लगबग गणपती उत्सवाची
शनिवार दि. 31 ऑगस्ट 2019 च्या अंकासाठी अग्रलेख-
----------------------------------------------
लगबग गणपती उत्सवाची
कोकणात आता गणपती उत्सवाची लगबग सुरु झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात चाकरमनी कोकणात परतण्यास सुरुवात झाली आहे. येत्या दोन दिवसात मुंबई-गोवा महामार्ग गर्दीने फूल्ल होईल. दरवर्षी प्रमाणे यंदाही त्याचे मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होण्याचे स्वप्न काही पूर्ण झालेले नाही. कोकण रेल्वे सुरु होऊन आता तीन दशकांहून जास्त काळ लोटला असला तरीही त्याला रेल्वेचा फारसा उपयोग होत नाही व शेवटी त्याला खड्याच्या रस्त्यांचाच गावी जाण्यासाठी आसरा घ्यावा लागतो. यंदा जादा एस.ट्या व रेल्वे सोडूनही अनेकांची गैरसोय झालेली आहे. पुढील वर्षी तरी रस्त्याचे काम मार्गी लागल्यास काही प्रवास तरी सुखकारक होईल अशी अपेक्षा आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण झपाट्याने करु असे आश्वासन दिले आहे. आता पावसाळा झाल्यावर रायगड जिल्ह्यातील या महामार्गाचे कामकाज झपाट्याने सुरु होईल असे दिसते. रत्नागिरी, सिधुंदुर्ग जिल्ह्यातील महामार्गाच्या कामाला आता वेग आला आहे. येत्या वर्षात हा महामार्ग पूर्ण होईल असे दिसते. सुमारे 500 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे चौपदरीकरण करताना अनेक अडचणी येणार आहेत, हे मान्य आहे. परंतु चर्चेने अनेक प्रश्न सुटू शकतात. कोणत्याही विभागाचा विकास नको, अशी भूमिका कोणालाही घेता येणार नाही पण ग्रामस्थांच्या सर्व प्रश्नांचे निराकरण, त्यांच्या शंकांचे समाधान, सरकार ताब्यात घेणार्या जमिनींना मिळणारा योग्य भाव आणि ज्यांचे व्यवसाय नष्ट होणार आहेत त्यांना व्यवसायासाठी पर्यायी जागा या चार मुद्यांवर चर्चा करून सर्वाना मान्य होईल, असा प्रस्ताव तयार करणे, याबाबत सरकारने परिपूर्ण विचार करण्याची आवश्यकता आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण झाले पाहिजे, याबद्दल कोणाचेही दुमत नाही. गेल्या दहा वर्षातील या मार्गावरील वाढलेली वाहतूक चौपदरीकरणाशिवाय सुलभ होणार नाही. तसेच या महामार्गावर होत असलेल्या अपघातांचे प्रमाण पाहता चौपदरीकरण ही काळाची गरज आहे. कोकणातील नैसर्गिक परिस्थितीमुळे, विविध घाटांमुळे, अरुंद वळणांमुळे हा मार्ग धोक्याचाही आहे. चौपदरीकरणामुळे वाहतूक दुतर्फा होईल. वळणे रुंद होतील. जो कठीण घाट आहे तो तोडला जाईल व मुंबई-गोवा हा प्रवास बराचसा सुखकारक होईल. मुंबई-गोवा महामार्ग हा राज्यातील हा सगळयात जुना महामार्ग. 1952 साली बाळासाहेब देसाई सार्वजनिक बांधकाममंत्री असताना त्यांनी या रस्त्याचा प्रकल्प तयार केला आणि त्याला मंजुरी दिली. त्यावेळी 350 मैलाचा हा महामार्ग होता आणि तो सिमेंट काँक्रीटचा होता. मुंबई-पुणे महामार्ग असो किंवा मुंबई-बंगलोर महामार्ग, मुंबई-अहमदाबाद माहामार्ग हे केव्हाच चौपदरी झाले आहेत. खरे तर यापूर्वीच मुंबई-गोवा हा माहामार्ग चौपदरी व्हायला पाहिजे होता. प्रामुख्यने पर्यटन वाढविण्यासाठी याची गरज होती. कोकण रेल्वे सुरु झाली तरीही या मार्गावरील वाहतुकीचा बोजा काही कमी झालेला नाही. त्यामुळे हा रस्ता तातडीने मार्गी लागणे गरजेचे आहे. तसेच ठिकठिकाणी अर्धवट स्थितीत असलेला कोकणातील सागरी माहामार्गही तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. यामुळे कोकणाचे चित्र पालटू शकते. पर्यटन हा कोकण व गोव्याचा कणा ठरीत आहे. गोव्यात तर पर्यटनाने चांगलाच जम बसविला आहे. आज गोव्याचे सर्व अर्थकारण पर्यटनावर अवलंबून आहे. कोकणात जर पर्यटन जर मजबूत करावयाचे असेल तर रस्ता हा उत्तम असण्याची गरज आहे. सर्व काही सुरळीत झाल्यास हा महामार्ग येत्या वर्षात वर्षात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील वर्षी कोकणातील चाकरमनी गणपतीला वेगाने आपल्या घरी पोहोचेल, सध्यासारखी त्याची रखडपट्टी होणार नाही, अशी अपेक्षा करु या. रत्नागिरीत नियोजित मोठी रिफायनरी प्रकल्प येऊ घातले आहेत. गेल्या चार दशकापूर्वी पश्चिम महाराष्ट्राचे चित्र बदलण्यास सुरुवात झाली. यातून या भागात संपत्ती आली, समृध्दी आली. कोकणाला मात्र संपत्ती व समृध्दी गेले काही वर्षे हुलकावणी देत आहे. कारण यासाठी चांगले रस्ते असणे ही प्राथमिक गरज आहे. सरकार सध्या कोकणाच्या विकासाबाबत गांभीर्याने विचार करते आहे असे दिसते. मात्र हे नियोजित सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. गणपती उत्सवामुळे कोकणाच्या अर्थकारणाला दरवर्षीच वेग येतो. पेण या गणपतींच्या मूर्तींच्या कारखान्यात करोडो रुपयांची उलाढाल होते. एस.टी. व रेल्वेच्या गाड्या कितीही वाढवल्या तरी कमीच पडतात. त्यामुळे एस.टी. व रेल्वेच्या उत्पनात मोठी भर पडते. मुंबई,पुण्यात गणपतीला गावी येणारा चाकरमनी चार पैसे खर्च करतो. जाताना कोकणी मेव्याची आवर्जुन खरेदी करतो. यातून कोकणी माणसाच्या खिशात चार पैसे खुळखुळतात. गावी येणारा कोकणी माणूस आपले शहरातील रोजगाराचे बंध कायम ठेवत गावाशी नाते जोडत असतो. एकूणच काय आता कोकणात गणपतीची लगबग सुरु झाली आहे. दोन दिवसांवर गणपती येऊन ठेपले आहेत. कोकणाच्या अर्थकारणावर याचा निश्चितच सकारात्मक परिणाम होतो. गणपतींच्या आगमनासोबत घराघरात नातेसंबंध दृढ होण्यास मदत होते. गणपती हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो एक सांस्कृतिक ठेवा आहे. यातून नातीगोती, मैत्री, गावाकडची संस्कृती हे सर्वच जपले जाते.
-----------------------------------------------------

0 Response to "लगबग गणपती उत्सवाची"
टिप्पणी पोस्ट करा