-->
सूत्रबद्ध अर्थ व्यवस्थापनाचे गाइड

सूत्रबद्ध अर्थ व्यवस्थापनाचे गाइड

सूत्रबद्ध अर्थ व्यवस्थापनाचे गाइड

  प्रसाद केरकर  (19/02/12) BOOK REVIEW
सर्वसाधारणपणे ‘स्ट्रॅटेजिक’ म्हणजेच सूत्रबद्ध विचार करणा-या वरिष्ठ कॉर्पोरेट अधिका-यांना व उद्योजकांना अर्थविषयक सल्ला आणि विचारांसाठी आपल्या वित्तीय व्यवस्थापकांवर विसंबून राहावे लागते. कारण ते ‘स्ट्रॅटेजिक’ विचार करण्यामध्ये कमी पडतात. म्हणजे एखाद्या ‘स्ट्रॅटेजी’चे वित्तीय विश्लेषण व वित्तीय व्यवस्थापनाबाबतच्या कल्पक ‘स्ट्रॅटेजीज’ या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. या दोन्ही बाजू नव्या कल्पनांच्या आधारे मांडणारे ‘स्ट्रॅटेजिक फायनान्शियल मॅनेजमेंट’ हे डॉ. गिरीश जाखोटियांचे तब्बल 630 पानांचे पुस्तक दिल्लीच्या विकास पब्लिशिंग हाऊसतर्फे लवकरच (24 फेब्रुवारी रोजी) मुंबईत प्रकाशित होत आहे. 15 अध्याय, दोनशे आवृत्त्या व 15 कॉर्पोरेट प्रकरणे या पुस्तकात समाविष्ट आहेत. या पुस्तकातील नव्या ‘मॉडेलिंग’(संरचना)चे पेटंटही डॉ. जाखोटिया मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

या विषयावर जगभरात अगदी बोटावर मोजता येतील एवढीच पुस्तके उपलब्ध आहेत. त्या दृष्टीने हे पुस्तक तीन कारणांसाठी महत्त्वाचे ठरते. नव्या कल्पना, आकर्षक-कल्पक आवृत्त्या व पंधरा केस-स्टडीज. प्रत्येक अध्यायावर आधारित एक केस-स्टडी उपलब्ध केल्याने ‘थिअरी’ व ‘प्रॅक्टिकल’ची उत्तम सांगड वाचकाला घालता येते. गेल्या 27 वर्षांच्या प्रदीर्घ कन्सल्टिंग व अध्यापनाच्या आधारे डॉ. जाखोटियांनी हे पुस्तक लिहिलेले असल्याने वित्त व स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटच्या क्षेत्रात ते मैलाचा दगड ठरावे. कॉर्पोरेट जगतातील सहा दिग्गजांनी या पुस्तकाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, ती पुस्तकाच्या मलपृष्ठावर छापण्यात आली आहे. या प्रतिक्रियांमधूनही पुस्तकाचे वेगळेपण लक्षात येण्यास मदत होते.

स्टॅÑटेजी व फायनान्समधील अन्योन्य संबंध पहिल्या दोन भागांमध्ये मांडला आहे. नंतर तीन भागांमध्ये कंपनीतील वित्तीय, कल्पक अशी ‘बिझनेस मॉडेल’ची मांडणी विविध उदाहरणांमधून स्पष्ट केली आहे. एका भागात ‘स्ट्रॅटेजिक सॅलरी मॅनेजमेंट’ व दूरगामी ‘मानवी’ भांडवलाची उपलब्धता याबाबतची कल्पक उदाहरणे व विश्लेषण अत्यंत समर्पकरीत्या ‘वित्तीय मॉडेल्स’च्या माध्यमातून मांडण्यात आले आहे.

या पुस्तकातील ‘बिझनेस रिस्ट्रक्चरिंग’वरील चर्चा खूप लक्षवेधी झालेली आहे. दुसºया एका भागात ‘गुंतवणुकीचे व्यूहात्मक नियोजन’ आणि धोक्याच्या व्यवस्थापनासाठी ‘डेरिव्हेटिव्हज’चा स्ट्रॅटेजिक वापर याबाबतीतही उत्तम विश्लेषण मांडले गेले आहे. विविध प्रकारच्या प्रोजेक्ट्ससाठी विविध कल्पक वित्तीय उभारणी कशी करावी, हे उत्तमरीत्या चर्चिले गेले आहे. कंपनीतील अंतर्गत ‘खर्च नियंत्रण पद्धती’ कशी चौफेर असावी या बाबतीतली सोदाहरण मांडणी व त्याच्याशी संबंधित आकृत्यांचा व उदाहरणांचा वापर खूप सुंदररीत्या केलेला आहे. या पुस्तकातील शेवटच्या अध्यायाने ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्स’ व त्यासंबंधी विदेशी-देशी विचार खूप विस्ताराने मांडण्यात आले आहेत. कंपनीचे ‘व्हॅल्युएशन’ व त्यामधील ब्रॅण्ड्स आणि कर्मचाºयांचा वाटा लेखकाने स्वत:च्या अनुभवावर आधारित मांडला असल्याने हा भाग खूपच लक्षवेधी झाला आहे. स्ट्रॅटेजी व फायनान्स यांची सांगड ज्याला घालायची आहे, त्या प्रत्येकाने हे पुस्तक जवळ बाळगायला हवे. पुस्तकातील पंधरा केसेस वाचताना लेखकाची लेखनशैली विशेषत्वाने जाणवते. अर्थात मराठी भाषेतील वाचकांना डॉ. गिरीश जाखोटिया हे नाव सुपरिचित आहे. ‘एका मारवाड्याची गोष्ट’, ‘वंश’, ‘कृष्णनीती’, ‘यशस्वी उद्योगाचे 36 मंत्र’, ‘चला बदल घडवूया’ इ. पुस्तके लिहिणा-या जाखोटियांनी इंग्रजीतही सहा पुस्तके लिहिली आहेत. ‘स्ट्रॅटेजिक फायनान्शियल मॅनेजमेंट’ पुस्तकाद्वारे त्यांच्या संशोधक वृत्तीची व वित्तविषयक कल्पकतेची साक्ष पटते.

’    स्ट्रॅटेजिक फायनान्शियल मॅनेजमेंट

’    लेखक- डॉ. गिरीश जाखोटिया

’    प्रकाशक- विकास पब्लिशिंग हाऊस

’    पृष्ठे- 630, मूल्य- 600रु.

prasadkerkar73@gmail.com


0 Response to "सूत्रबद्ध अर्थ व्यवस्थापनाचे गाइड"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel