-->
देशद्रोही कोण?

देशद्रोही कोण?

रविवार दि. ०७ ऑगस्ट २०१६ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
देशद्रोही कोण?
----------------------------------
एन्ट्रो- संपूर्ण भाषण एैकल्यावर भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात धोरणात्मक बोलणे म्हणजेे जर देशद्रोह असेल तर तो देशद्रोह करतो असेच म्हणावे लागेल. कन्हैयाचे भाषण जेमतेम २० मिनीटे झाले. परंतु त्यात त्याने सध्याच्या सरकारचे वाभाडे काढले. व्होट हमारा, राज तुम्हारा नही चलेगा, नही चलेगा. देश हमारा, मस्ती तुम्हारी, नही चलेगी, नही चलेगी असे त्याने ठणकावले. कन्हैया हा शेतकर्‍याचा मुलगा, त्याची आई तीन हजार रुपयांवर आंगणवाडीत काम करते. त्याचा भाऊ सीमेवर मारला गेला आहे, असा हा कन्हैया देशाच्या विरोधात कसे बोलेल. आम्हाला असे वाटते कन्हैयाकुमार हा सर्वसामान्यांची भाषा बोलतो...
-------------------------------------------
जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार याचे आक्रमक भाषण एैकण्याची संधी शेकापच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मिळाली. त्याचे भाषण पाहता तो काही देशद्रोही नाही याची ठाम समजूत झाली. महाराष्ट्रातील कन्हैयाकुमारचा हा चौथा दौरा होता. त्यातच रायगड जिल्ह्यातील पहिलाच जाहीर कार्यक्रम. त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप झालेला असल्यामुळे २८ वर्षाचा हा पोरगा काय बोलतो? याबाबतीत बरीच उत्सुकता होती. मात्र संपूर्ण भाषण एैकल्यावर भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात धोरणात्मक बोलणे म्हणजेे जर देशद्रोह असेल तर तो देशद्रोह करतो असेच म्हणावे लागेल. कन्हैयाचे भाषण जेमतेम २० मिनीटे झाले. परंतु त्यात त्याने सध्याच्या सरकारचे वाभाडे काढले. व्होट हमारा, राज तुम्हारा नही चलेगा, नही चलेगा. देश हमारा, मस्ती तुम्हारी, नही चलेगी, नही चलेगी असे त्याने ठणकावले. कन्हैया हा शेतकर्‍याचा मुलगा, त्याची आई तीन हजार रुपयांवर आंगणवाडीत काम करते. त्याचा भाऊ सीमेवर मारला गेला आहे, असा हा कन्हैया देशाच्या विरोधात कसे बोलेल. आम्हाला असे वाटते कन्हैयाकुमार हा सर्वसामान्यांची भाषा बोलतो. आम्ही शेतकर्‍यांची मुलं आहोत, कामगारांची मुल आणि आमचे भाऊ सिमेवर लढत आहेत त्यांची मुलं जेव्हा शिकू लागतात, आपल्या हक्कांची मागणी करु लागतात, आपल्या अधिकारांबाबत बोलू लागतात तेव्हा काही लोकांना आपली खुर्ची डलमळताना दिसू लागते. त्यामुळेच ते खोटे आरोप लावायला सुरुवात करतात. समजा की काही मुलं देशाच्या विरोधात काही बोलले, चुकीचे केले जे नको करायला हवे होते, त्यांच्या विरोधात जी कारवाई व्हायला हवी ती करायलाच हवी, असे तो प्रामाणिकपणे सांगतोही. अर्थात कन्हैया हा डावा विचार मांडतो, या देशातील गरीब, दलित, वंचितांचे तो आज प्रश्‍न मांडतोय. सर्वसामान्यांचे प्रश्‍न मांडणे हा काही गुन्हा नाही. त्याला मुंबईतील एका बाजूची शेअर बाजाराची उत्तुंग इमारत दिसते, रिलायन्सचा अब्जावधी रुपयांचा उंच बंगलाही दिसतो. मात्र या सार्वंच्या कुशीत विसावलेल्या आशियातील झोपडपट्टी धारावीचे प्रश्‍न तुम्ही कसे सोडविणार, तेथे राहाणारी माणसे ही माणसे नाहीत का? हा त्याचा सवाल सर्वांनाच अस्वस्थ करतो. मुंबई, महाराष्ट्र किंवा देश शेअर बाजारातून नाही बनत तर तो शेतकरी, कामगार यांच्या आंदोलनातून, त्यांच्या संघर्षातून आणि त्यांच्या लढयातून उभा राहतो. ही लढाई कसली आहे तर ती लढाई म्हणजे दोन वेळच्या जेवणाची लढाई आहे. मुंबई, दिल्लीत ट्रेन, मेट्रो, बसमधून प्रवास करीत डब्यात जेवण घेऊन लोकं कामाला जातात. डबेवाले कामागारांसाठी फिरुन फिरुन जेवण पोहचवतात. कामगार मोलमजूरी करतात, शेतकरी शेती करुन जनतेसाठी धान्य पिकवतात. यांच्यामुळे देश घडतो, कन्हैयाकुमारने मांडलेले हे प्रश्‍न आज आपल्याला देशाला भेडसाविणारे प्रश्‍न आहेत. मग तो देशद्रोही कसा? निवडणुकीपूर्वी अशाच प्रकारचे प्रश्‍न व भ्रष्टाचार, काळा पैसा हे प्रश्‍न घेऊन मोदी बाजारात उतरले होते. त्यांनी लोकांच्या भावनेला हात घातला, मात्र सत्ता येताच त्यांच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्याचे सोडूनच द्या, फक्त विदेशात सफरी करण्याचे एक कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. ही निव्वळ फसवणूक होती. आज देश आम्ही जाती, धर्माच्या प्रश्‍नावर विभागू देणार नाही, असा त्याचा निर्धार कोणालाही सहज पटेल असा आहे. देशात जे लोक फक्त आणि फक्त दलितांविषयी बोलतात त्यांच्यासाठी काहीच करत नाही, त्यांचा मागासलेपण संपतो, पण दलितांचा मागासलेपण काही जात नाही, जे गरीबांविषयी बोलतात त्यांची गरीबी जाते पण गरीबांची जात नाही. आम्हाला याचे उत्तर हवे आहे. शेतकरी कामगार गरीबांच्या मुलांच्या भवितव्याबाबत काहीच का होत नाही. जोपर्यंत असे होणार नाही आम्हाला आमचे हक्क आणि अधिकार दिले जाणार नाहीत तोपर्यंत आम्ही समानहक्कांची लढाई जिंकत नाही तोपर्यंत ही लढाई सुरुच राहील तुम्ही गोळ्या घाला, तुरुगांत डांबा, लाठीमार करा पण अम्ही थांबणार नाही, आम्ही वाकणारही नाही असा कन्हैयाने दिलेला इशारा सत्ताधार्‍यांची झोप उडविणारा आहे, याबाबत काही शंका नाही. आज एका बाजुला निवडक श्रीमंतांकडे अमाप संपत्ती आहे तर दुसर्‍या बाजूला दोन वेळचे जेवणपण मिळत नाही. मुलांना शिकविण्यासाठी शिक्षण नाही देता येत. लोकांना पैशाअभावी उपचार होत नाही, रुग्णालयं नाहीत आरोग्याच्या कसल्याही व्यवस्था नाहीत. आपण कोणता देश बनवू पाहतो आहोत ज्या देशात समान हक्क नाही असा देश आम्हाला नको आहे. आम्हाला समान हक्क असलेला देश हवा आहे, हा कन्हैयाचा विचार म्हणजे सर्वसामान्यांच्या मनातला आवाज आहे. म्हणूनच हा आवाज दाबण्यासाठी सरकारने त्याला देशद्रोही ठरविले आहे. एवढ्या मोठ्या शासनयंत्रणेला या २८ वर्षाच्या पोराची खरे तर भीती वाटता कामा नये. त्याला महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश नाकारला जाणे म्हणजे सत्ताधार्‍यांची यावरुन मनोवृत्ती दिसते. कन्हैयाकुमार हा देशद्रोही नाही, तर त्याच्यावर हा आरोप ठेवण्याचा राजकीय कट आहे.
------------------------------------------------------------

0 Response to "देशद्रोही कोण?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel