-->
थंडीची जोरदार लाट

थंडीची जोरदार लाट

संपादकीय पान बुधवार दि. 18 जानेवारी 2017 च्या अंकासाठी अग्रलेख 
--------------------------------------------
थंडीची जोरदार लाट
नोटबंदीनंतर देशातील वातावरण गरम झाले असताना तसेच पाच राज्यातील निवडणुका येऊ घातल्याने राजकीय गरमागरमी वाढली असताना संपूर्ण देश थंडीने कुडकुडत आहे. आजवर कधी नव्हे एवढी थंडी यंदा पडलेली पहावयास मिळते. अनेक शहरातील ठंडीचे यापूर्वीचे विक्रम मोडले जात आहेत. उत्तर भारतातून गेल्या आठवड्यापासून ही थंडीची लाट सुरु झाली. जम्मूचे तापमान 3.7 डिग्री तर लेहचे-13.9 डिग्री सेल्सिअस झाले. शिमल्यासह अनेक भागांत वीज गूल झाल्याने लोकांचे जीवन कठीण झाले आहे. सध्याच्या मोसमात प्रथमच राजस्थानमध्ये पारा शून्य अंशाच्या खाली गेला. मध्य प्रदेशात 16 शहरांमध्ये तापमान 10 डिग्रीपर्यंत खाली उतरले आहे. बहुतांश महाराष्ट्रही थंडीने गारठून गेला आहे. महाबळेश्‍वरनेे कधी नव्हे ती बर्फाची चादर पांघरली आहे. जळगाव, नाशिकमध्येही जबरदस्त गारवा आहे. नेहमी घामाच्या धारा वाहाणार्‍या मुंबईकरांच्या नशिबात सध्या थंडीने चांगलेच वास्तव्य केले आहे. मुंबईचे तापमान 12.5 अंश सेल्सिअसवर पोहोचलेले आहे.
मकर संक्रांतीनंतर उत्तरायण सुरू होते आणि वातावरणात पुन्हा उष्णता निर्माण होते. परंतु यावेळी मकरसंक्रांत ही पार थंडीत गेली आहे. थंडीच्या दिवसात खाण्यास योग्य असलेल्या तीळाच्या लाडवांचे वाटप आता गोड बोलण्याच्या अटींवर सुरु झाल्याने शरीरातही उबदारपणा येऊ लागला आहे. यंदा जरा जास्तच थंडी पडल्याने चिंता वाटणे स्वाभाविक आहे. अर्थात हा जागतिक पातळीवरील कल आहे. मानवाने निसर्गाकडील अनेक बाबी ओरबाडल्या आहेत. आता निसर्ग त्यामुळे मानवावर कोपत चालला आहे. मात्र हा कोप जर टोकाला पोहोचला तर हे जगच विनाशाच्या उंबरठ्यावर पोहचू शकते. अर्थात याची दखल विकसीत देशांनी घ्यायसा सुरुवात केली आहे. मात्र नैसर्गिक संपत्तीचा र्‍हास खरे तर विकसीत देशांनीच पहिला मोठ्या प्रमाणावर सुरु केला हे देखील वास्तव विसरता येणार नाही. बदलते हवामान हा जागतिक स्तरावर चिंतेचा विषय झालेला आहे. गेल्या वर्षी फ्रान्स येथे पार पडलेल्या जागतिक पर्यावरण परिषदेत यावर ऊहापोह करण्यात येऊन, भारतासह 192 देशांनी याबाबत केलेल्या करारावर सह्याही केलेल्या आहेत. मात्र याची अंमलबजावणी प्रबावीपणे होण्याची गरज आहे. पृथ्वीभोवती असलेले ओझोनचे आच्छादन दिवसेंदिवस विरळ होत चालले आहे. याचे कारण सध्या आपण विघातक वायूंची मोठ्या प्रमाणातच निर्मिती करतो व परिणामी त्यातूनच आपण आपल्याला संपवत चाललो आहोत. हे जर संपवायचे असले तर प्रत्येकाने दक्षता बाळगली पाहिजे. बदलते तापमान हा चिंतेचा विषय असून त्याबाबत जगात जागृती होण्याची आवश्यकता आहे.
---------------------------------------------------------------

0 Response to "थंडीची जोरदार लाट"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel