-->
कुटुंबप्रमुख शरद पवार

कुटुंबप्रमुख शरद पवार

सोमवार दि. 30 सप्टेंबर 2019 च्या अंकासाठी अग्रलेख- 
----------------------------------------------
कुटुंबप्रमुख शरद पवार
राष्ट्वादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व देशातील मुरब्बी राजकारणी शरद पवार यांना ईडीने नोटीस बजावल्यावर जे राजकारण ढवळून निघाले आहे त्यातून त्यांच्या राजकीय स्थानाला कोणताही धक्का न लागता पवार कुटुंबातील तसेच राष्ट्वादी पक्षाचे एक कुटुंबप्रमुख म्हणून त्यांचे स्थान अढळ झाले आहे. भाजपाने ईडीच्या माध्यमातून शरद पवारांवर वार करण्याचा मार्ग चोखाळला होता. माञ हा सर्व डाव आता त्यांच्या अंगलटी आला आहे हे शरद पवारांची शुक्रवारची व अजितदादांची शनिवारची पञकारपरिषद पाहता स्पष्ट दिसते. भाजपाच्या नेत्यांनी आपल्या पक्षवृध्दीसाठी ईडीचे हत्यार उपसले आहे. यातून विरोधी पक्षातील अनेक नेते त्यांच्या गळाला लागले आहेत तर अनेक जण भविष्यात आपल्यावर बालंट येऊ नये यासाठी आत्ताच भाजपा प्रवेश करुन आपले आयुष्य सुकर करुन घेत आहेत. ईडीच्या या धाकापोटी आपल्यात अनेक नेते येत आहेत पर्यायाने आपण विरोधी पक्षच संपवित आहोत अशा मस्तीत सध्या भाजपा आहे. राष्ट्वादीच्या नेत्यांची मोठ्या प्रमाणात आयात करीत असताना मुळावरच घाव घालावा हे ठरवून शरद पवारांना ईडीची नोटीस पाठविण्यात आली. पवार हे काही भाजपात येणार नाहीत, तरी भविष्यात प्रचार करताना आपला सरकारविरोधी प्रचार बोथट करतील अशी अपेक्षा भाजपाचे धुरणी ठेऊन होते. नाहीतरी पवारांच्या सध्या सुरु असलेल्या दौर्‍याला जनतेतून मोठा पेरतिसाद मिळत आहे. आज वयाच्या 79 व्या वर्षी देखील या माणसाची लोकप्रियता काही आटलेली नाही. जरी नेते पक्षातून सोडून गेले असले तरी जनता माञ पवारांसोबत म्हणजेच राष्ट्वादीसोबत आहे, असे चिञ तयार होऊ लागल्याने भाजपाच्या गोटात निराशेचा सुर उमटू लागला होता. हे पवार आपली भविष्यातील सत्तेची गणिते पालटू शकतात याची त्यांना भीती वाटणे स्वाभाविकच होते. यातूनच पवारांविरोधी ईडीचे अस्ञ उपसण्याचे ठरले. परंतु 55 वर्षे सक्रिय राजकारण कोळून प्यायलेले पवार हे काही कच्चे खिलाडी नाहीत हे त्यांनी दाखवून दिले. पवारांवरील या कारवाईने जनक्षोभ उसळला व सरकारचा डाव उलटण्यास सुरुवात झाली. शरदरावांनी लगेचच आपण स्वत:हून ईडीच्या कार्यालयात जाण्याची तयारी केली आणि सर्वांचेच धाबे दणाणले. शरद पवारांचा शिखर बँकेशी संबंध नाही ते कुठेही संचालक नाहीत. असे असताना देखील सरकारने ईडीचे अस्ञ उगारल्याने त्यामागचा हेतू स्पष्ट झाला. राष्ट्वादीच्या अन्य नेत्यांना धाक दाखवून त्यांच्यासाठी पक्षाचे दरवाजे खुले करणे वेगळे व पवारांना ईडीचा धाक दाखवणे हे वेगळे हे भाजपाच्या धुरणींच्या काही लक्षात आले नाही आणि इकडेच त्यांचा गेम फसला. याचा परिणाम पवारांचे हात मजबूत होण्यात होईल याची सुताराम शक्यताही वाटली नव्हती. शेवटी पवारांची ईडीच्या कार्यालयात न जाण्यासाठी समजूत काढण्यासाठी प्रशासनाची पळता भुई झाली. एकूणच सरकारने याबाबतीत आपले हसे करुन घेतले. राजकीय परिपक्वता नसलेले लोक सत्तेत आले की काय होऊ शकते याचा प्रत्यय पुन्हा या निमित्ताने जनतेला आला आहे. पवारांचे हे वादळ शांत होत असताना अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन या नाट्याचा दुसरा अंक सुरु केला. चँनल्सना तर एक मोठी संधीच मिळाली आणि पवार कुटुंबात कलह, अजित पवार भाजपात जाणार, याञेतही दादांचा सहभाग नव्हता अशी अनेक गॉसिपकम चर्चा चघळण्यास सुरुवात केली. आपला टी.आर.पी. वाढविण्यासाठी हे चँनलवाले चर्चा कोणत्याही थराला नेऊ शकतात, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. अजित पवार हे रिचेबन नसल्यामुळे तसेच त्यांचे पुञ पार्थ पवार यांनी केलेल्या विधानामुळे यासंबंधीची चर्चा अधिक रंगतदार करण्याची संधी चँंनेल्सना मिळाली. अखेर अजितदादांनी आपली भूमिका शनिवारी मांडली व झालेल्या घडामोडींमुळे आपण कसे व्यथित झाले हे सांगितले. हे सांगत असताना त्यांना अश्रुही अनावर झाले. पवार कुटुंबात कोणकाही कलह नाही हे त्यांनी स्पष्ट केल्याने या प्रकरणी सर्व हवाच निघून गेली. पवारांनी ईडी प्रकरणी बाजी मारली असताना अजित पवारांचा राजीनामा आला व पवार पुन्हा मागे गेले असे चँनल्सना वाटत होते. माञ दादांच्या पञकार परिषदेनंतर पवार हेच श्रेष्ठ असल्याचे सिध्द झाले आहे. या दोन दिवसातील घटना पाहता पवार हेच कुटुंबप्रमुख आहेत व घरात तसोच पक्षातही त्यांचाच शब्द शेवटचा आहे हे नक्की झाले आहे. पञकारांशी बोलताना शरद पवार ज्या तर्‍हेने बोलत होते, ती त्यांची बॉडी लँग्वेज काही औरच होती. त्यांच्यातील आत्मविश्‍वास, जिद्द व भूमिकेतील स्पष्टपणा तिशीतील तरुणांना लाजवेल अशी होती. अजित पवारांविषयी त्यांनी त्यावेळी सावधपणाने पण नेमके आत्मविश्‍वासाने जी विधाने केली ती वाखाणण्याजोगीच होती. एका परिपक्व नेता कसा असावा हे त्यांनी दाखवून दिले. ईडीची कारवाई व त्यानंतर झालेल्या घटनातून पवारांचे कुटुंबप्रमुख म्हणून स्थान बळकट झाले आहे हे नक्की. याबाबत भाजपालाच धन्यवाद दिले पाहिजेत.
------------------------------------

Related Posts

0 Response to "कुटुंबप्रमुख शरद पवार"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel