संपादकीय पान गुरुवार दि. ६ फेब्रुवारी २०१४ च्या अंकासाठी अग्रलेख --
---------------------------------------
भारतीय बुध्दीमत्तेचा जागतिक गौरव
----------------------------
क्रिकेटचा बादशहा सचिन तेंडूलकर व संशोधन क्षेत्रातील आन्तरराष्ट्रीय किर्तीचे शास्त्रज्ञ प्रा. सी.एन.आर.राव यांना भारतरत्न हा सर्वोच्च किताब बहाल केला जात असताना आपल्या भारतीय बुद्धीमत्तेचा जागतिक पातळीवर गौरव केला जात होता. जगातील आय.टी. उद्योगातील नंबर एकची कंपनी मायक्रोसॉफ्टच्या मुख्य कार्यकारी संचालकपदी भारतीय वंशाच्या सत्या नाडेला यांची निवड झाल्याने प्रत्येक भारतीयाची मान गैरवानेच उंचावेल. बैध्दीक संपत्तीच्या जोरावर जगात प्रथमच अब्जावधी रुपयांची मालमत्ता कमविणार्या बिल गेटस् यांच्या मालकीची मायक्रोसॉफ्ट ही कंपनी आहे. तब्बल ७८ अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या मायक्रोसॉफ्ट या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी एका ४६ वर्षीय भारतीयाची नियुक्ती होणे हा आपल्या देशातील बौध्दीक संपत्तीचा गौरव आहे. हैदराबाद येथे जन्मलेले व तेथे शिक्षण घेतलेले सत्या यांनी २२ वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्टमध्ये प्रवेश केला. बिल गेटस् यांनी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सूत्रे २००० साली सोडल्यानंतर स्टीव्हन बॉल्मर यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर आता सत्या यांची नियुक्ती झाली आहे. क्रिकेटचे प्रचंड चाहते असलेल्या सत्या यांनी मणिपालच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर अमेरिकेतून एम.बी.ए. केले. सत्या यांचे वडिल बी.एन.युगांधर हे १९६२ सालच्या कॅडरचे आय.ए.एस. अधिकारी होते. तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांचे ते प्रदीर्घ काळ मुख्य सचिव होते. तसेच नियोजन आयोगाचे सदस्य देखील होते. अशा प्रकारे एका सुक्षिशित घरातून आलेले सत्या आपली अर्थव्यवस्था खुली होण्यास सुरुवात झाली त्यावेळी म्हणजे २२ वर्षांपूर्वी अमेरिकेत गेले. अर्थात त्या काळी अमेरिकेत जाऊन शिक्षण घेणे किंवा तेथे नोकरी करणे हे मोठे कौतुकास्पद होते. आता अमेरिकेला जाण्याचे स्वप्न प्रत्येक मध्यमवर्गीय तरुण मुले आपल्या उराशी बाळगत आहेत. परंतु सत्या यांनी अमेरिकेत पाऊल टाकले त्यावेळी अशी परिस्थिती नव्हती. १९६६ नंतर जे अमेरिकेला अभियंते गेले त्यात बहुतांशी आय.आय.टी.तून शिकलेल्यांचा जास्त भरणा होता. मात्र अमेरिकेला जाण्याचा सर्वात मोठा ओघ हा १९९० नंतरच म्हणजे अर्थव्यवस्था खुली होण्यास सुरुवात झाल्यानंतर सुरु झाला.अमेरिकेत जाऊन त्यांनी एम.बी.ए. तरी केले किंवा अभियांत्रिकेतील उच्च शिक्षण घेतले. यातील अनेक जण अभियांत्रिकी पार्श्वभूमी असले तरी वित्तीय क्षेत्रात रमले. तर काही कंपन्यांमध्ये राहून त्यांनी आपल्या बुध्दीमत्तेची तल्लखता दाखविली. यातील काही जमांनी आपले स्वत:चे उद्योगधंदे स्थापन केले. आपल्याकडे त्यावेळी एखादा उद्योगधंदा सुरु करणे म्हणजे एक मोठे दिव्यच होते. नोकरशाहीची असलेली पकड नवीन उद्योजकांना काही वाव देत नव्हती. अजही या स्थितीत काही प्रमाणात अपवाद वगळता बदल झालेला नाही, ही दुदैवाची गोष्ट आहे. जर या तल्लख बुध्दीमत्तेच्या भारतीयांना इथे उद्योगधंदे स्थापण्यात सुलभपणा उपलब्ध करुन दिला असता तर ते कदाचित अमेरिकेला गेलेही नसते.असो. अमेरिकेत आय.टी. उद्योगाची पंढरी म्हणून ओळखल्या गेलेल्या सिलिकॉन व्हॅलीत आज जे हजारो भारतीय आहेत त्यातील बहुतांशी हे दक्षिणेतील व महाराष्ट्रातील उद्योजक वा नोकरपेशी मंडळी आहेत. हे सर्व जण दोन दशकांपूर्वी तेथे गेलेले आहेत. सत्या हे त्याच पिढीतील आहेत. अमेरिकेत अशा प्रकार लहान-मध्यम आकाराचे उद्योग काढून त्यात यशस्वी होणारे अनेक उद्योजक हे भारतीय आहेत. त्याच्या जोडीला नोकरीतही सर्वोच्च स्थानावर पोहोचलेले अनेक भारतीय विदेशात प्रामुख्याने अमेरिकेत अनेक आहेत. यातील नामवंतांच्या यादीत इंद्रा नुई (पेप्सी), अन्शु जैन(डॉईश बॅक), इव्हान मेन्झिस (डिआजिओ), राकेश कपूर (रॅकिट अँड कोलमन), अजित जैन (हॅथवे समूह), अजय बांगा (मास्टरकार्ड), पियुश गुप्ता (डी.बी.एस. समूह), संजय मेहरात्रा (सॅनडिस्क), संजय झा (ग्लोबल फाऊंड्रिज), शंतनू नारेन (ऍडोबे), दिनेश पालिवाल (हरमन), राजीव वासुदेवा (इगॉन) यांचा समावेश आहे. आज अशा अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचे नेतृत्व करण्याची संधी भारतीयांना मिळाली आहे. अर्थातच त्यांनी त्यांचे कर्त्वृत्व सिध्द करुन दाखविल्याने त्यांना ही कंपनीतील सर्वोच्च पद संपादन करता आले आहे. भारतासारख्या एका विकसनशील देशातून येऊन तेथील अनेकांनी लढत देत सर्वोच्च स्थानावर पोहोचणे ही बाब काही सोपी नाही. अनेक भारतीयांनी हे सिद्द करुन आपली बुध्दीमत्ता विकसीत देशातील लोकांपेक्षा काही कमी नाही हे दाखवून दिले आहे. गेल्या पाच वर्षात अशा भारतीयांची संख्या झपाट्याने वाढली. याचे आणखी एक कारण म्हणजे भारतीय माणसाने आपले नाव व दर्जाच्या बरोबरीने आपल्या कामातील कार्यक्षमता तेथील अमेरिकनांना दाखवून दिली आहे. आता आपल्या देशातील पुढील पिढी याहून दोन पावले पुढे जाईल यात काही शंका नाही. अर्थात हे पुढचे पाऊल म्हणजे जसे बिल गेटस, मार्क झुकरबर्ग सारखे बुध्दीवंत भारतात जन्माला येण्याची वेळ आहे. अमेरिकेत भांडवलशाही असूनही त्यांचे जगावर वर्चस्व कशात आहे तर ते केवळ लष्करी सामर्थ्यावर नाही तर ते त्यांच्या संशोधनातून निर्माम झालेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यात आहे. आज अमेरिकेच्या बहुराष्ट्रीय कंपन्या जगात आपले पंख पसरुन आहेत आणि आपल्या बैध्दीक सामर्थ्याच्या जीवावर त्यांनी हे साध्य केले आहे. भारतात अशा प्रकारे बिल गेटस् किंवा झुकरबर्ग जन्माला येतील त्यावेळी भारत जगावर राज्य करेल आणि तो दिवस फारसा लांब नाही.
-------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा