-->
संपादकीय पान मंगळवार दि. २१ जानेवारी २०१४ च्या अंकासाठी चिंतन --
---------------------------------------
वाढते मानसिक रुग्ण आणि त्याबद्दलच्या उदासिनतेची कारणे
--------------------------------------
आपल्याकडे मानसिक रोग म्हटला की लोकांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण होते. मानसिक रोग म्हटला की आपल्याकडे थेट मानसिक रुग्णांचे रुग्णालय डोळ्यापुढे येते. अशा या भीतीपोटी आपल्याकडे या रोगांविषयी अनेक गैरसमजच असतात आणि यातून हे रोग जास्त प्रमाणात बळावतात. यातून बुवाबाजी फैलावते. सरकारने यंदाच्या जनगणणेत मनोरुणांची संख्या तपासण्याचे ठरविले होते. परंतु सरकारचा हा प्रयत्न बर्‍यापैकी निष्फळ ठरला आहे. यामागेही मनोरुग्णांबाबत असलेले गैरसमज व बघण्याची चुकीची दृष्टी कारणीभूत आहे. २०११ साली झालेल्या जनगणणेत प्रत्येक घराक कुणी मनोरुग्ण आहे का असा प्रश्न विचारण्यात आला होता. यात केवळ ७.२ लाख लोकच मनोरुगण असल्याचे आढळले आहे. तर आरोग्य मंत्री गुलाम नबी आझाद यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना देशात अंदाजे सहा ते सात टक्के मानसिक रुग्ण असल्याचे नमूद केले होते. याचा अर्थ आपल्या लोकसंख्येचा विचार करता सुमारे सात कोटी लोक मनोरुग्ण असले पाहिजेत. मात्र जनगणणेतील नोंदीनुसार आपल्याकडे केवळ ७.२ लाख लोकच मनोरुग्ण आहेत. याचा अर्थ आरोग्यमंत्री सांगत असलेला आकडा व प्रत्यक्षात जनगणणेत मिळालेला आकडा यात फरा मोठी तफावत आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की लोकांनी आपल्या घरातील मनोरुग्णांची माहिती देताना लपविली आहे. अर्थातच ही माहिती जाणूनबुजून न करता मुद्दामहून करण्यात आलेली आहे. यामागचे महत्वाचे कारण हे वर म्हटल्याप्रमाणे लोकांमध्ये असलेला अंधविश्वास किंवा या रोगांबद्दलची भीती असाच आहे. देशाने आखलेल्या नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्रॅमनुसार, याबाबत असलेल्या समजुती फुसून काढण्यासाठी यात मानसशास्त्रज्ञ, मानसिक विषयी सल्लागार, सामाजिक काम करणारे लोक व मनोरुग्णांची हॉस्पिटल्स मोठ्या संख्येने असण्याची गरज आहे. कारण एका पाहाणीनुसार, जगात प्रत्येक देशात सुमारे सरासरी तीन टक्के लोक हे मनोरुग्ण असतात. आपल्याकडे हे प्रमाण दुपट्टीहून जास्त आहे. त्याचबरोबर अतिमद्यपान, मादकपदार्थ सेवन करणारे तसेच मनोरुग्णांचे अल्प प्रमाण असलेले लोक हे सरासरी तीस टक्क्‌याने आढळतात. आपल्याकडील मनोरुग्णांच्या संख्येबाबत मतभेद असले तरीही सध्या जी संख्या आहे त्यापेक्षा नक्कीच जास्त आहे. त्यातुलनेत आपल्याकडे मनोरुग्णावर उपचार करणार्‍या डॉक्टरांची संख्या फार कमी आहे. आज देशाला मनोरुग्णांच्या डॉक्टरांची ११५०० एवढी गरज आहे. तर फक्त आपल्याकडे फक्त ३८०० डॉक्टर उपलब्ध आहेत. मानसशास्त्रज्ञ आपल्याला १७२५० पाहिज आहेत तर केवळ ८९८ एवढ्याच संख्येने आहेत. या क्षेत्रातील नसेर्स तीन हजार पाहिजे आहेत तर केवळ १५०० उपलब्ध आहेत. आपल्याकडे मानसिक रुग्णांची संख्या वाढलेली आहे आणि झपाट्याने कमी करण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. एक तर याबाबत लोकांमध्ये जनजागृती होण्याची आवश्यकता आहे. यासंबंधी लोकांच्या जुन्या समजुती आहेत त्या दूर केल्या गेल्या पाहिजेत. यातून लोकांच्या मनातील भीती दूर होईल व लोक उपचार घेण्यासाठी पुढे येतील. अन्य रोगांप्रमाणेच हे रोग आहेत आणि यातून माणूस बरा होऊ शकतो हे लोकांना पटवून देण्याची आवश्यकता आहे. मुलांमध्ये जे अनेक डिसअर्डर असतात याविषयी पूर्वी आपल्याकडे विशेष माहिती नव्हती. परंतु तारे जमीन पर हा चित्रपट आल्यावर मुलांच्या या प्रश्नांविषयी लोकांमध्ये जनजागृती झाली. मानसिक रुग्णांच्या बाबतीतही असेच व्हायला पाहिजे.
-----------------------------------

0 Response to " "

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel