
संपादकीय पान--चिंतन-- २नोव्हेंबर२०१३च्या अंकासाठी--
----------------------------
जागतिक इलेक्ट्रॉनिक्स उद्योगावर भारतीयांची मोहोर
---------------------------
आय.टी. उद्योगावरील भारतीयांचे जागतिक पातळीवरील वर्चस्व हे आता सर्वांना परिचित झाले आहे. परंतु केवळ आय.टी.च नव्हे तर इलेक्ट्रॉनिक्स उद्योगावरही भारतीयांची मोहोर आता उमटू लागली आहे. जगातील इलेक्ट्रॉनिक्स उद्योगावर जपान, कोरिया व अमेरिकन कंपन्यांचे र्निविवाद वर्चस्व आहे. या तीन देशातील कंपन्यांची जगातील ९० टक्के बाजारपेठ काबीज केली आहे. या देशातील बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नेतेपदी आता मोठ्या प्रमाणात भारतीय चेहरे दिसू लागले आहेत. त्यामुळे या उद्योगावरही आता भारतीयांनी आपला ठसा उमटविण्यास सुरुवात केली आहे.
अशाच काही नावांमध्ये राजीव चोप्रा हे नाव अग्रकमाने आहे. येत्या डिसेंबर महिन्यापासून ते फिलीप्स या बहुराष्ट्रीय कंपनीच्या जागतिक पातळीवर प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. भारतात आय.आय.टी.तून अभियांत्रिकी केल्यावर त्यांनी अमेरिकेतून एम.बी.ए. केले. फिलीप्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहाताना त्यांनी कंपनीची भरीव कामगिरी केली म्हणून त्यांच्याकडे कंपनीची जागतिक सूत्रे सुपूर्द केली जात आहेत. त्यांनी भारतात फिलीप्सची अनेक उत्पादने बाजारात आणली व कंपनीला नावारुपाला आणले. गेल्या काही वर्षात फिलीप्स हे नाव भारतीय बाजारपेठेतून काहीसे फुसट झाले होते परंतु त्यांनी फिलीप्सच्या उत्पादनांना पुन्हा तजेला आणून दिला. सॅमसुंग या इलेक्ट्रॉनिक्समधील नावाजलेल्या कंपनीच्या संशोधन विभागाचे संचालक हे प्रणव मिस्त्री हे भारतीय आहेत हे कुणाला सांगितल्या आश्चर्य वाटेल. गुजरातमधील पालनपूर या छोट्या गावातून आलेल्या मिस्त्री यांनी आय.आय.टी. मुंबईतून शिक्षण घेतल्यावर अमेरिकेतील एम.आय.टी.तून पदव्यूत्तर शिक्षण घेतले. मायक्रोसॉफ्ट, गुगल व नासा येथे काम केल्यावर ते सॅमसुंगमध्ये दाखल झाले. कंपनीने बाजारात दाखल केलेल्या गॅलेक्सी या मालिकेतील स्मार्ट फोनच्या संशोधनात त्यांचा मोलाचा वाटा होता. सध्या ते रोबोट तयार करण्यात व्यस्त आहेत. त्याचबरोबर त्यांना तंत्रज्ञानाचा वापर करुन जगातील दारिद्रय कसे संपविता येईल याचा अभ्यास भविष्यात करणार आहेत. सॅमसुंग कंपनीत आणखी एक उच्चपदावर भारतीय आहेत, त्यांचे नाव आहे दिपेश शहा. यांच्याकडे सॅमसुंग इलेक्ट्रॉनिक्सच्या ग्लोबल उपाध्यक्षपदाचा भार आहे. सॅमसुंग या कंपनीला स्मार्टफोनमध्ये जगात आघाडीवर नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी गेल्या तीन वर्षात कंपनीला अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या स्पर्धेत पुढे नेऊन ठेवले. त्यांच्या या यशामुळे त्यांच्यावर कंपनीच्या जागतिक पातळीवरील अनेक जबाबदार्या सोपविण्यात आल्या आहेत. विश्वेशरअय्या तंत्रज्ञान विद्यापीठातून अभियांत्रिकी घेतलेल्या शहा यांनी आय.आय.एम. बंगलोरमधील उच्च पदवी संपादन केली आहे. त्याचबरोबर फिलीप्सच्या ग्राहोपयोगी इलेक्ट्रनिक्स विभागाचे प्रमुख म्हणून मुरली शिवरामन कार्यरत आहेत. त्यांचे कार्यक्षत्र प्रामुख्याने चीन आहे. आता त्यांच्यावर फिलीप्स हा ब्रँड जपान व अमेरिकेत वाढविण्याची जबाबदारी आहे. अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात कार्यरत असलेली ही काही नावे. परंतु या शिवायही अनेक भारतीय या उद्योगात मोठ्या हुद्यावर बहुराष्ट्रीय कंपनीत आहेत. या उद्योगात भारतीय कंपन्या नगण्य आहेत आणि ज्या कंपन्या आहेत त्या या बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी उत्पादन करुन देतात. या क्षेत्रात भारतीय ब्रँड नावारुपाला अजून तरी आलेला नाही. भविष्यात तोही येऊ शकतो. मात्र सध्या तरी भारतीय टॅलेंटने आपली छाप या उद्योगावर जागतिक पातळीवर टाकण्यास सुरुवात केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स उद्योग हा भविष्यातील आघाडीचा उद्योग म्हणून आय.टी. उद्योगाच्या जोडीने ओळखला जातो. अशा प्रकारे या उद्योगात भारतीयांनी आपली मोहोर उठविण्यास सुरुवात करणे ही एक अभिमानाची बाब म्हटली पाहिजे.
-----------------------------
----------------------------
जागतिक इलेक्ट्रॉनिक्स उद्योगावर भारतीयांची मोहोर
---------------------------
आय.टी. उद्योगावरील भारतीयांचे जागतिक पातळीवरील वर्चस्व हे आता सर्वांना परिचित झाले आहे. परंतु केवळ आय.टी.च नव्हे तर इलेक्ट्रॉनिक्स उद्योगावरही भारतीयांची मोहोर आता उमटू लागली आहे. जगातील इलेक्ट्रॉनिक्स उद्योगावर जपान, कोरिया व अमेरिकन कंपन्यांचे र्निविवाद वर्चस्व आहे. या तीन देशातील कंपन्यांची जगातील ९० टक्के बाजारपेठ काबीज केली आहे. या देशातील बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नेतेपदी आता मोठ्या प्रमाणात भारतीय चेहरे दिसू लागले आहेत. त्यामुळे या उद्योगावरही आता भारतीयांनी आपला ठसा उमटविण्यास सुरुवात केली आहे.
-----------------------------
0 Response to " "
टिप्पणी पोस्ट करा