-->
उडान यशस्वी होईल का?

उडान यशस्वी होईल का?

संपादकीय पान सोमवार दि. २४ ऑक्टोबर २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
उडान यशस्वी होईल का?
विमान प्रवास सामान्य माणसाच्या आवाक्यात आणण्याच्या उद्देशाने उडे देश का आम नागरिक या घोषवाक्यासह घोषणा करण्यात आलेल्या प्रादेशिक संपर्क योजनेचा महाराष्ट्राला मोठा लाभ होणार आहे. जानेवारी २०१७ पासून केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. या योजनेचा शिर्डीसह राज्यातील सुमारे १० शहरांना फायदा होईल. या योजनेमुळे एका शहरातून दुसर्‍या शहरात जाण्यासाठीचा विमान प्रवास अवघ्या दोन हजार पाचशे रुपयांत शक्य होणार आहे. नागरी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू व राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी दिल्लीत उडाण योजनेची घोषणा केली. सिन्हा यांच्या म्हणण्यानुसार सर्वसामान्यांनाही हवाई प्रवास घडविणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत संबंधित शहरांत विमानसेवा सुरू करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांनी दोन डिसेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. पुढच्या तीन दिवसांत त्यांची छाननी केली जाईल व नंतरच्या किमान १० आठवड्यांत त्याबाबतची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होईल. केवळ २,५०० रुपये तिकीट असले, तरी या योजनेसाठी खासगी विमान वाहतूक कंपन्यांनीही रस दाखविल्याचा दावा सरकारने केला केला. मात्र यात जर कोणच पुढे आले नाही तर ही योजना एअर इंडिया सरकारी विमान कंपनीच्या माथी मारली जाईल. अर्थातच आता कुठे एअर इंडिया नुकतीच नफ्यात आली आहे, तिला बहुदा पुन्हा तोट्याच्या खड्यात टाकण्याचा नागरी उड्डयण मंत्रालयाचा बेत दिसतो. कमी दरातील विमानसेवा सुरू करण्यासाठी देशातील विकसित-प्रगत राज्यांनी मुख्यत्वे पुढाकार घेतला आहे. त्यातही महाराष्ट्राने सर्वाधिक रूची दाखविताना उडाण योजनेबाबत केंद्राशी दोन महिन्यांपूर्वीच सामंजस्य करार केला आहे. राज्यातील १० शहरे पहिल्या टप्प्यात या योजनेच्या रडारवर घेण्याचा सरकारचा मानस आहे. यात देशविदेशांतील भाविकांची वर्दळ असलेल्या शिर्डीसह नांदेड, अमरावती, गोंदिया, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव या शहरांचा समावेश केला जाणार आहे. साधारणतः प्रत्येकी ३० ते ४० आसन क्षमतेची विमाने या मार्गांवरील सेवांसाठी वापरली जातील. अनेकदा यातील यापूर्वी ही शहरे विमानाने जोडण्याची कल्पना हवेत विरली होती. तर काही ठिकाणी त्यांना अल्प प्रतिसाद लाभला होता. मात्र आता हा प्रयोग पुन्हा राबविण्यात येणार आहे. यात उडाणचा प्रयोग यशस्वी होईल का, असा सवाल आहे.
----------------------------------------------------------

0 Response to "उडान यशस्वी होईल का?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel