-->
पत्रयुध्द सुरुच

पत्रयुध्द सुरुच

संपादकीय पान गुरुवार दि. 3 नोव्हेेंबर 2016 च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
पत्रयुध्द सुरुच
टाटा समूह विरुध्द सायरस मिस्त्री यांच्यातील पत्र युध्द काही नजिकच्या काळात संपेल असे काही दिसत नाही. टाटा समूहावर हल्ला चढविताना सायरस मिस्त्री यांनी पोकळ दावे आणि दुर्भावनायुक्त आरोप केल्याचे स्पष्ट करत टाटा सन्सने मिस्त्री यांनी मोठया प्रमाणावर संचालक मंडळावरील सदस्यांचा विश्‍वास गमावल्याचा दावा केला. मिस्त्री यांना अध्यक्ष म्हणून सर्वाधिकार दिले होते, असेही समूहाने दिलेल्या प्रत्युत्तरात नमूद केले आहे. मिस्त्री यांनी लिहिलेले पत्र प्रसिद्ध होणे दुर्दैवी असून यामुळे त्यांनी कर्मचार्‍यांमध्ये समूहाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपकाही समूहाने ठेवला आहे. टाटा समूहातून अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना काढून टाकल्यानंतर मिस्त्री यांनी समूहाच्या संचालक मंडळ तसेच विश्‍वस्तांना लिहिलेल्या इ-मेलमध्ये समूहाच्या एकूणच कारभारावर टीका केली होती. याबाबत टाटा समूहाच्या प्रवत्याने प्रसिद्धीपत्रक जारी केले. त्यात मिस्त्री यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला गेला होता. आपल्याला कर्जबुडवा अध्यक्ष म्हणून पुढे केले गेल्याचा मिस्त्री यांचा आरोपही निराधार असल्याचे समूहाने म्हटले आहे. टाटा समूह आणि तिच्या कंपन्या यांचे नेतृत्व करण्यासाठी कार्यकारी अध्यक्षाला पूर्ण अधिकार होते, असे नमूद करत टाटा सन्सच्या पत्रात, टाटा समूहाने घेतलेल्या निर्णयांमध्ये माजी अध्यक्षांचाही सहभाग होता, असे म्हटले आहे. पदावरून काढताच मिस्त्री यांनी आरोपांचा सपाटा लावला, अशी टीकाही या पत्रात करण्यात आली आहे. सायरस मिस्त्री, माजी अध्यक्ष, टाटा सन्स हे समूहाच्या संचालक मंडळात 2006 पासून आहेत. नोव्हेंबर 2011 मध्ये त्यांची नियुक्ती उपाध्यक्ष म्हणून करण्यात आली. 28 डिसेंबर 2012 मध्ये ते टाटा सन्सचे अध्यक्ष बनले. तेव्हा टाटा समूहाच्या संपूर्ण संस्कृती, कंपनी सुशासन तसेच वित्तीय बाजुंबाबत ते पूर्णपणे अवगत होते. मिस्त्री यांनी संचालक मंडळ सदस्यांना पत्र लिहून त्यांच्याप्रतीही अविश्‍वास दाखविला असून समूहाच्या हजारो कर्मचार्‍यांच्या नजरेतही प्रतिमा खराब केली आहे, असे पत्रात म्हटले आहे. सध्या सुरु असलेली उभयतांतील ही पत्रबाजी लक्षात घेता टाटा समूहातील कर्मचार्‍यांचे, समभागधारकांचे सनोधैर्य खचले जाण्याची शक्यता जास्त आहे. टाटा समूहातील बहुतांशी कंपन्या या शेअर बाजारात नोंदणीकृत आहेत, त्यामुळे त्या समभागधारकांना उत्तरदाखल आहेत. या सर्वांची तयारी टाटा समूहाने व टाटा सन्सने ठेवावी.
------------------------------------------------------------

0 Response to "पत्रयुध्द सुरुच"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel