ऑलिंपिकचे मोहरे गळले?
संपादकीय पान बुधवार दि. २७ जुलै २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
ऑलिंपिकचे मोहरे गळले?
पैलवान नरसिंग यादव याच्यानंतर रिओ ऑलिंपिकला पात्र झालेला आणखी एक खेळाडू डोपिंग टेस्टमध्ये फेल झाला आहे. शॉटपुट प्लेयर इंदरजीत सिंहला बंदी असलेले औषध घेतल्याने दोषी ठरविले गेले. इंदरजीतच्या म्हणण्यानुसार, माझ्याविरोधात कटकारस्थान रचले गेले आहे. नॅशनल अँटी डोपिंग एजेंसी (नाडा)चे म्हणणे आहे की, जर तो ही टेस्ट पुन्हा करू इच्छित असेल तर त्याने सात दिवसात ती करावी. जर त्याचे सॅम्पल पॉजिटिव आले तर तो रिओला जावू शकणार नाही. तसेच त्याच्यावर चार वर्षाची बंदी घातली जाऊ शकते. इंदरजीत त्या अशा निवडक ऍथलीट्सपैकी एक आहे जो नॅशनल कॅम्पमध्ये ट्रेनिंग घेत नाहीत तर तो स्वत: प्रॅक्टिस करतो. गेल्याच वर्षी तो एशियन चॅम्पियनशिप, एशियन ग्रँड पिक्स आणि वर्ल्ड यूनिवर्सिटी गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकले आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये तो पदकाचा दावेदार होता. डोपिंग चाचणीत अडकलेला कुस्तीपटू नरसिंग यादवचा रूम पार्टनर आणि ५७ किलो वजन गटातील मल्ल संदीप यादवसुद्धा डोपिंग चाचणीत अडकला आहे. दोन्ही मल्ल आणि कुस्ती फेडरेशनला यात षड्यंत्र दिसत असून या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा या प्रकरणात हस्तक्षेप करताना कुस्ती फेडरेशनला सविस्तर माहिती मागितली आहे.
आताच्या घडामोडींवर सुशीलकुमारने २० सेकंदांचा एक व्हिडिओ मेसेज सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यात त्याच्या सांगण्यानुसार, कुस्तीत जे काही घडत आहे, ते दुर्दैवी आहे. मी माझे जीवन कुस्तीला दिले आहे. मी नेहमी माझ्या सहकारी खेळाडूंचे समर्थन केले आहे. नरसिंगचे नाव घेता सुशील म्हणाला, मला नेहमी देशासाठी तिसरे पदक आणायचे होते. मात्र, मागच्या एक महिन्यापासून मी ऑलिम्पिकच्या तयारीतून दूर झालो. मी आता सुद्धा माझ्या सहकारी मल्लांचे समर्थन करतो. ते देशासाठी पदक आणतील, अशी आशा करतो, असेही सुशीलने म्हटले. कुस्ती फेडरेशनने दिलेल्या माहितीनुसार नरसिंगच्या जागी सुशीलकुमार किंवा इतर कोणत्याही मल्लाला पाठवण्यात येणार नाही. नरसिंग यादव प्रकरणी अंतिम निर्णय काय असेल याचा निर्णय गुरुवारी कळू शकेल. एका महिन्यात तब्बल तीन वेळा एखाद्या खेळाडूची डोप चाचणी का करण्यात आली? असे साधारणपणे होत नाही. मात्र, नरसिंग यादवबाबत असे ठरवून करण्यात आल्याचे दिसते. कांस्यपदक जागतिक स्पर्धेत जिंकून नरसिंगने रिओची पात्रता मिळवली होती. अशा प्रकारे खेळाडूंना बदनाम करणे व त्यांना अपात्र ठरविणे हे एक छडयंत्र असल्याचा जो आरोप आहे त्याबाबत स्पष्ट व्हायला पाहिजे.
------------------------------------------------------

0 Response to "ऑलिंपिकचे मोहरे गळले?"
टिप्पणी पोस्ट करा