-->
एखादे ऑप्शन 'इन द मनी' आहे असे केव्हा म्हटले जाते ? 
 Published on 30 Apr-2012 ARTHAPRAVAH 
प्रसाद केरकर
जेव्हा एखादे कॉल ऑप्शन संबंधित मालमत्तेसाठी अदा केल्या गेलेल्या 'स्ट्राइक प्राइस'पेक्षा खूप अधिक अशा किमतीला पोहोचते तेव्हा ते ऑप्शन 'इन द मनी' आहे असे म्हटले जाते. या उलट पूट ऑप्शन 'स्ट्राइक प्राइस'पेक्षा खूप कमी किमतीला पोहोचते तेव्हा ते 'इन द मनी' आहे असे म्हटले जाते. 

कॉल किंवा पूट ऑप्शनला 'अँट द मनी' आहे असे केव्हा म्हटले जाते? 

जेव्हा एखादे कॉल किंवा पूट ऑप्शन संबंधित मालमत्तेसाठी अदा केल्या गेलेल्या 'स्ट्राइक प्राइस'च्या स्तरावरच किंमत मिळवते तेव्हा ते ऑप्शन 'अँट द मनी' आहे, असे म्हटले जाते. 

एखादे ऑप्शन 'आऊट ऑफ द मनी' आहे असे केव्हा म्हटले जाते? 

जेव्हा एखादे कॉल ऑप्शन संबंधित मालमत्तेसाठी अदा केल्या गेलेल्या 'स्ट्राइक प्राइस'पेक्षा खूप कमी किमतीला पोहोचते तेव्हा ते ऑप्शन 'आऊट ऑफ द मनी' आहे असे म्हटले जाते. या उलट पूट ऑप्शन 'स्ट्राइक प्राइस'पेक्षा खूप अधिक किमतीला पोहोचते तेव्हा ते ऑप्शन 'आऊट ऑफ द मनी' आहे असे म्हटले जाते. 

ऑप्शन प्रीमियमचे घटक कोणते ? 

ऑप्शन प्रीमियमचे दोन महत्त्वाचे घटक आहेत ते म्हणजे उपजत मूल्य (इंट्रिन्सिक व्हॅल्यू) आणि कालानुरूप मूल्य (टाइम व्हॅल्यू). ऑप्शनचे उपजत मूल्य (इंट्रिन्सिक व्हॅल्यू) हे तो किती प्रमाणात 'इन द मनी' यानुसार ठरते. जसे कॉल ऑप्शनसाठी संबंधित मालमत्तेला ऑप्शनच्या स्ट्राइक प्राइसपेक्षा खूप वरची किंमत आली असेल तर उपजत मूल्य अस्तित्वात येते, तर दुसर्‍या बाजूला पूट ऑप्शनसाठी संबंधित मालमत्तेला ऑप्शनच्या स्ट्राइक प्राइसपेक्षा खूप खालची किंमत आल्यास उपजत मूल्याचे अस्तित्व निर्माण होते. 

ऑप्शनचे कालानुरूप मूल्य (टाइम व्हॅल्यू) काय असते ? 

ऑप्शनचे कालानुरूप मूल्य (टाइम व्हॅल्यू) हे त्या ऑप्शनच्या एका विशिष्ट समयी ऑप्शन प्रीमियम आणि उपजत मूल्य यातील फरक असतो. हे मूल्य मुदतपूर्तीसाठी शिल्लक राहिलेले दिवसही सूचित करते. 

'ऑप्शन ग्रीक्स' काय असते? 

ऑप्शनशी निगडित विविध जोखमांची मोजदाद करण्याचे 'ऑप्शन ग्रीक्स' हे परिमाण आहे. डेल्टा, गॅमा, व्हेगा, थीटा आणि र्‍हो या सामान्यत: वापरात येणार्‍या 'ऑप्शन ग्रीक्स' आहेत. 

ऑप्शनचे 'डेल्टा' काय असते ? 

संबंधित मालमत्तेच्या किमतीचे परिमाण जसे बदलते त्यानुसार ऑप्शनच्या किमतीत होत जाणार्‍या बदलाचा दर म्हणजे 'डेल्टा' होय. याला 'हेज रेशो'ही म्हटले जाते. 

prasadkerkar73@gmail.com 

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel