-->
संपादकीय पान बुधवार दि. २२ जानेवारी २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
---------------------------------------
पेरॉल पे पेरॉल... आपल्याकडे कायदा सर्वांसाठी सारखा आहे?
------------------------------------
अभिनेते संजय दत्त यांना १९९३ सालच्या साखळी बॉम्बस्फोटात शस्त्रात्रे बाळगल्याप्रकरणी दोषी ठरविल्यावर पाच वर्षांची शिक्षा ठोठाविण्यात आली खरी परंतु संजय दत्तला सलग दोन महिने पेरॉल दिल्याने आपल्याकडे कायदे सर्वांसाठी खरोखरीच सारखे आहेत का असा सवाल निर्माण झाला आहे. कारण गेल्या वेळी त्याला पेरॉल मिळाल्यावर संतापाने त्याने पेरॉलची नियमावली वाचा असे पत्रकारांना ठणकावले होते. आता महिन्याभरचा पॅरोल संपण्याछ्‌य अगोदर एक दिवस आणखी एक महिना पॅरोल मिळणे हे जरा अतीच वाटते.
पत्नी मान्यताला टीबी झाल्यामुळे तिची देखभाल करण्यासाठी आणखी ३० दिवसांची संचित रजा देण्यात यावी, अशी मागणी करणा-या अभिनेता संजय दत्तवर पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी पुन्हा एकदा मेहरबानी केली. संजय गेल्या २१ डिसेंबरपासून ३० दिवसाच्या सुटीवर आहे, त्यात आज आणखी ३० दिवसाची सुटी वाढवून दिली आहे. संजयने ७ जानेवारीला ३० दिवसाच्या रजेसाठी पुन्हा अर्ज दाखल केला होता. त्यावर येरवडा जेल प्रशासन व विभागीय आयुक्तांनी आज संजयची सुटी संपायच्या आदल्या दिवशी हिरवा कंदिल दाखवला. पुण्याच्या विभागीय आयुक्तांवर सुटी मंजूर करण्यासाठी माध्यमांचा व जनतेचा दबाव होता. त्यामुळेच आज सुटी संपायच्या आदल्या दिवशी म्हणजे शेवटच्या क्षणी सुटी मंजूर केली. संजयला ६ डिसेंबरला दुस-यांदा संचित रजा मंजूर केली होती. तेव्हाच मोठा वाद निर्माण झाला होता व चर्चा झडली होती. संजयला विशेष वागणूक देण्यात येत आहे तसेच त्याला तुरुंगात दारू, चांगले जेवण मिळत असल्याचाही आरोप विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केला होता. त्यामुळे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र संजयची पत्नी मान्यताला टीबी झाला असून, तिची काळजी घेण्याची नितांत आवश्यकता असल्याचे डॉक्टरांचे पत्र संजयने विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाला सादर केले. पत्नी मान्यता हिच्यावर १० जानेवारीला शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तसेच मान्यताला टीबी झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच पुढील तीन महिने तिला खूप काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे, असे या अर्जात संजय दत्तने म्हटले आहे. एक महत्वाची बाब लक्षात घेतली पाहिजे व ती म्हणजे टी.बी. हा रोग काही गंभीर नाही. आता टी.बी. हा रोग सहजरित्या बरा होतो. आपण मान्यताला टी.बी. झाला आहे हे मान्य केले तरी ती नव वर्षाच्या म्हणजे एक महिन्यांपूर्वी पार्टी झोडत असल्याची छायाचित्रे वृत्तपत्रांनी प्रसिध्द केली होती. टी.बी.सारख्या आता सहज बर्‍या होणार्‍या रोगासाठी संजय दत्त याला दोन महिने सुट्टी मिळते हे राज्यकर्त्यांच्या आशिर्वादाशिवाय शक्य नाही. संजयचे वडिल दिवंगत सुनिल दत्त हे नामवंत अभिनेते व कॉँग्रेसचे माजी मंत्री तसेच एक सच्चे कॉँग्रेसमन. संजयची बहिण प्रिया दत्त ही मुंबईतली कॉँग्रेसची खासदार. त्यामुळेच संजय दत्त यांना सतत पेरॉल पे पॅरोल मिळत असावेत, यात काहीच शंका नाही. अन्यथा संजय हे दत्त घराण्यातील नसते व अभिनेते नसते तर त्यांना अशा सवलती मिळतील का? ऐवढेच कशाला जर एखादा सर्वसामान्य घरातील गुन्हेगार असेलतर त्याला अशा प्रकारे पॅरोल देण्याची कृपा जेल प्रशासन करेल का? याचा अर्थच स्पष्ट होतो आपल्याकडे कायदा सर्वांसाठी सारखा नाही.
----------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel