-->
संपादकीय पान गुरुवार दि. ६ फेब्रुवारी २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
---------------------------------------
गुन्हेगारांसाठी कारागृह हे शिक्षा भोगण्याचे ठिकाण की करमणूक केंद्र?
-------------------------------
गेली बारा वर्षे मुंबईच्या कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड अबू सालेम याने लखनौला जाणार्‍या ट्रेनमध्ये मुंब्र्यातील एका मुलाशी लग्न केल्याची बातमी प्रसिध्द झाली आहे. या बातमीने वाचकांना आश्‍चर्य वाटेलही. परंतु यात आश्‍चर्य असे वाटण्यासारखे काहीच नाही. कारण अनेकदा गुन्हेगारांसाठी कारागृह ही सुरक्षित असल्याने ते बाहेर राहाण्यापेक्षा कारागृहात राहून जगणे पसंत करतात. तेथे त्यांचे आयुष्य ऐशोआरामात चालू असते. तसेच फुकटची सरकागरी सुरक्षा ही तैनात असते. अबू सालेम हा ऐकेकाळी टॅक्सी चालक म्हणून मुंबईत काम करीत होता. नंतर तो गुंडगिरीकडे वळला आणि कुख्यात गुंड म्हणून ओळखला गेला. एक माफिया डॉन म्हणून तो जगात ओळखला गेला. भारतात प्रामुख्याने मुंबईत त्याने अंडरवर्ल्डमध्ये आपला एक वचक निर्माण केला होता. गोवा स्वतंत्र्य होण्याअगोदर जर तुमचे पालक गोव्याचे रहिवासी असतील तर पोर्तुगालचे नागरिकत्व मिळण्याची तरतूद पोर्तुगाल सरकारने उपलब्ध केली आहे. पंधरा वर्षापूर्वी याचा फायदा उठवित अबू सालेमने बनावट कागदपत्रे तयार करुन पोर्तुगालचे नागरिकत्व मिळविले. मात्र नंतर त्याला विविध गुन्ह्याखाली पोर्तुगालने पकडले. त्यानंतर अबू सालेम हा मुळचा भारतीय नागरिक असल्याने त्याला भारतात हस्तांतरीत केले. परंतु पोर्तुगालमध्ये फाशीला बंदी असल्याने भारताने त्याला फाशी देऊ नये या अटीवर हा गुन्हेगार देण्यात आला. त्यामुळे अबू सालेम अधिक सुरक्षित झाला. त्याला फाशी देता येणार नाही हे नक्की झाल्यामुळे तो आता जन्मठेप भोगत आहे. सुरुवातीपासून अबू सालेम हा विलासी वृत्तीचा मम्हणून ओळखला जातो. आजही तो ज्यावेळी कारागृहाबाहेर न्यायालयात उपस्थित राहाण्यासाठी येतो त्यावेळी त्याचे कपडे हे उत्तम प्रतिचे असतात. त्यावरुन हे गुन्हेगार किती ऐशोआरामात जगतात हे स्पष्ट दिसते. आता तर त्याने मुंब्रा येथे राहाणार्‍या मुलीशी लग्न केले आहे. गंमंत म्हणजे पोलिसांच्या साक्षीने हे लग्न लखनौला एका न्यायालयाच्या खटल्यासाठी जात असताना ट्रेनमध्ये करण्यात आले. त्यासाठी मुंबईहून फोनवरुन निकाह काझीने लावला. अबू सालेमची बायको कोण आहे हे अजून जाहीर झालेले नसले तरी ती फारशी परिचित नाही. तसेच अनेकदा ती अबू सालेम न्यायालयात आला की टाडा कोर्टोत हजेरी लावले असे सांगतात. असे बोलले जाते की, अबू सालेमचे जे अधिकृत व अनधिकृत व्यवसाय आहेत ते सध्या तिच्यातर्फे सांभाळले जातात. एका बनावट पासपोर्टप्रकरणी अबू सालेमला लखनौला न्यायालयात हजर करण्यासाठी नेले जात असताना हे लग्न झाले. अर्थातच पोलिसांच्या मूक परवानगी शिवाय हे लग्न होणे अशक्यच आहे. या घटनेबाबत पोलिसांनी सावध पवित्रा घेतला आहे. अबू सालेमला सुरक्षित नेणे व त्याला पुन्हा तुरुंगात घेऊन येणे ही आमची जबाबदारी होती. त्या दरम्यानच्या काळात तो जर कोणाशी बोलला असेल तर आम्हाला कल्पना नाही असे पोलिसांचे सांगणे म्हणजे अप्रत्यक्षरित्या अबू सालेमच्या लग्नाचा कबुलीजबाबच आहे. यापूर्वी त्याच्या बरोबर पोर्तुगालमध्ये राहात असलेली त्याची अभिनेत्री मैत्रीण मोनिका बेदी हिच्याशी देखील त्याने विवाह केला होता. परंतु त्याचा इन्कार केला होता. मोनिक बेदी हिने आपली शिक्षा भोगली व नंतर बाहेर येऊन तिने सिनेसृष्टीतही प्रवेश केला. अबू सालेम हा एक सराईत गुन्हेगार असून कारागृहात राहून पोलिसांच्याच आशिर्वादाने सर्व कारभार करणे पसंत करतो. केवल तोच नव्हे तर असे अनेक गुन्हेगार आहेत. त्यामुळे आपल्याकडे कायदा हा सर्वांसाठी सारखा नसतो हेच खरे.
--------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel