-->
लाल फितीचा उद्रेक

लाल फितीचा उद्रेक

संपादकीय पान गुरुवार दि. १६ जून २०१६ च्या अंकासाठी अग्रलेख --
--------------------------------------------
लाल फितीचा उद्रेक
राज्याच्या कारभाराचे मुख्य केंद्र असलेल्या मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर तिघा जणांनी एकाच दिवशी तीघांनी आत्महत्येचा प्रयत्न करणे म्हणजे सरकारी यंत्रणेला एक मोठी चपराक आहे. लाल फितीच्या कामाचा उद्रेक झाल्याने या तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयाचे उंबरठे झिजवूनही कामे होत नसल्याने सरकारी कामाला कंटाळून या आत्महत्येचा प्रयत्न झाला आहे. याबद्दल शासकीय यंत्रणेला लाज वाटली पाहिजे परंतु त्यांना लाज वाटणे सोडा परंतु आपला पगार कसा वाढेल याकडेच त्यांचे लक्ष लागून आहे. औरंगाबाद येथील शेतकरी दिलीप मोरे, मुलुंड येथील दिलीप पड्याळ व हिरालाल ढाकणे अशा या तिघांची नावे आहेत. दिलीप मोरे व दिनेश पड्याळ या दोघांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तर हिराला ढाकणे याने मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या तिघांची आत्महत्या करण्याची कारणे पाहिल्यास सर्वसामान्य जनतेला आपली कामे करण्यासाठी किती दिव्य भोगावे लागते याचा अंदाज येऊ शकतो. औरंगाबाद येथील शेतकरी दिलीप मोरे यांच्या भावाची २०११ साली हत्या झाली होती. मात्र स्थानिक पोलिसांनी भावाची हत्या झाल्याची नोंद केली होती. त्याविरोधात मोरे हे मंत्रालयात सतत फेर्‍या मारुन दाद मागत आहेत. परंतु त्यांना कोणीच न्याय दिलेला नाही. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी ते मंगळवारी आले असता त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे त्यांचा संयम सुटला व त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. मुंबईतील मुलुंड येथील रहिवासी दिनेश पड्याळ हे गेली दोन वर्षे मंत्रालयात सतत आपली पावले झिजवत आहेत. मुलुंड येथे एका एस.आर.ए. योजनेत घर हवे होते. त्यांची ही फिर्याद एैकून घ्यायलाही कुणी तयार होत नाही. घर मिळणे तर दूरच. त्यामुळे शेवटी नैराश्येपोटी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर झोपेच्या गोळ्या खावून आत्महत्येचा प्रयत्न केला. जळगावचा राहाणारा मागासवर्गीय विद्यार्थी हिरालाल ढाकणे हा सध्या नवी मुंबईत राहातो. मुंबईतून तो एका महाविद्यालयातून बी.एम.एम. करीत आहे. त्याला मिळत असलेली शिष्यवृत्ती सध्या बंद झाल्याने त्याची जगण्याची मारामार सुरु आहे. त्याबाबत मंत्रालयात त्याने वारंवार खेट्या घालूनही त्याच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे त्याने मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरुन उडी टाकून जीव देण्याचा प्रयत्न केला. या तिनही घटना पाहिल्यास मन उद्दीग्न होते. सरकार व नोकरशाही किती निर्ढावलेली आहे त्याची उत्तम उदाहरणे ही आहेत. सरकारच्या दरबाबी खेटा घातल्यावरही कामे होत नाहीत. अर्थात एकीकडे हे सरकार सर्व व्यवहार ऑनलाईन करीत असल्याचा डंका पिटवीते. सर्वसामान्य जनतेच्या फडणवीस सरकारकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. कारण त्यांनी निवडणुकीत तशीच आश्‍वासने देऊन लोकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यातुलनेत मात्र काम काहीच नाही अशी स्थीती आहे. सरकारने या तीनही घटनांची गंभीर दखल घेऊन यापुढे तरी लोकांची कामे कशी झपाट्याने होतील हे पाहिले पाहिजे.

0 Response to "लाल फितीचा उद्रेक"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel