2019 मधील राजकीय पट
रविवार दि. 30 डिसेंबर 2018 च्या अंकासाठी चिंतन -
-----------------------------------------------
2019 मधील राजकीय पट
------------------------------------------
उद्याचा सुर्य मावळला की नवीन वर्षाला म्हणजे 2019 ला प्रांरभ होईल. हे वर्ष देशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे ठरणार आहे. कारण जगातील या सर्वात मोठ्या लोकशाही देशात सत्तांतर होणार की नाही या प्रश्नाचे उत्तर जनता आपल्या मतदानाच्या हक्कातून देईल. पाच वर्षापूर्वी ज्यावेेळी नरेंद्र मोदी सत्तेत आले व पंतप्रधानपदी विराजमान झाले त्यावेळी जो माहोल होता तो पाहता, कॉँग्रेस काय किंवा अन्य कोणात्याही विरोधी पक्षांना एवढ्या लवकर म्हणजे किमान वीस वर्षे तरी सत्तेत जाता येईल असा कुणी विचारही करु शकत नव्हता. कॉँग्रेसला तर आजवरच्या इतिहासातील सर्वात निचांक संख्येने जागा मिळाल्या होत्या. कॉँग्रेसचे पूर्णपणे खच्चीकरण झाले होते. तशीच तर्हा विरोधकांची होती. पाच वर्षापूर्वी भाजपाची (हिंदुत्वाची नव्हे) हवा तशीच होती. कॉँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराला लोक कंटाळले होते. भाजपाने प्रामुख्याने नरेंद्र मोदी यांनी जी अनेक विकासाची स्वप्ने व तसेच जी आश्वासने दिली होती, त्यावर जनतेचा पूर्णपणे पगडा निर्माण झाला. मतदानाच्या दिवशी हमखास पिकनीकला जाणारा शहरी मध्यमवर्गही कधी नव्हे तो त्यावेळी मोदींना मतदान करण्याासाठी बाहेर पडला होता. त्यामुळेच गेल्या तीन तपानंतर प्रथमच एकाच पक्षाला बहुमत मिळून तो पक्ष सत्तेत आला. परंतु आता या सरकारला पाच वर्षे पूर्ण होण्यास जेमतेम चार महिने शिल्लक असताना पुन्हा त्यांचीच सत्ता येईल असे छातीठोकपणाने कुणी सांगू शकत नाही. त्यामुळे देशात मोदी विरोधी लाट आली आहे असे म्हणता येणार नाही, परंतु मोदींनी निराशा केल्याने लोक नाराज आहेत असे ठामपणाने म्हणता येईल. पाच वर्षापूर्वी जे भाजापाला व मोदींना पोषक वातावरण होते तसे राहिलेले नाही हे मात्र नक्की. अशा स्थितीत देशातील राजकीय पट 2019 कसा असेल? हा प्रश्न वर्षअखेरीस उपस्थित होतो.
राजकीय पट पर्याय पहिला- या पर्यायानुसार, भाजपा पुन्हा त्याच बहुमताने सत्तेत येऊ शकतो. परंतु ही शक्यता आता धुसर आहे. भाजपावालेही याविषयी खासगीत बोलताना साशंक आहेत. काही भाजपाच्या नेत्यांच्या मते, आमचीच सत्ता येणार परंतु बहुमताने स्वबळावर येणार नाही तर मित्र पक्षांच्या सहाय्याने भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाडी सत्तेत येईल. प्रामुख्याने मध्यप्रदेश, राजस्थान व उत्तराखंड या तीन राज्यात भाजपाची सत्ता खालसा होऊन तेथे कॉँग्रेसची सरकारे स्थापन झाल्याने भाजपा स्वबळावर सत्तेत येणे कठीण आहे. बिहारमध्ये त्यांनी स्वत:चा कमीपणा घेत आपल्या सहकारी पक्षाला जादा जागा सोडणे यातच भाजपाचा विश्वास संपला आहे असे म्हणता येईल. उत्तरप्रदेशातही सध्याच्या त्यांना जागा टिकविणे अशक्य आहे. उत्तर भारतातील जर जागा भाजपाला टिकव्ता आल्या नाहीत तर अन्य राज्यात त्यांना फारसा प्रभाव टाकता येणार नाही. देशपातळीवर भाजपाला सध्याच्या जागा कायम राखता आल्या नाहीत व त्यांना मित्र पक्षांच्या सहाय्याने सत्ता स्थापन करावी लागली तर मोदी व शहा यांचा तो मोठा पराभव ठेरल. असा स्थितीत कदाचित मोदींना आपल्या नेतृत्वावर पाणी सोडावे लागेल. अशा स्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विश्वासातील व भाजपाचा सॉफ्ट चेहरा असलेले नितीन गडकरी यांचे नाव पुढे येऊ शकते. त्याची पेरणी गडकरींनी आतापासून सुरु केली आहे असेच दिसते. नुकतेच त्यांनी साखर कारखान्यांच्या नेतृत्वाचे निमित्त करुन पराभव स्वीकारण्याचे नेतृत्वाने शिकले पाहिजे हे केलेले विधान तसेच पंडीत नेहरुंच्या भाषणांचा केलेला उल्लेख व त्यांची केेलेली स्तुती या घटना पुरेशा बोलक्या आहेत. मोदी व शहा यांना नेहरुंचा विचार संपवायचा आहे, त्यादृष्टीने त्यांनी गेल्या पाच वर्षात अनेक प्रयत्न केले तर त्यांच्याच एक मंत्रिमंडळातील सदस्य नेहरुंवर स्तुतीसुमने उधळतो हे संघाच्या पाठिंब्याशिवाय काही शक्य नाही. तसेच जर भाजपाच्या नेतृत्वाखालील आघाडीला आता मोदींसारखा कडवा हिंदुत्ववादी चेहरा परवडणारा नाही, अशा स्थितीत पर्याय म्हणून गडकरी यांचे नाव पुढे येऊ शकते.
राजकीय पट पर्याय दुसरा- या पर्यायानुसार, देशव्यापी असलेला सध्याचा विरोधी पक्ष कॉँग्रेस स्वबळावर सत्तेत येऊ शकतो. परंतु सध्या तरी ही शक्यता धुसरच वाटते. गेल्या निवडणुकीत कॉँग्रेसने जो सपाटून एतिहासिक मार खाल्ला त्यातून तसे पाहता हा पक्ष अजूनही सावरलेला नाही. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभेतील निवडणुकीत कॉँग्रेसने तीन राज्यात विजय संपादन केल्याने कॉँग्रेसच्या या हत्तीला चेतना आली आहे. परंतु संपूर्ण देशात कॉँग्रेसची सत्ता स्थापन होईल अशी काही स्थिती सध्या नाही. गेलीचार वर्षे कॉँग्रेस पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर येतच नव्हती. त्यातच राहूल गांधी यांच्या नेतृत्वाचे स्थान पक्के व्हायचे होते. भाजपा व शहा, मोदींनी गांधी घराणे तसेच राहूल गांधी यांना एवढे नाहक बदनाम केले होते की त्यातून आपले नेतृत्व सिध्द करुन दाखविणे ही राहूल यांच्यापुढे मोठे आव्हानच होते. मात्र त्यात राहूल गांधी आता पास होऊन बाहेर पडले. आता त्यांच्याकडे कॉँग्रेसजन एक आशेचा किरण म्हणून पाहू लागले आहेत. जनतेतही त्यांच्याविषयी आत्मविश्वास निर्माण होऊ लागला आहे. परंतु आजही राहूल गांधींकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहिले जात नाही. त्यासाठी अजून काही काळ जावा लागेल, असेच दिसते. कॉँग्रेसला व त्यांच्या नेतृत्वाला या राजकीय स्थितीची जाण असावी त्यामुळेच ते राहूल गांधी यांना पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करणे टाळतात. सध्या तरी या निवडणुकीनंतर कॉँग्रेस सत्तेत असला तरी त्यांच्याकडे सरकारचे नेतृत्व नसेल किंवा ते बाहेरुन पाठिंबा देणे पसंत करतील, असे दिसते.
राजकीय पट तिसरा पर्याय- या पर्यायानुसार, कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळणे व आघाडी सरकार स्थापन होणे. सध्याच्या स्थितीत हा पर्याय योग्य वाटतो. कारण भाजपा, कॉँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार नसेल व भाजपा सरकार स्थापण्याच्या स्थितीत नसेल तर तिसर्या आघाडीचा मार्ग खुला होतो. यात कॉँग्रेसचा पाठिंबा त्यांना मिळू शकतो. यात सर्व पक्षांना सोबत घेऊन जाणारे असे नेतृत्व व कॉँग्रेसला मान्य असेल असा नेता या सरकारचा पंतप्रदान होई शकतो. सर्व पक्षांना सोबत घेऊन जाणारा तसेच आर्थिक, राजकीय जुळवाजुळवी करु शकणारे नेतृत्व यावेळी उभारुन वर येऊ शकते. उद्योगक्षेत्रात ज्यांची चांगली उठबस आहे अशा नेतृत्वासही चांगाल वाव मिळू शकतो. कदाचित त्यांच्या पक्षाकडे फार मोठे पाठबळ नसेलही परंतु नेतृत्वाची चुणूक दाखवू शकणारे नेतृत्व अशा स्थितीत बाजी मारु शकते. नुकतेच शरद पवार यांनी गांधी घराण्याची व राहूल गांधी यांची केलेली स्तुती यासाठी फारच बोलकी ठरावी.
हे तीन पर्यात आजच्या घडीला नवीन वर्षाच्या पूर्वसंधेला आपल्यापुढे दिसत आहेत. अर्थात राजकारण हे फारच प्रवाही असते, त्यामुळे या पर्यायातही बरेच बदल होऊ शकतात. कारण अजूनही चार महिने आहेत...
-----------------------------------------------------
-----------------------------------------------
2019 मधील राजकीय पट
------------------------------------------
उद्याचा सुर्य मावळला की नवीन वर्षाला म्हणजे 2019 ला प्रांरभ होईल. हे वर्ष देशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे ठरणार आहे. कारण जगातील या सर्वात मोठ्या लोकशाही देशात सत्तांतर होणार की नाही या प्रश्नाचे उत्तर जनता आपल्या मतदानाच्या हक्कातून देईल. पाच वर्षापूर्वी ज्यावेेळी नरेंद्र मोदी सत्तेत आले व पंतप्रधानपदी विराजमान झाले त्यावेळी जो माहोल होता तो पाहता, कॉँग्रेस काय किंवा अन्य कोणात्याही विरोधी पक्षांना एवढ्या लवकर म्हणजे किमान वीस वर्षे तरी सत्तेत जाता येईल असा कुणी विचारही करु शकत नव्हता. कॉँग्रेसला तर आजवरच्या इतिहासातील सर्वात निचांक संख्येने जागा मिळाल्या होत्या. कॉँग्रेसचे पूर्णपणे खच्चीकरण झाले होते. तशीच तर्हा विरोधकांची होती. पाच वर्षापूर्वी भाजपाची (हिंदुत्वाची नव्हे) हवा तशीच होती. कॉँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराला लोक कंटाळले होते. भाजपाने प्रामुख्याने नरेंद्र मोदी यांनी जी अनेक विकासाची स्वप्ने व तसेच जी आश्वासने दिली होती, त्यावर जनतेचा पूर्णपणे पगडा निर्माण झाला. मतदानाच्या दिवशी हमखास पिकनीकला जाणारा शहरी मध्यमवर्गही कधी नव्हे तो त्यावेळी मोदींना मतदान करण्याासाठी बाहेर पडला होता. त्यामुळेच गेल्या तीन तपानंतर प्रथमच एकाच पक्षाला बहुमत मिळून तो पक्ष सत्तेत आला. परंतु आता या सरकारला पाच वर्षे पूर्ण होण्यास जेमतेम चार महिने शिल्लक असताना पुन्हा त्यांचीच सत्ता येईल असे छातीठोकपणाने कुणी सांगू शकत नाही. त्यामुळे देशात मोदी विरोधी लाट आली आहे असे म्हणता येणार नाही, परंतु मोदींनी निराशा केल्याने लोक नाराज आहेत असे ठामपणाने म्हणता येईल. पाच वर्षापूर्वी जे भाजापाला व मोदींना पोषक वातावरण होते तसे राहिलेले नाही हे मात्र नक्की. अशा स्थितीत देशातील राजकीय पट 2019 कसा असेल? हा प्रश्न वर्षअखेरीस उपस्थित होतो.
राजकीय पट पर्याय दुसरा- या पर्यायानुसार, देशव्यापी असलेला सध्याचा विरोधी पक्ष कॉँग्रेस स्वबळावर सत्तेत येऊ शकतो. परंतु सध्या तरी ही शक्यता धुसरच वाटते. गेल्या निवडणुकीत कॉँग्रेसने जो सपाटून एतिहासिक मार खाल्ला त्यातून तसे पाहता हा पक्ष अजूनही सावरलेला नाही. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभेतील निवडणुकीत कॉँग्रेसने तीन राज्यात विजय संपादन केल्याने कॉँग्रेसच्या या हत्तीला चेतना आली आहे. परंतु संपूर्ण देशात कॉँग्रेसची सत्ता स्थापन होईल अशी काही स्थिती सध्या नाही. गेलीचार वर्षे कॉँग्रेस पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर येतच नव्हती. त्यातच राहूल गांधी यांच्या नेतृत्वाचे स्थान पक्के व्हायचे होते. भाजपा व शहा, मोदींनी गांधी घराणे तसेच राहूल गांधी यांना एवढे नाहक बदनाम केले होते की त्यातून आपले नेतृत्व सिध्द करुन दाखविणे ही राहूल यांच्यापुढे मोठे आव्हानच होते. मात्र त्यात राहूल गांधी आता पास होऊन बाहेर पडले. आता त्यांच्याकडे कॉँग्रेसजन एक आशेचा किरण म्हणून पाहू लागले आहेत. जनतेतही त्यांच्याविषयी आत्मविश्वास निर्माण होऊ लागला आहे. परंतु आजही राहूल गांधींकडे भावी पंतप्रधान म्हणून पाहिले जात नाही. त्यासाठी अजून काही काळ जावा लागेल, असेच दिसते. कॉँग्रेसला व त्यांच्या नेतृत्वाला या राजकीय स्थितीची जाण असावी त्यामुळेच ते राहूल गांधी यांना पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करणे टाळतात. सध्या तरी या निवडणुकीनंतर कॉँग्रेस सत्तेत असला तरी त्यांच्याकडे सरकारचे नेतृत्व नसेल किंवा ते बाहेरुन पाठिंबा देणे पसंत करतील, असे दिसते.
राजकीय पट तिसरा पर्याय- या पर्यायानुसार, कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळणे व आघाडी सरकार स्थापन होणे. सध्याच्या स्थितीत हा पर्याय योग्य वाटतो. कारण भाजपा, कॉँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार नसेल व भाजपा सरकार स्थापण्याच्या स्थितीत नसेल तर तिसर्या आघाडीचा मार्ग खुला होतो. यात कॉँग्रेसचा पाठिंबा त्यांना मिळू शकतो. यात सर्व पक्षांना सोबत घेऊन जाणारे असे नेतृत्व व कॉँग्रेसला मान्य असेल असा नेता या सरकारचा पंतप्रदान होई शकतो. सर्व पक्षांना सोबत घेऊन जाणारा तसेच आर्थिक, राजकीय जुळवाजुळवी करु शकणारे नेतृत्व यावेळी उभारुन वर येऊ शकते. उद्योगक्षेत्रात ज्यांची चांगली उठबस आहे अशा नेतृत्वासही चांगाल वाव मिळू शकतो. कदाचित त्यांच्या पक्षाकडे फार मोठे पाठबळ नसेलही परंतु नेतृत्वाची चुणूक दाखवू शकणारे नेतृत्व अशा स्थितीत बाजी मारु शकते. नुकतेच शरद पवार यांनी गांधी घराण्याची व राहूल गांधी यांची केलेली स्तुती यासाठी फारच बोलकी ठरावी.
हे तीन पर्यात आजच्या घडीला नवीन वर्षाच्या पूर्वसंधेला आपल्यापुढे दिसत आहेत. अर्थात राजकारण हे फारच प्रवाही असते, त्यामुळे या पर्यायातही बरेच बदल होऊ शकतात. कारण अजूनही चार महिने आहेत...
-----------------------------------------------------
0 Response to "2019 मधील राजकीय पट "
टिप्पणी पोस्ट करा