भारताचे प्रत्यूत्तर
गुरुवार दि. 25 मे 2017च्या संपादकीय पानासाठी अग्रलेख
-----------------------------------------------
भारताचे प्रत्यूत्तर
पाकिस्तानकडून सातत्याने होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला उत्तर देण्यासाठी आणि दहशतवादाचा बिमोड कऱण्यासाठी मंगळवारी भारतीय सैन्याने जोरदार प्रत्यूत्तर दिले. सप्टेंबर 2016 मधील सर्जिकल स्ट्राईकनंतर सैन्याकडून कऱण्यात आलेली ही कारवाई दहशतवाद्यांना धडा शिकविण्यासाठी अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे.सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान आता नरमेल व फार काही करणार नाही असे भारतास वाटत होते. मात्र हा त्यांचा अंदाज खोटा ठरला. पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवाया काही कमी झालेल्या नाहीत. सीमेवरुन अतिरेकी घसुविण्याचे प्रकार काही थांबलेले नाहीत. सैन्याने पाकच्या चौक्या उदध्वस्त केल्याने तणावात भर पडण्याची शक्यता आहे. अशाप्रकारे कारवाई करुन भारतीय सैन्य सज्ज असल्याचे पाकला दाखवून देणे गरजेचे आहेे.सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी दहशतवाद्यांचे तळ उदध्वस्त करण्यात आले होते. त्यानंतर भारतीय सैन्याकडून आता ही कारवाई करण्यात आली. मागील काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून होत असलेल्या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी 20 आणि 21 मे रोजी नौशेरा भागात भारतीय सैन्याकडून कारवाई करण्यात आली होती. पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याने भारताने याविरोधात कठोर पावले उचलण्याची आवश्यकता होती. त्यामुळे भारताने आता उचललेले आक्रमक पाऊल अतिशय योग्य आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधात असताना पाकिस्तानला चोख उत्तर देण्याची गरज आहे. त्यांनी जर आपला एक जवान मारला तर त्याबदल्यात आपण त्यांचे 50 जण मारले पाहिजेत अशी भाषा केली होती. मात्र आता मोदी पंतप्रधानपदी आरुढ होऊन तीन वर्षे लोटली असली तरीही 56 इंचाची छाती काही दिसत नाही. पाकिस्तान विरोधी अशी भाषणे करणे सोपे आहे. त्यामुळे टाळ्याही मिळतात व मतेही मिळविता येतात. मात्र सत्तेत आल्यावर कारवाई करुन पाकला धडा शिकविणे तितकेसे सोपे नाही हे आता मोदींना पटले असावे. मात्र ते खुले आम काही ही वस्तुस्थिती मान्य करायला तयार नाहीत.
-------------------------------------------------------

0 Response to "भारताचे प्रत्यूत्तर"
टिप्पणी पोस्ट करा