संपादकीय पान--चिंतन--११ डिसेंबर २०१३च्या अंकासाठी--
-------------------------------------
कॉँग्रेसच्या दिग्गजांच्या लोकसभेच्या जागा धोक्यात
-----------------------------
नुकत्याच झालेल्या चार राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे विश्लेषण पाहिल्यास अनेक कॉँग्रेसच्या दिग्गजांच्या लोकसभा मतदारसंघातील जागा धोक्यात आल्या आहेत. कॉँग्रेसच्या विरोधी लाट आली की त्यात अनेक जण होरपळतात, मग त्यात अनेक नामवंत नेतेही सुटलेले नाहीत. अगदी पंतप्रधान इंदिरा गांधींनाही लोकसभेची जागा गमवावी लागली होती. आता अशीच कॉँग्रेस विरोधी आलेली लाट येत्या काही महिन्यात तीव्र होणार अशी चिन्हे दिसत आहेत.नुकत्याच झालेल्या राजस्थान व मध्यप्रदेशातील निवडणुकांत अनेक कॉँग्रेसच्या दिग्गजांना फटका बसला आहे. केंद्रीय मंत्री सचिन पायलट यांच्या अजमेर लोकसभा मतदारसंघातील सर्वच्या सर्व आठ विधानसभा मतदारसंघातील जागा कॉँग्रेसने गमावल्या आहेत. तर जोधपूर मतदारसंघातील चंद्रेशकुमारी कोटचा यांच्या मतदारसंघातील दहा विधानसभा जागांपैकी कॉँग्रेसला फक्त एक राखता आली आहे.केंद्रातील राज्यमंत्री जीतेंद्रसिंग अल्वर यांच्या मतदारसंघातील सर्वच्यासर्व म्हणजे आठही विधानसभा जागांवर कॉँग्रेसला पराभव पत्करावा लागला आहे.अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीचे महासचिव सी.पी. जोशी यांच्या भीलवारा लोकसभा मतदारसंघातून आठपैकी केवळ दोनच विधानसभेच्या जागांवर कॉँग्रेसला विजय मिळविता आला आहे. जोशी ज्या मतदारसंघातून पूर्वी निवडणूक लढवित त्या नाथवारातून कॉँग्रेसला चार जागा गमवाव्या लागल्या आहेत. मध्यप्रदेशातील गुना लोकसभा या मतदारसंघातील कॉग्रेसचे तरुण नेते ज्योर्तिदित्य शिंदे यांच्या मतदारसंघात आठपैकी पाच जागांवर कॉग्रेसचा पराभव झाला आहे. या मतदारसंघावर शिंदे यांचा ऐवढा जबरदस्त प्रभाव आहे की ऐवढ्या विझानसभेच्या जागा त्यांनी गमाविणे आश्चर्यकारकच म्हटले पाहिजे. त्याचबरोबर शिंदे घराण्याचे प्रभूत्व असलेल्या ग्वॉलेर-चंबळ या भागातील ३४ जागांपैकी केवळ १० जागाच कॉँग्रेस स्वत: केड राखू शकली आहे. कॉंग्रेससाठी व शिंदे यांच्यासाठीही हा एक धोक्याचा सिग्नल समजला जात आहे. राहूल गांधी यांचे निकटच्या म्हणून ओळखल्या गेलेल्या मिनाक्षी नटराजन यांच्या मदसूर लोकसभा मतदारसंघातील आठही जाागंवर कॉँग्रेसचा सफाया झाला आहे. रतलाम लोकसभा मतदारसंघ हा माजी केंद्रीय मंत्री कांतीलाल भूरिया यांचा. येथूनही आठ विधानसभा जागांवर कॉँग्रेसचा पराभव झाला आहे. केंद्रीय मंत्री कमलनाथ यांच्या चिंदवारा लोकसभा मतदारसंघातून तीन जागा कॉँग्रेसला गमवाव्या लागल्या आहेत. दिल्लीत तर कॉँग्रेसचा पूर्णपणे धुव्वा उडाला आहे. दिल्ली प्रदेश कॉँग्रेसचे प्रमुख सुरेश पचौरी यांना देखील स्वत:ची जागा कायम राखता आली नाही. दिल्लीतील खासदार अजय माकन यांच्या लोकसभा मतदारसंघातील दहा विधानसभा जागांवर कॉँग्रेसला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.माजी मुख्यमंत्री सिला दिक्षित यांचे पुत्र व खासदार संदीप दिक्षित यांच्या पूर्व दिल्लीतील लोकसभा मतदारसंघातील १० पैकी दोनच विधानसभा मतदारसंघातील जागा कॉँग्रेसला जिंकता आल्या आहेत. अशा प्रकारे कॉँग्रेसचे अनेक दिग्गज नेते या निवडणुकीनंतर धोक्यात आलेले आहेत. अर्तात लोकसभा निवडणुकीत अनेकदा हे चित्र बदलूही शकते. मात्र यात फार काही मोठा फरक लगेचच पडेल आणि कॉँग्रसेच्या बाजून मते वाहतील असे काही होणार नाही. कारण आता लोकसभा निवडणुकीला जेमतेम चार महिनेच शिल्लक राहिले आहेत. अशा स्थितीत कॉँग्रेसच्या स्थितीत फार मोठा फरक पडणार नाही. त्यामुळे यावेळी कॉंग्रसेला २०१४ सालची सार्वत्रिक निवडणूक कठीणच जाणार आहे. सध्या निवडणूक झालेल्या चार राज्यातील ही स्थिती आहे. या निवडणुकीचा अन्य निवडणूक न झालेल्या राज्यातही परिणाम होणे स्वाभाविक असते. त्यामुळेे एकूणच कॉँग्रेसला आता भविष्यात कठीण दिवस आहेत.
-------------------------------

0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा