-->
शुक्रवार दि. २ मेच्या अंकासाठी चिंतन-
-----------------------------------------
गांधी-नेहरु घराण्याला तापदायक ठरलेले दोन जावई
-----------------------------------------
गांधी-नेहरु घराण्यात आजर्यंत दोन झालेले जावई त्यांना परस्पर भिन्न कारणांसाठी तापदायक ठरले आहेत. हे दोघे जावई आहेत ङ्गिरोझ गांधी व रॉबर्ट वद्रा. यातील ङ्गिरोझ गांधी हे नेहरुंचे जावई व इंदिरा गांधी यांचे पति होते. तर इंदिरा गांधी यांना मुलगी नव्हती. त्यामुळे पुढच्या पिढीत गांधी घराण्यात कुणीच जावई नव्हता. मात्र त्यापुढील पिढीत सोनिया गांधी यांची मुलगी प्रियांका हिने रॉबर्ट वद्रा यांच्याशी लग्न करुन ते जावई म्हणून गांधी-नेहरु घराण्यात आले. सध्या निवडणुकीच्या धामधुमीत रॉबर्ट वद्रा हे भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन गाजत आहेत. ङ्गिरोझ गांधी हे देखील अशाच प्रकारे पूर्वी गाजले होते. मात्र या दोघा जावयांमध्ये ङ्गरक आहे तो, ङ्गिरोझ गांधी हे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढल्याने गाजले होते तर रॉबर्ट वद्रा हे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने सध्या गाजत आहेत. अर्थातच हे दोघेही नेहरु-गांधी घराण्याला तापदायक ठरले असले तरी हो दोघे भिन्न कारणांमुळे गाजले. इतिहासाची पुनरावृती होते असे म्हटले जाते. गांधी-नेहरु घराण्यातील जावयांच्या बाबतीत ही बाब खरी ठरावी. ङ्गिरोझ गांधी हे देशात झालेल्या पहिल्या निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आले होते. गांधी घराण्याचा मतदारसंघ म्हणून ओळखल्या गेलेल्या रायबरेली मतदारसंघातून ते सर्वात प्रथम निवडून आले होते. सत्ताधारी पक्षात असतानाही त्यांनी आपले सारसे पंडित जवाहरलाल नेहरु पंतप्रधान असताना त्यांच्याच सरकारवर भ्रष्टाचाराचे जोरदार आरोप केले होते. त्यामुळे पहिल्याच लोकसभेत ङ्गिरोझ यांची भ्रष्टाचारविरोधी लढणारे नेते अशी त्यांची प्रतिमा तयार झाली होती. त्यांच्या या मोहिमेमुळे अनेकदा पंडित नेहरुही अडचणीत आले होते. त्याकाळी देशातील गाजलेले भ्रष्टाचाराचे पहिले प्रकरण म्हणजे शेअर दलाल हरिदास मुंदडा यांनी बोगस कंपन्यांत एल.आय.सी.ला गुंतवणूक करण्यास भाग पाडले होते. हे प्रकरण ङ्गिरोझ गांधी यांनी लावून धरले. यातून पंतप्रधानपदी असलेल्या पंडित नेहरुंच्या प्रतिमेलाही धक्का लागला व अर्थमंत्री टी.टी. कृष्णम्माचारी यांना राजीनामा देणे भाग पडले होते. पंडित नेहरुंना आपला हा जावई ङ्गारच तापदायक ठरला होता. आता त्याची पुनरावृत्ती रॉबर्ट वद्रा यांच्या रुपाने कॉग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना होत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरु नये. त्यादृष्टीने पाहता १९५२ व १९५७ आणि सध्याची २०१४ सालच्या निवडणुकीत गांधी-नेहरु घराण्याचे जावई विरोधकांच्या प्रचारात केंद्रभागी होते व सध्या आहेत असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. सोनिया गांधी रायबरेलीतून आता तिसर्‍यांदा निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या प्रचाराची सर्व सूत्रे त्यांची कन्या प्रियांका गांधी यांच्याकडे आहेत. तर ङ्गिरोझ गांधी यांनी ५२ व ५७ साली ज्यावेळी निवडणूक लढविली होती त्यावेळी त्यांच्या प्रचाराची सर्व सूत्रे त्यांच्या पत्नी इंदिरा गांधी यांच्याकडे होती. इंदिरा गांधी यांनी ही सूत्रे मोठ्‌या कौशलतेने हाताळली होती. आता मात्र प्रियांका गांधीना ही सूत्रे सांभाळताना मोठी सर्कस करावी लागत आहे. सर्कस यासाठी की एकीकडे सर्व प्रचार सांभाळत असताना त्यांना दुसरीकडे आपल्या पतिवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या व जमीन हपड केल्या प्रकरणी पाठीशी घालावे लागत आहे. वद्रा यांनी अब्जावधी रुपायांची हरयाणा व राजस्थानातील जमीन कशाप्रकारे हडप केली याचा एक व्हिडिओच भाजपाने प्रचारात आणला आहे. यातील खरे किती खटे किती हे पुढील काळात न्यायालयात सिद्द होईलच परंतु आज भाजपा रॉबर्ट वद्रा यांच्या वरील आरोप करुन आपल्या प्रचाराची धार वाढवित आहे. असा वेळी सोनिया गांधी यांची डोकेदुखी वाढली आहे. अर्थातच त्याला कारण त्यांचे जावईबापू आहेत. एकूणच काय गांदी-नेहरु गराण्याला जावई हे नेहमीच तापदायक ठरले आहेत.  
----------------------------------------------------

Related Posts

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel