-->
रविवार दि. ११ जानेवारी २०१५ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
अमेरिकन महासत्तेला वंशभेदाची वाळवी
एन्ट्रो- अमेरिकेत दर पाचपैकी एक गुन्हा वंशभेदातून घडत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. अमेरिकेमध्ये ज्यू, इस्लाम या धर्माच्या लोकांविषयी प्रचंड तिरस्काराची भावना असून गुन्हेगारीमध्ये या नागरिकांचा बळी घेतला जात असल्याचे उघड झाले आहे. ङ्गेडरल ब्युरो ऑङ्ग इन्व्हेस्टीगेशनने (एङ्गबीआय) ही आकडेवारी जाहीर केली आहे. अमेरिकेमध्ये २०११ मध्ये  ६,२२२ वर्णद्वेषाच्या गुन्ह्यांची नोंद झाली. त्या आधीच्या आकडेवारीपेक्षा ही आकडेवारी सहा टक्क्यांनी जास्त आहे. या सर्व गुन्ह्यांमध्ये शारीरिक आणि कौटुंबिक छळ, बलात्कार, खून या सारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे...

जगाला समता, एकोप्याचे धडे शिकवणार्‍या अमेरिकेत अजूनही वंशभेद संपलेला नाही, हे विदारक वास्तव पुन्हा एकदा जगापुढे आले आहे. अलीकडेच अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एरिक गार्नर या कृष्णवर्णीय  नागरिकाच्या मृत्यूप्रकरणी डेनियल पेंटालियो या श्‍वेतवर्णीय पोलिस अधिकार्‍याला ग्रँड ज्युरींनी (संयुक्त पीठ) निर्दोष मानले असून त्याच्यावर कारवाई करण्यात येऊ नये असे निर्देश दिले आहेत. न्यायाधीशांच्या या निर्णयाने कृष्णवर्णीय नागरिकांमध्ये संताप उसळून आला असून या प्रकरणाचा विरोध दर्शवण्यासाठी ते रस्त्यावर उतरले आहेत. जुलै महिन्यात गार्नर या कृष्णवर्णीय नागरिकाला उघड्यावर सिगारेटची विक्री केल्याच्या आरोपावरुन अटक करुन जमिनीवर ङ्गेकण्यात आले होते. आपल्याला श्वास घ्यायला अडचण होत आहे, असे गार्नर याने सांगितल्यावरही पोलिसांनी त्याला सोडले नाही.  नंतर त्या मारहाणीमध्ये गार्नरचा मृत्यू झाला. एकीकडे हे प्रकरण चर्चेत असताना ङ्गर्ग्युसन हे शहरही चर्चेत आले. तेथे मायकेल ब्राऊन या १८ वर्षीय आङ्ग्रिकन-अमेरिकन तरुणावर डेरेन विल्सन या अमेरिकन पोलिस अधिकार्‍याने गोळ्या झाडल्या होत्या. या प्रकरणामध्ये १२ न्यायाधीशांच्या खंडपीठाने डेरेन विल्सन याच्या विरोधात खटला चालवायला नकार दिला होता. यामुळे कृष्णवर्णीय लोकांच्या आङ्ग्रिकन-अमेरिकन समुदायामध्ये असंतोष निर्माण होऊन व्हाईट हाऊससह देशभर विरोध प्रदर्शन करण्यात आले. ङ्गर्ग्युसन पोलिस मुख्यालयासमोर त्यांचे आंदोलन हिंसक बनले. तेथे जमलेल्या जमावाने पोलिसांची वाहने पेटवली तसेच पोलिस मुख्यालयावर वीटा, दगड, बॅटर्‍या ङ्गेकल्या. सार्‍या देशभर वंशभेदाच्या विरोधातील हे आंदोलन आगीच्या ज्वालांप्रमाणे भडकले. त्यातून वंशभेदाविषयीची अमेरिकेची संवेदनशीलता पुन्हा एकदा उघड झाली आहे.
वास्तविक, भारतातील जातीगत आरक्षणाच्या मुद्याप्रमाणेच अमेरिकेमध्ये वंशभेद हा संवेदनशील मुद्दा राहिला आहे. गुलामीच्या मुक्तीसाठी चालवण्यात आलेल्या अब्राहम लिंकन यांच्या दासमुक्ती घोषणेपासून मार्टिन ल्यूथर किंगच्या नागरिक अधिकारापर्यंतचा दीर्घ मार्ग अमेरिकेने पार केला असला तरी आज देशामध्ये वंशभेदाचा राक्षस पुन्हा डोके वर काढतो आहे, असे वाटायला लागते. येथील आङ्ग्रिकन-अमेरिकन समुदाय आर्थिक आणि सामाजिक समानता प्राप्त करण्यासाठी तडङ्गडत आहे. येथे जातीय भेदभाव आणि जातीय पूर्वाग्रहाने कसे घर केले आहे त्याची कल्पना काही गोष्टींमधून येते. येथील आङ्ग्रिकन-अमेरिकन समुदायातील लोक सातत्याने गरिब होत चालले आहेत, त्यांच्या शिक्षणाची पातळी तुलनात्मकदृष्ट्या निम्न आहे. त्याचप्रमाणे त्यांना रोजगार मिळवण्यासाठी अमेरिकन लोकांच्या तुलनेत जास्त अडचणींचा सामना करावा लागत आहे.
येथील एमर्सन कॉलेज पोलिंग सोसायटीचा या वर्षीचा रिपोर्ट जारी झाला असून त्यानुसार देशातील दोन वंशांच्या लोकांमधील संबंध निरंतर बिघडत आहेत हे ६१ टक्के आङ्ग्रिकन-अमेरिकन लोक मान्य करतात. जातीय पृथ:करण ही आधुनिक अमेरिकेतील कटू वस्तुस्थिती बनली आहे. न्यूयॉर्कसारखी मोठी शहरे असोत किंवा स्प्रिंगङ्गिल्डसारखी मध्यम शहरे, प्रत्येक ठिकाणी श्‍वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय नागरिक वेगवेगळ्या समूहामध्ये राहतात. शिकागोमध्ये आङ्ग्रिकन-अमेरिकन समुदाय शहराच्या दक्षिण भागामध्ये राहतो तर अन्य उर्वरित भागामध्ये राहतात. बराक ओबामा अमेरिकेचे पहिले आङ्ग्रिकन-अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बनले त्यावेळी जातीय भेदभाव आणि पूर्वाग्रहाने मुक्त अशा एका नव्या अमेरिकेचा उदय होईल, असे वाटले होेते. ओबामा यांनी हा गौरव प्राप्त करुन आता सहा वर्षे उलटून गेली आहेत. पण, सहा वर्षे उलटल्यानंतरही मूळ स्थितीत कोणताही बदल झालेला नाही.
सामाजिक कार्यकर्त्यांच्या मतानुसार न्याय न मिळण्याच्या अवस्थेत पीडितांची हताशा दंग्याचे कारण बनते. १९६८ मध्ये डेट्रॉईट, लॉसएंजिल्स, शिकागो आणि न्यूयॉर्कमध्ये भीषण दंगल झाल्यानंतर केर्नर आयोगाची स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी अमेरिकेमध्ये श्‍वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय यांच्या रुपामध्ये दोन वेगवेगळे आणि असमान समाज निर्माण होत आहेत, असे या आयोगाने म्हटले होते. असमानतेची ही दरी आज ४६ वर्षांनंतरही आहे तशीच आहे. या मुद्यावर आपण चिंतन करावे तसेच वंशवाद संपवण्याच्या दिशेने गांभीर्याने विचार करावा अशी संधी ङ्गर्ग्युसनसारख्या घटनेने दिली आहे.
ङ्गर्ग्युसन हे सुमारे २१ हजार लोकसंख्येचे शहर असून त्यापैकी दोन तृतियांश  लोकसंख्या आङ्ग्रिकन-अमेरिकन लोकांची आहे. त्यामुळे त्या शहरात कृष्णवर्णीयांवर होणार्‍या अन्यायाबाबत तिखट प्रतिक्रिया उमटणे अपेक्षितच होते. भारतीय वंशाच्या नागरिकांनाही या वंशभेदाचा ङ्गटका बसला आहे. मागच्या वर्षी नीना दावुलुरी या भारतीय वंशाच्या सुंदरीची मिस अमेरिका म्हणून निवड झाली. त्यामुळे केवळ अमेरिकेत राहणार्‍या भारतीय वंशाच्या लोकांच्या चेहर्‍यावर प्रसन्नतेच्या लाटा पसरल्या नाही तर त्याचे भारतातील सामान्य नागरिकांनीही भरपूर स्वागत केले. अमेरिकेशिवाय अन्य देशांमध्येही भारतीय वंशाचे लोक राहतात. त्यांनाही या गोष्टीने आनंद झाला. मात्र, अनेक अमेरिकन गोर्‍यांनी या संदर्भात तीव्र प्रतिक्रीया व्यक्त केल्या. गोर्‍या अमेरिकनांनी नीनाला ट्विटर, ङ्गेसबुकसारख्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या शिव्या दिल्या. ती अन्य भारतीय वंशाच्या लोकांच्या दहशतवादाची समर्थक आहे, असा आरोपही काही अमेरिकनांनी केला. गोर्‍या लोकांच्या देशात भारतीय वंशाची असलेली सावळ्या वर्णाची नीना मिस अमेरिका कशी बनू शकते, असा प्रश्‍न अनेकजणांनी उपस्थित केला. वास्तविक, अमेरिकेत स्थायिक झालेले अमेरिकन हे तेथील मूळ निवासी नाहीत याची अमेरिकेतील सामान्य नागरिकांना कल्पना नाही. अमेरिकेमध्ये गेल्या शेकडो वर्षांमध्ये वेगवेगळ्या देशातील लोक येऊन स्थायिक झाले आहेत. ही गोष्ट खरी आहे की, स्थायिक होणार्‍या लोकांपैकी युरोपहून आलेल्या गोर्‍या लोकांचे प्रमाण अधिक आहे. हे गोरे लोक आपली गुलामी करण्यासाठी आङ्ग्रिकेतील काळ्या लोकांना अमेरिकेन घेऊन आले आणि त्यांच्याबरोबर जनावरासारखे वर्तन केले. गुलामीची ही प्रथा संपवण्यासाठी अब्राहम लिंकन यांनी दीर्घ संघर्ष केला. या काळ्या लोकांना समान अधिकार प्राप्त व्हावेत यासाठी लिंकन यांनी प्रयत्न केले. पण, या प्रयत्नांमुळेच एका गोर्‍या माथेङ्गिरुने त्यांची हत्त्या केली. आज इतक्या वर्षांनंरही अमेरिकेतील वंशभेद संपुष्टात आलेला नाही, ही दुर्दैवी बाब मानावी लागेल.
-----------------------------------------------------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel