-->
संपादकीय पान--चिंतन--१२ डिसेंबर २०१३च्या अंकासाठी--
-------------------------------------
व्यावसायिक स्पर्धक झाले मित्र
----------------------------
उद्योगात आणि राजकारणात मित्र आणि शत्रू कायम नसतात. परिस्थितीनुसार या दोन क्षेत्रात मित्र आणि शत्रूही बदलत असतात असे म्हणतात. राजकारणातली याबाबतची चर्चा आपण वेगळी ठवू. परंतु उद्योगात कालपर्यंत एकमेकांचे असलेले स्पर्ध रिलायन्स आणि भारती एअरटेल हे आता एकत्र आले आहेत. आपल्या व्यवसायिक फायद्यासाठी त्या दोघांना एकत्र येणे गरजेचे वाटले आणि त्यामुळेच हे दोघे एकत्र आले आहेत. गंमतीचा भाग म्हणजे, धाकटे बंधू अनिल अंबानी यांची कंपनी जागतिक स्तरावर ऑप्टिक फायबरचे जाळे विस्तारण्याच्या तयारीत असतानाच थोरल्या मुकेश अंबानी यांनी एक पाऊल पुढे टाकत दूरसंचार क्षेत्रामधील भविष्यातील स्पर्धक भारती एअरटेलबरोबरशी सहकार्याचा अभूतपूर्व पवित्रा घेतला. रिलायन्स कम्युनिकेशन्सद्वारे अनिल अंबानी समुद्राखालून ऑप्टिक फायबर टाकून उच्च तंत्रज्ञान पर्याय भक्कम करू पाहत असतानाच फोर जी सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात येऊ पाहणार्‍या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने दूरसंचार पायाभूत सेवा भागीदारीसाठी एअरटेलबरोबर एका कराराद्वारे जाणे पसंत केले आहे. रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल यांच्यातील याबाबतचा करार झाला त्यावेळी कॉर्पोरेट क्षेत्रात अनेकांचा भुवया उंचावल्या होत्या. शहरांमध्ये, समुद्राखालील केबल तसेच टॉवर आणि इंटरनेट ब्रॉडबॅण्ड सेवेसाठी हा करार करण्यात आल्याचे उभय कंपन्यांनी एका संयुक्त पत्रकाद्वारे जाहीर केले. पंजाब परिमंडळामध्ये ४जी सेवेचे जाळे सुधारण्यासाठी रिलायन्सने भारतीबरोबर सहकार्य करत या व्यवसाय भागीदारीचा शुभारंभ केला. नजीकच्या भविष्यात टुजी, थ्रीजी या रोमिंग सेवाही याअंतर्गत पुरविल्या जातील. एकूणच दूरसंचार व्यवसायातील आवश्यक सर्व बाबींकरिता हा करार करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ ही देशव्यापी फोर जी सेवेचे परवाने मिळविणारी एकमेव कंपनी आहे. अति जलद तंत्रज्ञानासाठी ही सेवा ओळखली जाते. कंपनी तिची फोर जी सेवा लवकरच सुरू करणार आहे. भागीदार कंपनी एअरटेल सध्या फोर जी सेवा निवडक शहरांमध्ये पुरविते. भारतीमार्फत तूर्त आय टूआय ही समुद्राखालील केबल रिलायन्सला पुरविण्याचे सहकार्य आहे. याच वर्षांत रिलायन्स जिओने अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सबरोबरही दूरसंचार पायाभूत सेवा करार केला. याच माध्यमातून अंबानी बंधूंमधील २००५ पासूनचे व्यवसाय विभक्तीकरण संपले होते. फोर जी हे भविष्याचे तंत्रज्ञान ठरणारआ हे. तसेच आता भविष्यात सर्व उद्योगांचा पाया हा इंटरनेटवर आधारित असेल. त्यामुळे इंटनेटवर आधारित उद्योगांना भवितव्य उत्तम आहे. तसेच जेवढे गतीमान इंटरनेट असेल तेवढी त्याला मागणी राहाणार आहे. अशा स्थितीत प्रत्येक कंपनीने पायाभूत सुविधांवर विनाकारण खर्च करीत बसण्यापेक्षा एकाच कंपनीच्या सुविधा वापरल्यास कमी खर्चात जास्त नफा कमविता येणार आहे. या हेतूने रिलायन्स आणि भारती एकत्र आले आहेत. याच सूत्रांवर आधारित आता मोबाईल कंपन्यांनी आपले स्वत:चे टॉॅवर उभारण्यापेक्षा अनेक कंपन्यांसाठी एकाच टॉवरवर सेवा उपलब्ध करुन देण्याचा पर्याय उपलब्ध केला. यामुळे मोबाईल कंपन्यांचा पायाभूत सुविधांवरील खर्च मोठ्या प्रमाणात वाचला. याच व्यवसायात मुकेश यांचे बंधू अनिल अंबांनी हे देखील आहेत. पूर्वीसारखे आता या बंधूंमध्ये काही वितुष्ट राहिललेले नाही. अशा वेळी नजिकच्या काळात भारती व मुकेश यांच्या या संयुक्त प्रकल्पात अनिल सहभागी ाजल्यास आश्‍चर्य वाटावयास नको.
-------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel