प्लॅस्टिक बंदीचे कवित्व / रुपयाची घसरगुंडी
शुक्रवार दि. 29 जून 2018 च्या अंकासाठी अग्रलेख-
-----------------------------------------------
प्लॅस्टिक बंदीचे कवित्व
शिवसेनेचे मंत्री कधीच आपल्या निर्णयावर ठाम नसतात तसेच शिवसेना घेतलेला निर्णय कधी फिरवेल याची शाश्वती देता येत नाही, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. प्लॅस्टिक बंदीचे स्वागत अनेक थारतून होत होते, सरकारने हा निर्णय पर्यावरणाच्या व संपूर्ण मानव जातीसाठी घेतलेला हा क्रांतीकारी निर्णय असे त्याचे वर्णन केले जात होते. मात्र या बंदीमागे असलेला राजकीय पदर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या ठाकरी भाषेत सांगितला असला तरी यातील राजकारण व आर्थिक संबंध आपण बाजुला ठेवू सरकारने व शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय स्वागतार्हच होता. अर्थात असेल असले तरी या बंदीला अनेक फाटे फुटतील व ही बंदी बळूहळू शिथील केले जाईल हे कुमाच्या ध्यानीमनीही नव्हते. अखेर शिवसेनेने आपला निर्णय वेगळ्या भाषेत बदलायला सुरुवात केली आहे. गणेशोत्सवात थर्माकोल सजावटीला यंदाच्या वर्षीसाठी परवानगी देऊन प्लॅस्टिकबंदीला पहिल्याच दिवशी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी खो घातला. शिवसेना गणोशोत्सवातले आपले अर्थकारण व कार्यकर्त्यांची नाराजी दूर ठेऊ शकत नाही, हे थर्माकोलच्या बंदी उठविल्याने सिध्द झाले होते. आता तर सरकार एक एक नियम शिथील करीत चालले आहे. आता नव्याने काढलेल्या फतव्यानुसार, किरकोळ व्यापार्यांना पॅकिंगसाठी प्लॅस्टिक पिशव्या वापरण्याची परवानगी देऊन बंदीला खिंडारच पाडले. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची व्यापार्यांनी भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला, असे सांगण्यात आले. बुधवारी घेतलेल्या य निर्णयामुळे शिवसेना आपल्या निर्णयवर ठाम राहू शकत नाही, हे पुन्हा एकदा सिध्द झाले. आता नाणारच्या प्रकल्पासंबंधी तसेच म्हणता येईल. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरे तर सरकारने केलेल्या करारासंबंधी मुख्यमंत्र्यांना चांगलेच घेरले पाहिजे होते. परंतु तिकडे मात्र किरकोळ प्रमाणात या विषयावर बोलून शिवसेनेने चूप राहाणे पसंत केले. त्यामुळे नाणारच्या बाबतीतही असाच कधीतरी पुढे मागे निर्णय बदलला जाईल असे वाटते. जैतापूरच्या बाबतीतही असेच झाले होते. त्यामुळे शिवसेना सुरुवातीला एखाद्या बाबतीत आक्रमक होते, त्यात आपल्या कार्यकर्त्यांची माथी भडकवायची व नंतर काही तरी सौदेबाजी करुन पुन्हा माघार घ्यायची हे ठरलेले आहे. एन्रॉनपासून ते जैतापूरच्या बाबतीतही असेच झाले. आता नाणारच्या बाबतीतही त्याच मार्गाने शिवसेना जाईल, यात काही शंका नाही. प्लॅस्टिक बंदीचे देखील काही काळाने असेच होणार आहे. आता नव्या आदेशानुसार, प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग, थर्माकोल आणि प्लास्टिकच्या एकवेळ वापरता येणार्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. पाव किलोवरील किरणामालासाठी प्लास्टिक पिशव्या वापरता यतील. किरकोळ दुकानदार आणि उत्पादकांनी प्लास्टिक पॅकेजिंगच्या विल्हेवाटीची यंत्रणा उभारण्यास सांगितले आहे, अर्थातच ते कधीच शक्य होणार नाही. एकूणच प्लॅस्टिक बंदीचे हे कवित्व असेच सुरु राहाणार असे दिसते.
रुपयाची घसरगुंडी
डॉलरच्या तुलनेत रुपया गेले काही दिवस फार मोठ्या प्रमाणावर कमकुवत झाला आहे. गुरुवारी तर भारतीय चलन रुपयाने आतापर्यंतची सर्वात नीचांकी पातळी गाठली. रुपयाने 69.09 ही आतापर्यंतची सर्वात नीचांकी पातळी गाठली. त्यानंतर रुपयामध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली व रुपया 68.82 वर स्थिर आहे. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्चा तेलाच्या किंमती सध्या वाढू लागल्या आहेत व भविष्यातही वाढण्याची शक्यता आहे तसेच महागाई आणि वित्तीय तूट यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये घसरण झाली. बँका आणि आयातदारांकडून सातत्याने डॉलरची मागणी वाढत आहे. तेलांच्या वाढत्या किंमतींमुळे खास करुन तेल कंपन्यांकडून डॉलरची जास्त मागणी आहे. त्यामुळे रुपयावरील दबाव वाढला आहे. अमेरिकेने आपल्या मित्र राष्ट्रांना इराणकडून तेल खरेदी नोव्हेंबरपर्यंत संपवायला सांगितली आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजारात तेलाच्या किंमती वाढत आहेत. तेलाच्या वाढत्या किंमती आणि रुपयाची घसरण या दोघांचा भारतीय अर्थव्यवस्थेला दुहेरी फटका बसत आहे. रुपयाची घसरण रोखण्याचे रिझर्व्ह बँकेसमोरील आव्हान दिवसेंदिवस कठिण होत चालले आहे. यामध्ये वित्तीय तूटही वाढत चालली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणुकीच्या काळात रुपया मजबूत करुन 40 वर आणण्याचे आश्वासन दिले होते. परंतु मोदींची सर्व आश्वासने फेल गेली आहेत. त्यातीलच हे एक आश्वासन ठरले आहे. अर्थात निवडणुकीच्या काळात जनतेला मते जमा करण्यासाठी दिलेल्या आश्वासनांचे असेच असते, कारण सत्तेत नसताना व सत्तेत असताना राज्य करणे यात जमीन आसमानचा फरक आहे. मोदींनी आता तरी निदान अर्थव्यवस्थेवर बोलणे थांबविले आहे, कारण त्यांची बोलतीच बंद झाली आहे. जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या किंमती वाढल्याने सर्व गणिते बदलली आहेत. सध्याची रुपयाची घसरगुंडी ही मोदी सरकार थांबवू शकत नाही.
-------------------------------------------------------
-----------------------------------------------
प्लॅस्टिक बंदीचे कवित्व
शिवसेनेचे मंत्री कधीच आपल्या निर्णयावर ठाम नसतात तसेच शिवसेना घेतलेला निर्णय कधी फिरवेल याची शाश्वती देता येत नाही, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. प्लॅस्टिक बंदीचे स्वागत अनेक थारतून होत होते, सरकारने हा निर्णय पर्यावरणाच्या व संपूर्ण मानव जातीसाठी घेतलेला हा क्रांतीकारी निर्णय असे त्याचे वर्णन केले जात होते. मात्र या बंदीमागे असलेला राजकीय पदर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या ठाकरी भाषेत सांगितला असला तरी यातील राजकारण व आर्थिक संबंध आपण बाजुला ठेवू सरकारने व शिवसेनेच्या मंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय स्वागतार्हच होता. अर्थात असेल असले तरी या बंदीला अनेक फाटे फुटतील व ही बंदी बळूहळू शिथील केले जाईल हे कुमाच्या ध्यानीमनीही नव्हते. अखेर शिवसेनेने आपला निर्णय वेगळ्या भाषेत बदलायला सुरुवात केली आहे. गणेशोत्सवात थर्माकोल सजावटीला यंदाच्या वर्षीसाठी परवानगी देऊन प्लॅस्टिकबंदीला पहिल्याच दिवशी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी खो घातला. शिवसेना गणोशोत्सवातले आपले अर्थकारण व कार्यकर्त्यांची नाराजी दूर ठेऊ शकत नाही, हे थर्माकोलच्या बंदी उठविल्याने सिध्द झाले होते. आता तर सरकार एक एक नियम शिथील करीत चालले आहे. आता नव्याने काढलेल्या फतव्यानुसार, किरकोळ व्यापार्यांना पॅकिंगसाठी प्लॅस्टिक पिशव्या वापरण्याची परवानगी देऊन बंदीला खिंडारच पाडले. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची व्यापार्यांनी भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला, असे सांगण्यात आले. बुधवारी घेतलेल्या य निर्णयामुळे शिवसेना आपल्या निर्णयवर ठाम राहू शकत नाही, हे पुन्हा एकदा सिध्द झाले. आता नाणारच्या प्रकल्पासंबंधी तसेच म्हणता येईल. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरे तर सरकारने केलेल्या करारासंबंधी मुख्यमंत्र्यांना चांगलेच घेरले पाहिजे होते. परंतु तिकडे मात्र किरकोळ प्रमाणात या विषयावर बोलून शिवसेनेने चूप राहाणे पसंत केले. त्यामुळे नाणारच्या बाबतीतही असाच कधीतरी पुढे मागे निर्णय बदलला जाईल असे वाटते. जैतापूरच्या बाबतीतही असेच झाले होते. त्यामुळे शिवसेना सुरुवातीला एखाद्या बाबतीत आक्रमक होते, त्यात आपल्या कार्यकर्त्यांची माथी भडकवायची व नंतर काही तरी सौदेबाजी करुन पुन्हा माघार घ्यायची हे ठरलेले आहे. एन्रॉनपासून ते जैतापूरच्या बाबतीतही असेच झाले. आता नाणारच्या बाबतीतही त्याच मार्गाने शिवसेना जाईल, यात काही शंका नाही. प्लॅस्टिक बंदीचे देखील काही काळाने असेच होणार आहे. आता नव्या आदेशानुसार, प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग, थर्माकोल आणि प्लास्टिकच्या एकवेळ वापरता येणार्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. पाव किलोवरील किरणामालासाठी प्लास्टिक पिशव्या वापरता यतील. किरकोळ दुकानदार आणि उत्पादकांनी प्लास्टिक पॅकेजिंगच्या विल्हेवाटीची यंत्रणा उभारण्यास सांगितले आहे, अर्थातच ते कधीच शक्य होणार नाही. एकूणच प्लॅस्टिक बंदीचे हे कवित्व असेच सुरु राहाणार असे दिसते.
रुपयाची घसरगुंडी
-------------------------------------------------------
0 Response to "प्लॅस्टिक बंदीचे कवित्व / रुपयाची घसरगुंडी"
टिप्पणी पोस्ट करा