-->
'ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट' म्हणजे काय? 
प्रसाद केरकर, मुंबई
'ऑ प्शन कॉन्ट्रॅक्ट'द्वारे खरेदीदारावर कराराच्या अंतिम मुदत दिनांकाला विहित किमतीला विशिष्ट जिन्नसाच्या खरेदी/विक्रीचे बंधन नसते, पण त्या संबंधाने हक्क जरूर प्राप्त होतो. त्या उलट 'ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट' अंतर्गत विक्रेत्याला संबंधित मालाची डिलिव्हरी घेणे बंधकारकच असते. कारण खरेदीदार त्याच्याकडे असलेल्या हक्काचा त्यासाठी वापर करेल. या प्रकरणी मालामध्ये सहभाग, निर्देशांक, कमोडिटी, चलन, व्याज दर किंवा फ्युचर्स यापैकी काहीही असू शकेल. 

-भारतीय कमोडिटी बाजारांमध्ये 'कमोडिटी ऑप्शन्स'चे व्यवहार होतात काय? 

भारत सरकारने अद्यापपर्यंत कमोडिटी फ्युचर्समध्ये 'ऑप्शन' सौद्यांना परवानगी दिलेली नाही. पण नजीकच्या काळात तशी परवानगी लवकर दिली जाणे अपेक्षित आहे. 

'कॉल ऑप्शन' या सं™ोचा अर्थ काय? 

'कॉल ऑप्शन' प्रकारच्या करारात ऑप्शनधारकाला विशिष्ट दिवशी आणि किमतीत संबंधित मालाच्या खरेदीचे बंधन नसते, पण तसा हक्क तो राखून असतो. 

'पुट ऑप्शन' या सं™ोचा अर्थ काय? 

'पुट ऑप्शन' प्रकारच्या करारात ऑप्शनधारकाला विशिष्ट दिवशी आणि किमतीला संबंधित मालाची विक्री करण्याचे बंधन नसते, पण तसा हक्क तो राखून असतो. 

अमेरिकन ऑप्शन आणि युरोपीय ऑप्शन यामध्ये फरक कसा आहे? 

अमेरिकन ऑप्शन प्रकारात ऑप्शनधारकाला कराराच्या समाप्तीसमयी वा त्यापूर्वी आपला हक्क बजावता येतो, तर युरोपीय ऑप्शनचा अंमल केवळ कराराच्या मुदतपूर्तीदिनीच केला जाऊ शकतो. 

दीर्घ मुदतीचे 'ऑप्शन प्रीमियम' या सं™ोतून कोणता अर्थ अभिप्रेत आहे? 

ऑप्शनधारकाकडून (ऑप्शन होल्डर) ऑप्शनकर्त्याला (ऑप्शन रायटर) त्याच्याकडील खरेदी/विक्री संबंधी राखून ठेवलेला हक्क मिळवण्यासाठी आधीच काही रक्कम अदा करण्याला ऑप्शन प्रीमियम म्हटले जाते. 

ऑप्शनची 'स्ट्राइक प्राइस' किंवा 'एक्सरसाइझ प्राइस' कशाला म्हटले जाते? 

ऑप्शनधारकाकडून (ऑप्शन होल्डर) त्याच्याकडील विशिष्ट मालासंबंधीचा खरेदी/विक्रीचा राखीव हक्क कोणत्या किमतीला ऑप्शनकर्त्याला (ऑप्शन रायटर) अदा केला जातो, त्या किमतीला 'स्ट्राइक प्राइम' किंवा 'एक्सरसाइझ प्राइस' म्हटले जाते. 

prasadkerkar73@gmail.com 

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel