
सध्याच्या घडीला देशात दोन राष्ट्रीय पातळीवरील शेअर बाजार अस्तित्वात
असताना तिसर्या एक्स्चेंजला त्यात जागा असल्याचे सर्मथन तुम्ही कसे कराल?
एक परिपूर्ण भांडवली बाजार ही भारतासाठी काळाची गरज बनली आहे. जागतिक
स्तरावर तुम्ही कोणत्याही विकसित देशाचे उदाहरण पाहिलेत तर भांडवली
बाजाराच्या अवकाशात समभागांचा (इक्विटी) हिस्सा अन्य मालमत्ता वर्गाच्या
तुलनेत केवळ 13 टक्के आहे. त्याउलट डेट, कॉर्पोरेट आणि सरकारी कर्जरोखे,
व्याजदर वायदा, चलन विनिमय आणि एसएमई आदींचा हिस्सा उर्वरित 87
टक्क्यांच्या घरात जाणारा आहे. आज आपल्याकडे दोन शेअर बाजार असल्याचे
म्हटले जाते, परंतु माझ्या मते आपण वर उल्लेख केलेल्या उर्वरित 87 टक्के
बाजारहिश्शाबाबत खूपच थोडकी प्रगती साधली आहे. त्या मालमत्ता वर्गाच्या
दृष्टीने अजून बरेच काही करण्यासारखे आहे. या ठिकाणी मला हेही स्पष्ट करावे
लागेल की सरकार, नियंत्रक संस्था आणि धोरणकर्त्यांनी भांडवली बाजाराच्या
उत्कर्षाच्या दृष्टीने खूप काही आणि विशेषत: गेल्या दहा वर्षांत बरेच काही
केले आहे. एक नियंत्रक या नात्याने 'सेबी'ने आपल्या शेअर बाजारासाठी अनुकूल
वातावरण निíमतीसाठी 360 अंशांच्या कोनातून जेवढे शक्य आहे तेवढी पावले
टाकली आहेत. आता राहता राहिला तो प्रत्यक्ष शेअर बाजाराने संशोधन व
शिक्षण-प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपली भूमिका बजावण्याचा प्रo्न! अमेरिका
हे आज संपूर्ण विकसित भांडवली बाजाराचे उदाहरण बनून आपल्यापुढे आहे. त्या
ठिकाणी जवळपास 30 कोटींच्या लोकसंख्येसाठी सध्या 10 एक्स्चेंजेस आणि 76
तत्सम उलाढाल मंचांची एक व्यवस्था तयार झाली आहे. भारताची लोकसंख्या
त्यापेक्षा चार पटीने अधिक म्हणजे 120 कोटींपेक्षा अधिक आहे. आपल्याकडे
अमेरिकेपेक्षा अधिक मोठय़ा संख्येने शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्यांची
संख्या आहे, परंतु एक्स्चेंजेस फक्त दोन आहेत. अमेरिकेत लोकसंख्येच्या 40
ते 45 टक्के लोक हे भांडवली बाजाराशी संलग्न आहेत, भारतात मात्र हे प्रमाण
केवळ दोन टक्के आहे. अधिकाधिक शेअर बाजारांचा पर्याय पुढे आल्याने
व्यवहारांवरील खर्चातही कपात होईल आणि गुंतवणूकदारांना याचा फायदा होईल?
- स्पर्धा हे सर्वांना समान पातळीवर आणणारे सर्वात मोठे साधन आहे.
दूरसंचार, हवाई वाहतूक, बँकिंग आणि विमा आदी उद्योगक्षेत्रात तगड्या
स्पध्रेने केवळ खर्चात कपातच नव्हे तर या एकंदर बाजारक्षेत्राच्या
विस्ताराला आणि सेवा-उत्पादनांत गुणात्मक नावीन्याला हातभार लावला आहे. आज
आपण भारतातील एक्स्चेंजेसचे ताळेबंद पत्रक तपासलेत तर, ढोबळ उत्पन्नात
जवळपास 70 टक्के विकासाने ते कार्यरत असल्याचे दिसून येईल. त्यांना स्पर्धा
नको आहे, याचे मूळ कारण हेच आहे. या उत्पन्नात त्यांना वाटेकरी नकोत. आज
त्यांना कोणती स्पर्धाच नाही. त्यामुळे आपल्या नफाक्षमतेला झळ लागेल असा
प्रयत्नही त्यांच्याकडून होताना दिसत नाही. असे करताना मग त्यांचे
बाजारपेठेच्या विकासाकडे आणि शाश्वत विकासासाठी आवश्यक
शिक्षण-प्रशिक्षणाकडेही अक्षम्य दुर्लक्ष झालेले दिसून येते. अन्यथा आíथक
साक्षरतेसाठी गुंतवणूक झाली असती आणि प्रादेशिक भाषांमध्ये शिक्षणासाठी
त्यांच्याकडून प्रयत्न झाले असते. एकूण व्यवहार खर्चाच्या तुलनेत
एक्स्चेंजेसला मिळणारे शुल्क हे अत्यल्प प्रमाणात आहेत, हा खर्चात कपात न
करण्यामागील त्यांचा युक्तिवादही हास्यास्पद आहे. आमच्या बाबतीत विचाराल तर
आम्ही उलाढाल शुल्कातील मुख्य घटकालाच कात्री लावली आहे. प्रस्थापित
एक्स्चेंजेसच्या तुलनेत 35 ते 50 टक्के कमी शुल्क आकारूनही आम्हाला खात्री
आहे, की उत्तम नफा क्षमतेसह सुदृढ ताळेबंद पत्रक तयार करण्याला आम्हाला वाव
राहील. खर्चात कपातीच्या आमच्या घोषणेचे आणि आमच्या दरनिश्चितीचे
प्रतिबिंब त्यानंतर झालेल्या विक्रमी सदस्य नोंदणीतून स्पष्टपणे पडलेले
दिसून येते. कॉर्पोरेट बाँड, बिगर-इक्विटी क्षेत्रावर दुर्लक्ष
झाल्याचे तुम्ही म्हणता, मग तुमचे या संदर्भात धोरण नेमके कसे असेल?
बाँड मार्केटसाठी आमचे धोरण अनोखे असेल. सध्याच्या घडीला संपूर्ण कर्जरोखे
बाजार हा आधीच भांडवल उभारणीचे बँकांसह अन्य अनेक स्रोत उपलब्ध असलेल्या
'ट्रिपल ए' मानांकित बड्या कंपन्यांसाठी मोकळे राहिले आहे. एएए मानांकन
नसलेल्या कंपन्यांनी मग काय करायचे? अशा गरजवंत कंपन्यांसाठीही मग वेगळ्या
धाटणीची बाजारपेठ विकसित व्हायला हवी. परंतु इक्विटी बाजाराचीच रचना
जशीच्या तशी बाँड बाजारासाठी वापरात आणता येणार नाही. अशा बाँड क्षेत्रात
सामान्य गुंतवणूकदारांनाही बराच वाव आणि संधी आहे. अशा गुंतवणूकदारांना
विश्वासार्हता, तरलता आणि घसरणीच्या स्थितीत फायदा गमावण्याची जोखीम या तीन
पैलूंबाबत स्पष्ट जाणिवा विकसित केल्या जायला हव्यात. हे जर झाले तर, मग
सक्रिय कर्जरोखे बाजाराची घडणीही शक्य आहे.
0 Response to "सक्रिय कर्जरोखे बाजाराची घडण शक्य आहे "
टिप्पणी पोस्ट करा