-->
संपादकीय पान--चिंतन--४ नोव्हेंबर२०१३ च्या अंकासाठी--
----------------------------
मंगळावर स्वारी काय कामाची? 
-------------------------------
मंगळ म्हटला की आपल्याला आठवतो म्हणजे आपल्या पत्रिकेतील अत्यंत तापट ग्रह. अनेकांची या मंगळाने लग्ने मोडली आहेत किंवा मंगळ असलेली मुलगी नको रे बाबा असे म्हणत त्या मुलीचे लग्न जुळणे हे एक मोठेे तापदायक ठरतेे. अशा या मंगळाचे कुणाला आकर्षण नाही? अखेर हा मंगळ आहे तरी काय? त्याच्यावर पाणी आहे का? किंवा जीवसृष्टी आहे का? या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यासाठी भारताने प्रयत्न सुरु केला असून भारतीय अंतराळ संशोधन संस्था(इस्त्रो)च्या वतीने मंगळवारी ५ नोव्हेंबर रोजी मंगळावरील स्वारीची सुरुवात मानविरहीत यान सोडून होत आहे. ही मोहीम सफल झाल्यास अशी कामगिरी करणारा भारत जगातील चौथा आणि आशियातील पहिलाच देश ठरेल.
चेन्नईच्या जवळ असलेल्या श्रीहरिकोटा अवकाश प्रक्षेपण केंद्राने आजवर भारतीय अवकाश संशोधनाच्या (इस्रो) वाटचालीमधील अनेक ऐतिहासिक टप्पे पाहिले आहेत. सतरा टन वजनाच्या एसएलव्हीफ रॉकेटपासून ते ४०० टन महाकाय जीएसएलव्हीफसारखे अग्निबाण येथूनच अवकाशात झेपावले आहेत. येथील अवकाशतळावरून भारताचे यान मंगळाला गवसणी घालण्याच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेसाठी उड्डाण करणार आहे. पाच वर्षांपूर्वी चांद्रयान या मोहिमेने भारतात नव्या अवकाश झेपेची सुरवात झाली. तिच्या यशानंतर पुढील टप्प्यात आत्मविश्‍वासाच्या बळावर इस्त्रोने ही मोहीम हाती घेतली आहे. परंतु ही मंगळमोहीम म्हणजे भारतीय अवकाश शास्त्रज्ञांची मोठी कसोटी ठरणार आहे. त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. यात यशस्वी होण्याचे प्रचंड दडपणही त्यांच्यावर आहे. ४०० कोटी रुपयांची ही खर्चिक मोहीम राबविली जात आहे. भारताची ही पहिलीवहिली आंतरग्रहीय मोहीम आहे. चंद्र हा पृथ्वीपासून चार लाख कि.मी. अंतरावर आहे, तर मंगळ त्याच्या एक हजार पट दूर आहे. या मोहिमेसाठी अनेक जटिल तंत्रज्ञाने नव्याने विकसित करावी लागली. उपग्रहाला योग्य दिशेत पृथ्वीपासून ४० कोटी कि. मी. दूर पाठवून सूर्याभोवती फिरणार्‍या मंगळाला त्याच्या कक्षेत गाठायचे आणि नंतर अचूकपणे मंगळाभोवतीच्या हव्या त्या कक्षेत उपग्रहाला भ्रमण करायला लावायचे; उपग्रहाच्या मंगळापर्यंतच्या दहा महिन्यांच्या प्रवासात उपग्रहावरील थंड अवस्थेतील उपकरणांना पुन्हा कार्यान्वित करायचे; एवढ्या दूरवरच्या उपग्रहाशी संपर्क-व्यवस्थापन करायचे. तसेच भूकेंद्राद्वारा पाठवलेला संदेश उपग्रहापर्यंत पोचायलाच २० मिनिटे लागतात. उपग्रहावरील काही क्रिया घडवून आणण्यासाठी एवढा वेळ नसतो. त्यामुळे उपग्रहावरील संगणकामार्फत ही कामे करवून घ्यावी लागणार आहेत. सर्वांत आव्हानात्मक काम म्हणजे या मोहिमेची सज्जता एका वर्षात करावी लागली आहे. इंधनात बचत करण्यासाठी, पृथ्वी आणि मंगळ हे ग्रह एकमेकाजवळ येतात, तेव्हाच मंगळ मोहीम हाती घ्यावी लागते. ही संधी २६ महिन्यांतून एकदाच मिळते. त्यामुळे नोव्हेंबर २०१३ ची वेळ चुकली असती, तर आणखी २६ महिने थांबावे लागले असते! अमेरिकाही ही संधी साधून आपल्या उपग्रहाचे प्रक्षेपण याच महिन्यात करत आहे आणि तो उपग्रह मंगळावर आपल्याआधी काही दिवस पोचणार आहे. उपग्रहाच्या मंगळयात्रेला २० दिवस अधिक लागतील. मंगळ मोहिमेच्या निमित्ताने पीएसएलव्हीचेे हे रौप्यमहोत्सवी उड्डाण म्हणजे दुग्धशर्करा योग आहे! आतापर्यंत अमेरिका, रशिया, चीन, जपान व युरोपने मंगळ मोहिमा हाती घेतल्या आहेत. मात्र फार कमी मोहिमेत त्यांना यश लाभले आहे. गेल्या वर्षी चीन व जपान यांच्या मंगळमोहिमा अयशस्वी झाल्या. अमेरिकेलाही पहिल्या मोहिमेत अपयश अनुभवावे लागले. रशियाच्या तर पहिल्या दहा मोहिमा असफल झाल्या आहेत. १३५० किलो वजनाच्या मंगळयानफ उपग्रहाचे आयुष्य सुमारे तीनशे दिवसांचे असेल. मंगळाभोवती तो अंडाकृती कक्षेत भ्रमण करेल. मोहिमेची शास्त्रीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उपग्रहावर एकूण १५ किलो वजनाची पाच उपकरणे बसविण्यात आली आहेत. मंगळावर मुख्यत्वे कार्बन-डाय-ऑक्साईड आणि अल्प नायट्रोजनयुक्त असे, पण विरळ हवामान आहे. त्याचा सखोल अभ्यास करणे, भूपृष्ठाचे उच्च दर्जाचे छायाचित्रण, तेथील खनिजांचे नकाशीकरण आणि मिथेनचा शोध ही या मोहिमेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. थेन वायू पुन्हा पुन्हा आढळल्यास तो शोध तेथे एका परीने मेथिनोजेन्सफ या जातीचे जिवाणू जगत असल्याचा पुरावाच ठरेल. मंगळयान  उपग्रह मंगळाच्या कक्षेत सोडण्यात भारत सफल झाल्यास, अमेरिका, रशिया व युरोप यांच्यानंतर असा विक्रम करणारा भारत जगात चौथा आणि आशियातील पहिलाच देश ठरेल. आणि त्याहीपेक्षा मंगळयानफने मंगळावरील जीवसृष्टीचा शोध घेण्यात प्रथम यश प्राप्त केले, तर चांद्रयान-१फच्या चंद्रावरील पाण्याच्या शोधापेक्षाही ती बातमी अधिक खळबळजनक ठरेल! परंतु आपल्यासारख्या विकसनशील देशाला हा ऐवढा खर्च परवडेल का? असा प्रकारच्या खर्चाची आपल्याला गरज आहे ? असा मूलभूत प्रश्‍न आहे. कारण आपल्यासारख्या देशाला मोठ्या प्रमाणावर गरीबी असताना आपल्याला हे संशोधन काय कामाचे? अर्थातच हा मूलभूत प्रश्‍न आहे. संशोधन हे देशाच्या विकसाला हातभार लावते. उपग्रहांच्या प्रक्षेपणामुळे आपल्याला मोठा उपयोग झाला आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. हे वास्तव मान्य केले तरीही चंद्रावरील संशोधन आपल्याला काहीच कामाचे नाही. त्यामुळे हे संशोधन विकसीत देशांनी जरुर करावे. मात्र सरकारने सध्या हाच पैसा जर दारिद्ˆय र्निमूलनावर खर्च केला तर त्याचा आपल्याला मोठा फायदा होईल. मात्र हे सरकार लक्षात घेणार नाही.
---------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel