सोशल मिडिया झपाट्याने बदलत चाललाय हे मात्र खरे आहे.
--------------------------------------
----------------------------------------------------
फेसबुकने का घेतले व्हॉट्स ऍपला ताब्यात?
-------------------------------
सोशल मिडियात हलचल मचविणार्या व्हॅट्स ऍपवर आता फेसबुकने ताबा मिळविला आहे. हल्ली देशभरातील तरुणाईची सकाळ - दुपार - संध्याकाळ- रात्र ज्या व्हॉट्स ऍपनें व्यापून टाकली आहे, ते मसुपरहिट फ्री मेसेजिंग ऍप्लिकेशन आता फेसबुकच्या मालकीचं होणार आहे. तब्बल १९ अब्ज डॉलर्स मोजून आपण व्हॉट्स ऍप विकत घेतोय, अशी दणदणीत घोषणा करून फेसबुक सम्राट मार्क झुकरबर्गनं आज अख्ख्या तंत्रज्ञान विश्वाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. अर्थात, यामुळे ग्राहकांना काडी मात्र परिणाम होणार नसला तरीही फेसबुकला आता एक नवे आयाम यामुळे मिळणार आहे. गेल्या वर्षभरात व्हॉट्स ऍपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चाललेली असताना, सोशल नेटवर्किंग साइट जगतावर अधिराज्य गाजवणा-या फेसबुकला उतरती कळा लागल्याचं चित्र दिसत होतं. त्यामुळे फेसबुकनं वेळीच हातपाय न हलवल्यास त्यांचीही गत ऑर्कुटफसारखीच होईल, असा सल्ला मार्क झुकरबर्गला हितचिंतकांनी दिला होता. त्याचा गांभीर्यानं विचार करून, किसी भी किमत पर व्हॉट्स ऍप खरेदी करण्याचा चंगच मार्कनं बांधला होता. त्यामुळे फेसबुक-व्हॉट्स ऍपमधील या व्यवहाराकडे तंत्रज्ञानविश्वाचं लक्ष लागलं होतं. हे डील अखेर निश्चित झालं आणि तब्बल १९ अब्ज डॉलर्स मोजून फेसबुकनं व्हॉट्स ऍपची मालकी मिळवली. तंत्रज्ञान जगतातील हे आजवरचं सगळ्यात मोठं टेकओव्हर ठरल आहे. चार अब्ज डॉलर रुपये, १२ अब्ज डॉलरचे शेअर आणि व्हॉट्स ऍपच्या संस्थापक, कर्मचा-यांना तीन अब्ज डॉलर देऊन फेसबुकनं हा व्यवहार केला आहे. त्याचप्रमाणे व्हॉट्स ऍपचे सहसंस्थापक आणि सीईओ जॅन कोयूम यांना फेसबुकच्या संचालक मंडळात स्थान देण्यात आलं आहे. येत्या काळात जगभरातील एक अब्ज लोक व्हॉट्स ऍपशी जोडले जाणार आहेत. हा टप्पा म्हणजे मैलाचा दगडच आहे. त्यामुळे जॅन आणि त्याच्या कंपनीसोबत जोडलं जाणं ही आमच्यासाठी नक्कीच आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे, अशी भावना मार्क झुकरबर्गनं व्यक्त केली आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचं, त्यांना जवळ आणण्याचं मिशन या अधिग्रहणामुळे शक्य होईल.
--------------------------------------
0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा