हूश...नोटाबंदी संपली!
बुधवार दि. 15 मार्च 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख
------------------------------------------------
हूश...नोटाबंदी संपली!
मोदी सरकारने 8 नोव्हेंबर रोजी पाचशे आणि हजाराच्या नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर एटीएम आणि बँकांमधून पैसे रोख रक्कम काढण्यावर घालण्यात आलेल्या मर्यादा आता उठविण्यात आल्या आहेत. बँक अथवा एटीएममधून पैसे काढण्यावरील सर्व निर्बंध उठवण्यात आले आहे, असे सरकारतर्फे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले. त्यामुळे आता बँकांमधून लोक पूर्वीप्रमाणेच कितीही पैसे काढू शकतील. सध्या आठवड्यास एटीएममधून आणि बँकेतून बचत खात्यातून जास्तीत जास्त 24 हजार रुपये काढण्यासच परवानगी होती. 20 फेब्रुवारीला म्हणजेच पहिल्या टप्प्यात दर आठवड्याला पन्नास हजार रुपये बचत खात्यातून काढण्यात परवानगी देण्यात आली होती. मात्र यानंतर देशातील अनेक भागांतून एटीएम केंद्रातील पैसे संपल्याच्या तक्रार आल्या होत्या. गेल्या चार महिन्यात नोटाबंदीनंतर पेटीएमसारख्या डिजिटल पेमेंट करणार्या कंपन्यांना सुगिचे दिवस आले होते. मात्र याचा फायदा उठवित पेटीएमने क्रेडिट कार्डद्वारे पेटीएमच्या वॉलेटमध्ये पैसे हस्तांतरित करण्यासाठी दोन टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र याला विरोध होताच पेटीएमने हा निर्णय मागे घेतला आहे. पेटीएमची स्पर्धक असलेल्या मोबिक्विक या कंपनीने क्रेडिट कार्डावरून वॉलेटमध्ये येणार्या रकमेवर शुल्क आकारण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. सध्या, पेटीएमने निर्णय मागे घेतला असला तरीही मोबिक्विने हे शुल्क कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. क्रेडिट कार्डद्वारे पेटीएमचे युजर्स क्रेडिट कार्डद्वारे पेटीएमच्या वॉलेटमध्ये पैसे हस्तांतरित करतात. त्यापैकी काही युजर्स रोख रक्कम वापरता यावी यासाठी पेटीएमवरील वॉलेटमधील रक्कम बँक खात्यात हस्तांतरित करतात. या प्रकारामध्ये पेटीएमला मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते. ही बाब लक्षात आल्याने कंपनीने क्रेडिट कार्डद्वारे पैसे हस्तांतरित करणार्यांवर दोन टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी जाहीर केला होता. नोटाबंदीच्या काळात पेटीएमसारख्या कंपन्या तसेच क्रेडिट कार्डांना सुगीचे दिवस आले होते. आता त्यांचा व्यवसाय पुन्हा घसरण्यची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या नोटाबंदी अधिकृतरित्या तरी संपली याबद्दल सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल.
---------------------------------------------------------

0 Response to "हूश...नोटाबंदी संपली!"
टिप्पणी पोस्ट करा