-->
संपादकीय पान--चिंतन--१५ नोव्हेंबर २०१३च्या अंकासाठी--  
-------------------------------------------
ब्रँड सचिनला निवृत्ती नाही
-----------------------
सध्या मुंबईत सुरु झालेल्या वेस्ट इंडिज विरुध्दच्या कसोटी सामन्यात क्रिकेटचा बादशहा सचिन तेंडूलकर आपल्या जवळपास २५ वर्षांच्या कारर्किदीला निरोप देणार आहे. अनेकांना त्याचा हा सामना डोळ्यात साचवून ठेवायचा असल्याने केवळ टी.व्ही.वर न पाहता प्रत्यक्ष स्टेडियमवर जाऊन सामना पहायचा आहे. त्यासाठी या सामन्याला तोबा गर्दी झाली आहे. सचिनची आजवरची सर्वोच्च शिखरावर पोहोचत असलेली लोकप्रियता पाहता त्याला निरोप देणे हे क्रिकेट प्रेमिंना काही पटणारे नाही. परंतु प्रत्येकाने कुठेतरी व कधीतरी थांवण्याची गरज ही असतेच. त्यामुळे सचिनने आपण लोकप्रियतेच्या शिखरावरच असताना निवृत्ती घेण्या हा निर्णय घेतल्याने अनेकांना हा निर्णय चटका देणारा ठरला आहे. सचिन आपल्या शेवटच्या सामन्यात किती धावा काढतो? शतक ठोकणार का? याचे अंदाज बांधून त्यावर करोडो रुपयांचा सट्टा सुरु आहे. एकूणच काय सचिनचा हा अलविदा जंगी होणार आहे. अशा प्रकारे सचिन हा क्रिकेटमधून निवृत्त होत असला तरी ब्रँड सचिनला काही निवृत्ती मिळणार नाही. कारण सचिनची लोकप्रियता निवृत्तीनंतरही कायम टिकेल असा अनेकांचा होरा आहे.
निवृत्ती नंतर सचिन काय करणार? याबाबत अनेक जण आपले आखाडे बांधीत आहेत. त्याच्या क्रिकेटच्या जोडीने गोल्फ खेळण्याची आवड आहे. त्यामुळे आजही तो उसंत मिळेल त्यावेळी आपल्या मुलांमध्ये रमत असताना गोल्फ खेळतो. परंतु त्याचा आत्मा हा क्रिकेटमध्ये गुंतलेला असल्याने आपली नियुक्ती आन्तरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलवर (आय.सी.सी.) व्हावी असे वाटणेही त्याला स्वाभाविक आहे. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सच्या संघाला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सचिनवरच येणार आहे. गेल्या वर्षी सचिनने राज्यसभेची खासदारकी स्वीकारली होती. यामागे त्याचा हेतू हा एकूणच क्रीडा जगतातील प्रतिनिधत्व राज्यसभेत व्हावे व यासंबंधी काही प्रश्‍न संसदेत मांडले जावेत असा होता. आता मात्र सचिन क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर आपल्या राज्यसभेतील कामकाजावर लक्ष केंद्रीत करु शकेल. त्यामुळे ब्रँड सचिन हा आता राज्यसभेत झळकायला लागेल अशी अपेक्षा आहे. सचिन हा जाहीरातदारांसाठी देव होता. परंतु त्याच्या निवृत्तीमुळे त्याचे महत्व काही कमी होणार नाही. त्यामुळे सचिन हा ब्रँड जाहीरात क्षेत्रात यापुढेही चमकतच राहिल. अदिदास लवकरच सचिनला आपल्या जाहीरातीत घेऊन नवीन उत्पादन सचिन फॉरऐव्हर हे काढत आहे. त्याशिवाय सचिन आघाडीच्या १५ जाहीरातींशी जोडलेला आहे. यात अदिदासच्या जोडीने तोशिबा, कोका-कोला, अविव्हा या आघाडीच्या ब्रँडचा समावेश आहे. त्याचे हे जाहीरातदार निवृत्तीनंतरही त्याला सोडणार नाहीत असेच सध्या तरी चित्र आहे. त्यामुळे ब्रँड सचिन हा सतत यापुढेही झळकत राहाणार आहे. पुण्यातील एक रियल इस्टेट कंपनी अमित एन्टरप्राईजेस यांचे सचिनसोबत कंत्राट २०१३ सालापर्यंत आहे. मात्र ही कंपनी देखील सचिनला काही सोडणार नाही. पुढील वर्षासाठीही ते सचिनलाच साईन करणार आहेत. या कंपनीच्या वतीने सचिनला घेऊन मुंबई, पुणे व नाशिक या शहरात नवनी गृह बांधणी प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत.
अनेकांच्या मते सचिनची ब्रँड व्हॅल्यू काही लगेचच कमी होणारी नाही. सचिन हा लोकप्रियतेच्या लाटेवर असताना निवृत्त झालेला असल्याने त्याची बाजारातील ब्रँड व्हॅल्यू उतरायला बराच काळ लागेल. उलट त्याला सोबत घेऊन काही जण उद्योगातही उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अशा प्रकारे निवृत्त झाल्यावरही आपली ब्रँड व्हॅल्यू टिकविणारा सचिन हा जगातील काही मोजक्या क्रिडापटूंपैकी एक ठरावा. सचिन ग्राऊंडवरील क्रिकेटमधून निवृत्त झाला तरी त्याची बॅटिंग जाहीरातीच्या क्षेत्रात किंवा उद्योगात सुरुच राहील.
---------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel