-->
संपादकीय पान गुरुवार दि. १३ मार्च २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
-----------------------------------------
सरकारी नकर्तेपणामुळे फोफावलेली नक्षली चळवळ  
--------------------------
छत्तीसगढ येथील सुकमा या नक्षलग्रस्त जिल्ह्यात ३०० हून जास्त नक्षलवाद्यानी केलेल्या हल्यात एका नागरीकासह १५ सरक्षा रक्षक शहीद झाले. गेल्या २५ मे रोजी याच परिसरात मोओवाद्यांच्या हल्ल्यात महेंद्र कर्मांसह कॉँग्रेसचे ३० नेते मृत्यूमुखी पडले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर झालेला हा हल्ला सुरक्षा दलासाठी एक मोठा हादरा होता. जगदलपूर ते सुकमा या दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरु आहे. त्याकामावर सुरक्षा देण्यासाठी हे रक्षक तैनात होते. या कामाला सुरक्षा देण्यासाठी तोंगपाल पोलिस ठाण्यातून हे जवान निघाले होते. मात्र पोलीस ठाण्यापासून चार कि.मी.अंतरावर दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांनी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास हा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर हल्ला केला. त्यावेळी नक्षलवाद्यांनी सुरुंगाचे स्फोट व गोळीबार केला. युध्दासारखीच स्थिती तिकडे निर्माण झाली होती. तीन तास ही धुमश्‍च्‌रक्री सुरु होती. नक्षलवाद्यांच्या सशस्त्र चकमकी काही नवीन नाहीत. आजपर्यंत त्या सतत लहान-मोठ्या प्रमाणात सुरु आहेतच. परंतु मोठा हल्ला झाला व जास्त माणसे मारली गेली की त्याची बातमी होते अशी स्थिती आहे. गेल्या वर्षी याच भागात खरे तर मोठा हल्ला नक्षलवाद्यांनी केला होता आणि त्यानंतरही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. असे असूनही ही सुरक्षा व्यवस्था नक्षलवाध्यांनी भेदून हा हल्ला केला आहे. त्यामुळे पोलिस व सुरक्षा रक्षकांपेक्षा नक्षलवादी आता अत्याधुनिक झाले आहेत. अशा प्रकारे हल्ला होण्याची शक्यता असताना सरकारने जी खबरदारी घ्यावयास पाहिजे होती ती घेण्यात आलेली नाही. सरकारी यंत्रणा या भागात पूर्णत फेल ठरली आहे. या नक्षलवाद्यांना तेथील स्थानिक आदीवासींचा मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळते. त्यामुळेच अशा प्रकारचे हल्ले करणे नक्षलवाद्यांंना शक्य होते. निवडणुका जवळ आल्यावर नक्षलवाद्यांचे हल्ले वाढतात असा सर्वसाधारण समज आहे आणि तो खराही आहे. छत्तीसगढ, झारखंड, ओडीसा, बिहार व महाराष्ट्र या भागातील काही भागात नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे. येथे प्रत्येक निवडणुकीच्या वेळी हल्ला होतो. याची कल्पना असतानाही पोलिस व सरकारी यंत्रणा गाफील कशी राहाते याचे आश्‍चर्य वाटते. याच गाफिल यंत्रणेमुळे कालचे हे मृत्यूचे तांडव झाले. २००९ सालच्या निवडणुकांच्या काळात नक्षलवाद्यांचे एकूण १२५ हल्ले झाले होते आणि त्यात २५ जण मरण पावले होते. मात्र छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केलेले असतानाही मोठ्या प्रमाणावर मतदान झाले होते. चालू वर्षी नक्षलवाद्यांचे एकूण १८८ हल्ले झाले आणि त्यात ५० जण मरण पावले आहेत. या हल्ल्यांचा अभ्यास करताना आपल्याला नक्षलवाद्यांच्या चळवळीचा आपल्याला इतिहास पहावा लागेल. स्वातंत्र्यानंतर आज सहा दशके झाली असतानाही अनेक भागात आपल्याकडे विकासाच्या योजना पोहोचलेल्या नाहीत. नक्षलवाद्यांनी आदिवासींना सशस्त्र बंड करण्यासाठी त्यांना संघटीत जरुर केले. त्यांची ही चळवळ काही विघातक कामासाठी स्थापन जाली नव्हती. देशात सशस्त्र लाल क्रांती व्हावी व लोकांचे भले व्हावे हा त्यांचा उद्देश होता. मात्र गेल्या काही वर्षात या चळवळीने अतिकेती मार्ग पत्करला आहे. सशस्त्र लढ्याच्या नावाखाली या चळवळी खंडाणाबहाद्दरांच्या ताब्यात गेल्या आहेत असे खेदाने नमूद करावे लागते. परंतु मूळची नक्षलवादी चळवळ ही काही समाजविघातक नाही. परंतु सरकारच्या नकर्तेपणामुळे ही चळवळ फोफावली आणि आताचे तिने हिंसक रुप घेतले. याला सरकारच जबाबदार आहे.
-----------------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel