निर्देशांकाची उसळी / सर्वात जुन्या कंपनीचे दिवाळे
बुधवार दि. 25 सप्टेंबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख-
----------------------------------------------
निर्देशांकाची उसळी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कंपनी करात केलेल्या कपातीनंतर देशातील शेअर बाजारात जोरदार तेजी आली आहे. केवळ दोनच दिवसात मुंबई शेअर बाजार निर्देशांक चांगलाच वधारुन 39 हजारांवर पोहोचला. शेअर बाजारात आलेल्या या तेजीने गेल्या तीन महिन्यातील गुंतवणूकदारांचे सर्व नुकसान जवळपास धुवून काढले आहे. शेअर बाजारातील ही उसळी स्वागतार्ह असली तरी आज देशापुढे जी आर्थिक आव्हाने उभी आहेत ते पाहता ही तेजी भविष्यात कितपत टिकेल अशी शंका वाटते. परंतु सध्या सरकारने कंपनी कर कायद्याचा जो निर्णय जाहीर केला आहे त्याचे स्वागत शेअर बाजार करीत आहे. त्यामुळे ही परिपूर्ण तेजी नाही. किंवा सरकारच्या आर्थिक यशाचे ते गमक तर नाहीच नाही. सध्या मोठ्या प्रमाणात आलेल्या तेजीला खर्या अर्थाने कारणीभूत ठरली ती कंपनी करातील कपात. केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये आलेली सुस्ती दूर करण्यासाठी कंपनी करांचे प्रमाण 30 टक्क्यांवरून 22 टक्क्यांवर आणला तसेच नवीन कंपन्यांसाठीचा कंपनी कर 25 टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर आणण्याचाही निर्णय घेतला. मात्र कंपन्यांना कर कमी व वैयक्तीक कर भरणार्यांना जास्त म्हणजे 30 टक्के असे काही विचित्र गणित तयार केले आहे. दहा लाखाच्या वर उत्पन्न असणार्यांना 30 टक्के कर भरावा लागत असल्याने त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. सर्वमान्यांना प्रप्तिकर जास्त आणि कंपन्यांना कमी हा प्राप्तिकर भरणार्यांवर अन्याय ठरावा. मात्र सरकार सध्या यासंदर्भात काही विचार करण्याच्या मनस्थितीत नाही असेच दिसते. कारण त्यांना मंदीचे जे परिणाम झाले आहेत त्यावर तातडीने उपाय योजायचे आहेत. मात्र कितीही काही उपाय केले तरी सध्याची मंदी कमी होण्यासाठी व सध्याच्या उपाययोजनांचे दृश्य परिणाम दिसायला किमान एक वर्ष जावे लागेल. देशांतर्गत बाजारपेठेत वस्तूंची मागणी वाढावी आणि पैसा खेळता रहावा या उद्देशाने शुक्रवारी गोव्यात झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत बर्याच वस्तू आणि सेवांवर आकारण्यात येणार्या कराच्या दरात बदल करण्यात आले. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन व्यवसायाला होणार आहे. या उद्योगांकडून आकारण्यात येणारा कर 28 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर खाली आणण्यात आला आहे. खरे तर पर्यटन उद्योगाला चालना द्यावयाची असेल तर हॉटेल्सवरील कर हा कमीच ठेवला पाहिजे. एकवेळ पंचतारांकित हॉटेल्सवरील कर जास्त ठेवल्यास फार काही परिणाम होणार नाही. तंबाखूजन्य उत्पादनांवर लागणार्या करांमध्ये न झालेल्या बदलांमुळेही शेअर बाजाराला फायदा मिळाला आहे. त्याचबरोबर जागतिक पातळीवरील व्यापारयुद्धाच्या संदर्भात अमेरिका आणि चीन यांच्यातील चर्चा सकारात्मक दिशेने पुढे जाण्याच्या वृत्ताचाही शेअर बाजाराला दिलासा मिळाला. यूएस ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिसने जारी केलेल्या निवेदनानुसार चीनबरोबर दोन दिवसांची चर्चा सकारात्मक ठरली आहे. या चर्चेत व्यापारयुद्ध संपुष्टात आणण्यावर भर देण्यात आला असून, ऑक्टोबरमध्ये होणार्या उच्चस्तरीय बैठकीत सखोल चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळेही शेअर बाजारात सकारात्मक संकेत आले. शेअर बाजारातील ही तेजी दीर्घकालीन असेल का ही मात्र शंका आहे. कारण मुळातच देशाची अर्थव्यवस्था सध्या एका नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या ज्या गतीने तेजी आली तो एक भ्रम आहे. गेल्या तीन महिन्यात प्रामुख्याने अर्थसंकल्प सादर केल्यापासून बाजारात मंदीचे वातावरण घोळत होते. त्यावर केवळ कंपनी कायद्यातील कपात हेच एक उत्तर असू शकत नाही. सरकारने जर कंपनी कर आता कमी केला तर मग तो अर्थसंकल्पात वाढविलाच होता का, असाही सवाल उपस्थित होतो. सध्याच्या मंदीवर शेअर बाजारातील तेजी हा काही उतारा ठरु शकत नाही. काळाच्या ओघात हे सिध्द होईल.
सर्वात जुन्या कंपनीचे दिवाळे
जगातील सर्वांत जुनी म्हणजे 178 वर्षांपासून पर्यटन व्यवसायात कार्यरत असणारी ब्रिटनची थॉमस कूक ही कंपनी निधीअभावी अखेर बंद पडली आहे. पर्यटनासोबत हॉटेल, रीसॉर्ट, विमानसेवा आदी अनेक क्षेत्रांत विस्तारलेली ही कंपनी काही वर्षांपासून तोट्यात असून विशेष सरकारी पॅकेज अथवा अंतर्गत आपत्कालीन निधी उभारण्यात अपयशी ठरल्याने कंपनीचे कामकाज पूर्णत: बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत या कंपनीला टाळे ठोकण्याचा निर्णय घोषित करण्यात आला. मात्र या कंपनीचे भारतातील केंद्र पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहाणार असल्याचे स्पष्ट झाल्याने भारतीय ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. कंपनीवर कर्जाचा डोंगर झाल्याने दैनंदिन व्यवस्थापन खर्च भागवणे कठीण ठरले होते. कंपनीला वाचवण्यासाठी 25 कोटी अमेरिकी डॉलरचे तातडीचे पॅकेज आवश्यक होते. मात्र सरकारी वा अंतर्गत माध्यमातून हा निधी उभारण्यात कंपनीला अपयश आले. कंपनीला आता दिवाळखोरी प्रक्रियेस सामोरे जावे लागेल. या कंपनीचा 16 देशांत कारभार असून कंपनीत एकूण 21 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. यातील नऊ हजार ब्रिटिश आहेत. या सर्वांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे. जागतिक पातळीवरील मंदीचे पडसाद आता उमटू लागले असून त्यातील पहिला बळी थॉमस कूकच्या रुपाने जाहीर झाला आहे.
------------------------------------------------------------------
----------------------------------------------
निर्देशांकाची उसळी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कंपनी करात केलेल्या कपातीनंतर देशातील शेअर बाजारात जोरदार तेजी आली आहे. केवळ दोनच दिवसात मुंबई शेअर बाजार निर्देशांक चांगलाच वधारुन 39 हजारांवर पोहोचला. शेअर बाजारात आलेल्या या तेजीने गेल्या तीन महिन्यातील गुंतवणूकदारांचे सर्व नुकसान जवळपास धुवून काढले आहे. शेअर बाजारातील ही उसळी स्वागतार्ह असली तरी आज देशापुढे जी आर्थिक आव्हाने उभी आहेत ते पाहता ही तेजी भविष्यात कितपत टिकेल अशी शंका वाटते. परंतु सध्या सरकारने कंपनी कर कायद्याचा जो निर्णय जाहीर केला आहे त्याचे स्वागत शेअर बाजार करीत आहे. त्यामुळे ही परिपूर्ण तेजी नाही. किंवा सरकारच्या आर्थिक यशाचे ते गमक तर नाहीच नाही. सध्या मोठ्या प्रमाणात आलेल्या तेजीला खर्या अर्थाने कारणीभूत ठरली ती कंपनी करातील कपात. केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये आलेली सुस्ती दूर करण्यासाठी कंपनी करांचे प्रमाण 30 टक्क्यांवरून 22 टक्क्यांवर आणला तसेच नवीन कंपन्यांसाठीचा कंपनी कर 25 टक्क्यांवरून 15 टक्क्यांवर आणण्याचाही निर्णय घेतला. मात्र कंपन्यांना कर कमी व वैयक्तीक कर भरणार्यांना जास्त म्हणजे 30 टक्के असे काही विचित्र गणित तयार केले आहे. दहा लाखाच्या वर उत्पन्न असणार्यांना 30 टक्के कर भरावा लागत असल्याने त्यांच्यात मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे. सर्वमान्यांना प्रप्तिकर जास्त आणि कंपन्यांना कमी हा प्राप्तिकर भरणार्यांवर अन्याय ठरावा. मात्र सरकार सध्या यासंदर्भात काही विचार करण्याच्या मनस्थितीत नाही असेच दिसते. कारण त्यांना मंदीचे जे परिणाम झाले आहेत त्यावर तातडीने उपाय योजायचे आहेत. मात्र कितीही काही उपाय केले तरी सध्याची मंदी कमी होण्यासाठी व सध्याच्या उपाययोजनांचे दृश्य परिणाम दिसायला किमान एक वर्ष जावे लागेल. देशांतर्गत बाजारपेठेत वस्तूंची मागणी वाढावी आणि पैसा खेळता रहावा या उद्देशाने शुक्रवारी गोव्यात झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत बर्याच वस्तू आणि सेवांवर आकारण्यात येणार्या कराच्या दरात बदल करण्यात आले. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन व्यवसायाला होणार आहे. या उद्योगांकडून आकारण्यात येणारा कर 28 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर खाली आणण्यात आला आहे. खरे तर पर्यटन उद्योगाला चालना द्यावयाची असेल तर हॉटेल्सवरील कर हा कमीच ठेवला पाहिजे. एकवेळ पंचतारांकित हॉटेल्सवरील कर जास्त ठेवल्यास फार काही परिणाम होणार नाही. तंबाखूजन्य उत्पादनांवर लागणार्या करांमध्ये न झालेल्या बदलांमुळेही शेअर बाजाराला फायदा मिळाला आहे. त्याचबरोबर जागतिक पातळीवरील व्यापारयुद्धाच्या संदर्भात अमेरिका आणि चीन यांच्यातील चर्चा सकारात्मक दिशेने पुढे जाण्याच्या वृत्ताचाही शेअर बाजाराला दिलासा मिळाला. यूएस ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिसने जारी केलेल्या निवेदनानुसार चीनबरोबर दोन दिवसांची चर्चा सकारात्मक ठरली आहे. या चर्चेत व्यापारयुद्ध संपुष्टात आणण्यावर भर देण्यात आला असून, ऑक्टोबरमध्ये होणार्या उच्चस्तरीय बैठकीत सखोल चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळेही शेअर बाजारात सकारात्मक संकेत आले. शेअर बाजारातील ही तेजी दीर्घकालीन असेल का ही मात्र शंका आहे. कारण मुळातच देशाची अर्थव्यवस्था सध्या एका नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या ज्या गतीने तेजी आली तो एक भ्रम आहे. गेल्या तीन महिन्यात प्रामुख्याने अर्थसंकल्प सादर केल्यापासून बाजारात मंदीचे वातावरण घोळत होते. त्यावर केवळ कंपनी कायद्यातील कपात हेच एक उत्तर असू शकत नाही. सरकारने जर कंपनी कर आता कमी केला तर मग तो अर्थसंकल्पात वाढविलाच होता का, असाही सवाल उपस्थित होतो. सध्याच्या मंदीवर शेअर बाजारातील तेजी हा काही उतारा ठरु शकत नाही. काळाच्या ओघात हे सिध्द होईल.
सर्वात जुन्या कंपनीचे दिवाळे
------------------------------------------------------------------
0 Response to "निर्देशांकाची उसळी / सर्वात जुन्या कंपनीचे दिवाळे"
टिप्पणी पोस्ट करा