-->
कोपलेला निसर्गराजा

कोपलेला निसर्गराजा

रविवार दि. ०६ डिसेंबर २०१५ च्या मोहोरसाठी लेख --
-------------------------------------------
कोपलेला निसर्गराजा
--------------------------------------------
चेन्नई शहराभोवतीची ६०० हून अधिक तळी बिल्डरांनी आणि अतिक्रमकांनी त्यांच्या राक्षसी आकांक्षेपायी बुजवून त्यावर मोठाल्या इमारती आणि मॉल्स उभे केले. चेन्नईतून वाहणार्‍या अड्यार या छोट्याशा नदीचे पात्रही या अतिक्रमकांनी संकुचित करून तिची अडवणूक करण्याचा मार्गही अवलंबिला. चेन्नई आणि मुंबई ही शहरे अशी बिल्डरांच्या लालसेपोटी पूरात बुडून गेली. मुंबईचा हा पाऊस ११ वर्षापूर्वी झाला होता. त्यातून अन्य महानगरांनी काही धडा घेतला नाही आणि चेन्नईची घटना घडली. या सर्व प्रक्रियेतून निसर्गाचे चक्रच पार बदलून गेले आहे. पावसाळा हा अनियमीत झाला आहे. थंडीचे चक्र बदलले आहे. एकतर थंडी जबरदस्त जशी पडते तसा उन्हाळाही टोकाचा झाला आहे. नुतक्याच पॅरिस येथे झालेल्या हवामानविषयक परिषदेत यावर चर्चा झाली होती. परंतु जगातील प्रत्येक देशाचा सदस्य जोपर्यंत याबाबत जागृत होऊन त्यादृष्टीने काम करीत नाही तोपर्यंत निसर्गाचा कोप असाच होत राहाणार...
------------------------------------------------
गेल्या आठवड्याभरात चेन्नईत पडलेल्या पावसाचा रुद्रावतार पाहता मुंबईत ११ वर्षापूर्वी आलेल्या महापुराची आठवण यावी. एकीकडे अशा प्रकारचा जोरदार पाऊस पडत असताना दुसरीकड़े आपल्या देशातील अनेक भागात यंदा मोठा दुष्काळ पडलेला आहे. महाराष्ट्रात तर पाऊस संकपताक्षणीच दोन महिन्यात दुष्काळ जाहीर करण्याची पाळी राज्य सरकारवर आली आहे. एकूणच देशातील हे टोकाचे हवामान पाहता आपल्यावर निसर्गराजा कोपला आहे हे स्पष्ट आहे. अर्थातच यामागे   आपणच आहोत. कारण निसर्गिक संपत्तीचा आपण गेल्या शतकात एवढा र्‍हास केला आहे, की त्यामुळे देशात हे टोकाचे हवामान आता पहावयास मिळत आहे. चेन्नईत पडलेला पाऊस हा शतकारीत विक्रमी होता, असाच पाऊस मुंबईत पडला होता. अर्थात अशी स्थिती ही काही नेहमीच येत नाही, अपवादात्मक काळातच एवढा विक्रमी पाऊस पडत असला तरीही अशा प्रकारचा पाऊस पडला तर आपतकालीन व्यवस्था आपल्याकडे नाही हा मुद्दा विसरता येणार नाही. मुंबई, चेन्नई या महानगरात सध्या जी अतिक्रमणे झाली आहेत त्यामुळे येथील नद्या या आंकूचन पावल्या आहेत. चेन्नईतील पावसाचे स्वरुप इतके भीषण होते की, रस्त्याच्या कडेने ठेवलेल्या मोटारी पाण्याच्या लोंढ्यातून जशा वाहत होत्या तशी विमानतळावरची विमाने देखील कडेला वाहून जाऊन उलटीपालटी झालेली दिसली. चेन्नईच्या इतिहासातील गेल्या संपूर्ण शतकातला सर्वात मोठा ठरला. पाऊस अजून येत आहे, तो आणखी ४८ तास तसाच राहणार आहे आणि पाण्यात अडकलेल्या लोकांसमोरचे जीवनमरणाचे संकट अजून संपले नाही. चेन्नईचे संकट आताच्या यंत्रणेचाही पुरता बोजवारा उडविणारे, सरकारची हतबलता उघड करणारे आणि सामान्य माणसांची अशा संकटकाळात प्रगटणारी इच्छाशक्ती व सामाजिक भावना स्पष्ट करणारे ठरले. याकडे निसर्गाचा कोप म्हणून अशा आपत्तीकडे यापुढे नुसतेच पाहाता येणार नाही. मुंबईतील पुराचे संकट, तिथली मिठी नदी लोकांनी व बिल्डरांनी अतिक्रमण करून बुजविल्यामुळे मोठे बनले. कधीकाळी जिवंत व वाहत्या असणार्‍या मिठीने आपल्यावरील अतिक्रमणाचा तेव्हा सूडच उगविलेला महाराष्ट्राला दिसला. शहरातील व शहराभोवतीची ६०० हून अधिक तळी बिल्डरांनी आणि अतिक्रमकांनी त्यांच्या राक्षसी आकांक्षेपायी बुजवून त्यावर मोठाल्या इमारती आणि मॉल्स उभे केले. चेन्नईतून वाहणार्‍या अड्यार या छोट्याशा नदीचे पात्रही या अतिक्रमकांनी संकुचित करून तिची अडवणूक करण्याचा मार्गही अवलंबिला. चेन्नई आणि मुंबई ही शहरे अशी बिल्डरांच्या लालसेपोटी पूरात बुडून गेली. मुंबईचा हा पाऊस ११ वर्षापूर्वी झाला होता. त्यातून अन्य महानगरांनी काही धडा घेतला नाही आणि चेन्नईची घटना घडली. या सर्व प्रक्रियेतून निसर्गाचे चक्रच पार बदलून गेले आहे. पावसाळा हा अनियमीत झाला आहे. थंडीचे चक्र बदलले आहे. एकतर थंडी जबरदस्त जशी पडते तसा उन्हाळाही टोकाचा झाला आहे. नुतक्याच पॅरिस येथे झालेल्या हवामानविषयक परिषदेत यावर चर्चा झाली होती. १९९२ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या हवामानविषयक परिषदेत पृथ्वीवर वाढत्या तापमानवाढीवरून विकसित देश व विकसनशील-गरीब देश असा थेट संघर्ष उभा राहिला होता. आता २३ वर्षांनंतर परिस्थिती बरीच बदलली आहे. जगाचे तापमान वाढले आहेच; पण संघर्षाचे स्वरूप बदलत गेले आहे. गरीब देश विकसनशील झाले आहेत तर विकसनशील राष्ट्रांची अंतर्गत बाजारपेठ विस्तारून त्यांना जगाच्या राजकारणात स्थान निर्माण झाले आहे. अमेरिका, युरोपियन महासंघामधील विकसित, श्रीमंत देश त्यांच्या मंदीत असलेल्या अर्थव्यवस्थांना ऊर्जितावस्था येण्यासाठी विकसनशील राष्ट्रांचे म्हणणे ऐकून घेत आहेत. केवळ दहशतवादच नव्हे तर ऊर्जा, पर्यावरण, उद्योग, तंत्रज्ञान व विकास अशा मुद्द्यांवर ते अन्य विकसनशील देशांशी करारमदार, चर्चा करत आहेत. पॅरिसमध्ये सध्या सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान बदलविषयक परिषदेत हे वातावरण ठळकपणे दिसून येत आहे. या परिषदेचे भारताच्या दृष्टीने महत्त्व यासाठी की भारताने सौरऊर्जेचा जागतिक स्तरावर वापर वाढवण्यासाठी फ्रान्सच्या सहकार्याने १२१ देशांना सौरऊर्जेच्या प्रसारात सामील करून घेतले आहे. निसर्ग आज आपल्यावर कोपला आहे. त्यामागे आपणच आहोत. प्रथम विकसीत जगाने निसर्गाला ओरबाडले आणि आता विकसनशील देश विकासाच्या ध्यासापोटी आपला वाटा हिसकावून घेत आहेत. यात तोल ढळतो तो निसर्गाचा आणि सर्व चित्र हळूहळू यातूनच पालटत चालले आहे. याचा आपण विचार कधी करणार असा प्रश्‍न आहे. पॅरिसच्या परिषदेत या विषयावर चर्चा जरुर झाली परंतु जगातील प्रत्येक देशाचा सदस्य जोपर्यंत याबाबत जागृत होऊन त्यादृष्टीने काम करीत नाही तोपर्यंत निसर्गाचा कोप असाच होत राहाणार.
--------------------------------------------------------------

0 Response to "कोपलेला निसर्गराजा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel