-->
हॅलो...हॅलो...!

हॅलो...हॅलो...!

रविवार दि. 22 ऑक्टोबर 2017 च्या मोहोरसाठी लेख -- 
------------------------------------------------
हॅलो...हॅलो...!
-------------------------------
एन्ट्रो-आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे. त्याहून पुढचे पाऊल म्हणजे, स्मार्टफोन ही लोकांची आता गरज झाली आहे. या क्षेत्रात असलेल्या कंपन्यांचे गेल्या दशकात मोठ्या संख्येने विलीनीकरण झाले. स्पर्धेच्या या जगात मोबाईल सेवा देणार्‍या कंपन्यांना नाईलाज म्हणून या उद्योगातून माघार घ्यावी लागली. यात देशातील आघाडीचा उद्योगसमूह टाटाचा समावेश जसा होतो तसा बहुराष्ट्रीय कंपनी व्होडाफोनला देखील स्पर्धेपोटी भारतीय बाजारपेठेतून काढता पाय घ्यावा लागला. एक दशकापूर्वी रिलायन्स समूहाने करलो दुनिय मुठ्ठी मे असा प्रचार करुन मोबाईल बाजारात आणले व खर्‍या अर्थाने मोबाईल दरांचे युध्द सुरु झाले. आता तर मुकेश अंबांनी यांच्या रिलायन्स समूहाने मोबाईल सेवा व इंटरनेट काही काळ मोफत देऊन ग्राहकांना भूरळ पाडली तसे सध्याच्या कंपन्यांचा घाम काढला. मोबाईल उद्योगातील ही स्पर्धा नजिकच्या काळात कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आज रिलायन्ससारख्या कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करुन नंतर बाजारपेठ काबीज करणार आहेत व त्यानंतर दरांवर त्यांचे नियंत्रण राहील. त्यामुळे सध्या जरी रिलायन्सला यात तोटा सहन करावा लागला तरी ती त्यांची गुंतवणूकच आहे... 
------------------------------------
गेली दशकभर आपल्या देशातील टेलिकॉम क्षेत्र हे प्रचंड उलाढालीचे व धमाका करणारे क्षेत्र ठरले आहे. तीन दशकांपूर्वी ज्यावेळी हे क्षेत्र केवळ सरकारी नियंत्रणाखाली होते त्यावेळी घरी फोन घेण्यासाठी वर्षानुवर्षांची प्रतिक्षा यादी होती. आता मात्र हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे. त्याहून पुढचे पाऊल म्हणजे, स्मार्टफोन मोठ्या संख्येने लोकांची आता गरज झाली आहे. या क्षेत्रात असलेल्या कंपन्यांचे गेल्या दशकात मोठ्या संख्येने विलीनीकरण झाले. स्पर्धेच्या या जगात मोबाईल सेवा देणार्‍या कंपन्यांना नाईलाज म्हणून या उद्योगातून माघार घ्यावी लागली. यात देशातील आघाडीचा उद्योगसमूह टाटाचा समावेश जसा होतो तसा बहुराष्ट्रीय कंपनी व्होडाफोनला देखील स्पर्धेपोटी भारतीय बाजारपेठेतून काढता पाय घ्यावा लागला. एक दशकापूर्वी रिलायन्स समूहाने करलो दुनिय मुठ्ठीमे असा प्रचार करुन मोबाईल बाजारात आणले व खर्‍या अर्थाने मोबाईल दरांचे युध्द सुरु झाले. आता तर मुकेश अंबांनी यांच्या रिलायन्स समूहाने मोबाईल सेवा व इंटरनेट काही काळ मोफत देऊन ग्राहकांना भूरळ पाडली तसे सध्याच्या कंपन्यांचा घाम काढला. मोबाईल उद्योगातील ही स्पर्धा नजिकच्या काळात कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आज रिलायन्ससारख्या कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करुन नंतर बाजारपेठ काबीज करणार आहेत व त्यानंतर दरांवर त्यांचे नियंत्रण राहील. त्यामुळे सध्या जरी रिलायन्सला यात तोटा सहन करावा लागला तरी ती त्यांची गुंतवणूकच आहे. दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर फ्रीचा धडाका लावणार्‍या रिलायन्स जिओला गेल्या तिमाहीअखेर 270.59 कोटी रुपयांचा तोटा झाला. या काळात कंपनीच्या ग्राहकांची संख्या 13.68 कोटींवर पोहोचली आहे. जिओचे उत्पन्न मात्र 6 हजार 147 कोटी रुपये झाले आहे. गेल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिलअखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीला 22.5 कोटी रुपये तोटा होता. तो वाढून आता 270.59 कोटी रुपयांवर पोचला आहे. रिलायन्स जिओने बाजारात प्रवेश केल्यानंतर सहा महिन्यांच्या आत 10 कोटी मोबाइलग्राहकांचा टप्पा गाठला होता. सरलेल्या तिमाहीत तर कंपनीने 1.53 कोटी नवीन ग्राहक जोडले आहेत. रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी दिवाळी धन धना धन ऑफर सादर केली आहे. या ऑफरअंतर्गत 399 रुपयांचे रिचार्ज करणार्‍या प्री-पेड ग्राहकांना 100 टक्के कॅशबॅक आणि आपला मागील ऑफर प्लॅन कायम ठेवता येणार आहे. अशा प्रकारे अनेक योजना सादर करुन रिलायन्स ग्राहकांना आपल्याकडे खेचत आहे. खास दिवाळीचे दिवस बघता आणि प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या भारती एअरटेलने कमी किमतीच्या 4 जी स्मार्टफोनची ठराविक ऑफर्ससह घोषणा केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी रिलायन्स जिओने कॅशबॅक ऑफर देऊ केली. जिओच्या नवीन ऑफरमुळे पुन्हा एकदा टेलिकॉम क्षेत्रामध्ये जोरदार स्पर्धा निर्माण झाली आहेे. रिलायन्स व एअरटेल यांच्या स्पर्धेत आयडीयाने आपले स्थान बळकट केले आहे. महाराष्ट्रात 32.1 टक्के बाजारहिश्श्यासह आयडिया सेल्युलर कंपनी प्रथम क्रमांकावर आहे. सध्या आयडियाकडे महाराष्ट्र आणि गोवा मिळून सर्वाधिक 71 लाख डेटा वापरकर्ते आहेत. आयडीया महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये 4 जी सेवेचा विस्तार अधिक वाढविण्यासाठी आधीपासून एफडी एलटीई तंत्रज्ञानाचा 1800 मेगाहर्टझ बँड्सचा वापर केला जात असून, आता बँडविड्थ 5 वरून 10 केल्याने ग्राहकांना ऑनलाइन सेवांचा आनंद घेण्यासाठी अधिक चांगले नेटवर्क उपलब्ध होणार आहे. निमशहरी आणि ग्रामीण भागात झपाट्याने होत असलेला बाजारपेठांचा विस्तार आणि अतिशय स्वस्तामध्ये उपलब्ध होत असलेल्या मोबाईल सेवा यामुळे मोबाईल ग्राहकांचा आकडा सातत्याने वाढता राहिला आहे. आयडीया महाराष्ट्रातच एकूण 19,300 कोटी रुपयांची गुंतवणूक टप्प्याटप्प्याने करणार आहे. त्यामुळे स्पर्धेत रिलायन्स, एअरटेलच्या बरोबरीने आयडीया जोरात आहे.त्यातच आता आययडीमध्ये व्होडाफोन ही कंपनी विलीन होणार आहे. त्यामुळे त्यांची स्थिती आणखीन मजबूत होईल. व्होडाफोनला भारतातून महसुली उत्पन्न तुलनेत कमी मिळते. परिणामी ब्रिटनस्थित व्होडाफोनने भारतातील दूरसंचार व्यवसाय विकण्याचे पाऊल उचललेे. असा प्रकारे बहुराष्ट्रीय कंपनीने भारतीय कंपन्यांच्या स्पर्धेत आपली हार स्वीकारली व माघार घेतली. आयडिया सेल्युलरने आपल्या ताब्यात व्होडाफोन घेऊन टेलिकॉम उद्योगात आपण स्पर्धेत आहोत हे दाखवून दिले होते. येत्या काही काळात टेलिकॉम उद्योगातील ही स्पर्धा जीवघेणी होणार आहे. रिलायन्सने मोफत सेवा काही काळ देऊन लोकांना आपल्याकडे खेचून घेतले आहे. मात्र ते ग्राहक टिकविणे हे त्यांच्यापुढील मोठे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे येत्या काळात रिलायन्स, एअरटेल, आययडीया, बीएसएनएल या प्रमुख कंपन्या भारतीय बाजारपेठेत असतील. त्याच्यातील एखाद दुसरी कंपनी या स्पर्धेत टिकाव धरताना माघार घेईल. सरकारी कंपनी बीएसएनएलचे भविष्य अंधारात आहे. सध्या या बाजारपेठेत ग्राहक हाच राजा दिसत असला तरीही त्याचे राजेपणा कायम टिकणार का हा सवाल आहे. कारण रिलायन्सची या उद्योगात जसी मक्तेदारी निर्माण होईल तशी त्यांची दरवाढ सुरु होईल. त्यानंतर या उद्योगात उलटी चक्रे फिरु लागतील. मात्र त्याला अजून वेळ आहे. तोपर्यंत सध्या कमी किंमतीत बोलून घ्या...
-----------------------------------------------------------------

0 Response to "हॅलो...हॅलो...!"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel