
रिव्हर्स कॅश, कॅरी आर्बिट्राजची संधी केव्हा ?
रिव्हर्स कॅश, कॅरी आर्बिट्राजची संधी केव्हा ? |
Published on 20 Feb-2012 ARTHAPRAVA |
प्रसाद केरकर , मुंबई |
ही संधी तेव्हा प्राप्त होते, जेव्हा विशिष्ट कमोडिटीची वायदा किंमत ही त्यासमयीची तिची स्पॉट किंमत आणि मुदतपूर्तीच्या काळापर्यंतच्या कॉस्ट ऑफ कॅरी मूल्यापेक्षा खूपच कमी असते. रोलिंग ओव्हर हेज पोझिशन म्हणजे काय? एका फ्यूचर्स कॉन्ट्रॅक्टमधील सौद्याची स्थिती बंद करून पुढची मुदतपूर्ती असलेल्या दुसर्या कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रवेश करणे याला रोलिंग ओव्हर हेज पोझिशन म्हटले जाते. ‘कॅलेंडर स्प्रेड’ म्हणजे काय? वेगवेगळ्या मुदतपूर्ती काळ असलेल्या एकाच कमोडिटीच्या दोन स्वतंत्र कॉन्ट्रॅक्ट्समध्ये अगदी विरोधाभासी स्थिती घेणे याला ‘कॅलेंडर स्प्रेड’ म्हटले जाते. याला ‘इंट्रा-कमोडिटी स्प्रेड’ही म्हणता येईल. ‘प्राइस व्होलॅटिलिटी’ अर्थात किंमत चंचलता ही कमोडिटीच्या किमतीतील वाढ वा उतरंड असते. कोणत्याही मालमत्तेतील, गुंतवणुकीतील अनिश्चिततेच्या जोखमेचे परिणाम हे या किंमत चंचलेतूनच ठरते. ही किंमत चंचलता का निर्माण होते? एखाद्या कमोडिटीला असणार्या मागणी व पुरवठय़ाच्या परिमाणानुसार ही किंमत चंचलता निर्माण होत असते. मागणी-पुरवठय़ाचे हे गणित सामाजिक, आर्थिक, राजकीय, नैसर्गिक आणि मानव-निर्मित घटना-घटकांनुसार बदलत असते. जोखीम (रिस्क) म्हणजे काय? कमोडिटीच्या किमतीतील वाढ-घटीमुळे तिच्यापासून मिळणार्या परताव्याबाबत निर्माण झालेली अनिश्चितता म्हणजे जोखीम होय. विशिष्ट कमोडिटीतील अंगभूत किंमत जोखीम विविध वित्तीय मार्गांनी नियंत्रित करण्याला किंमत जोखीम व्यवस्थापन (प्राइम रिस्क मॅनेजमेंट) म्हटले जाते. किंमत जोखीम व्यवस्थापनाची आवश्यकता का असते? कोणत्याही कॅमोडिटीच्या किंमत चंचलतेमुळे तिच्या वापरकर्ते आणि पुरवठादारांमध्ये आर्थिक जोखमेचा धोका निर्माण होतो, ज्याचा अर्थात त्यांचा नफा क्षमतेवर परिणाम संभवत असतो. किंमत जोखीम व्यवस्थापनामुळे कच्चा माल व तयार उत्पादनाच्या किमतीतील प्रतिकूल हालचालींमुळे संभवणार्या नफा क्षमतेवरील प्रभावाला नियंत्रित राखले जाते. कमोडिटी मार्केटसंदर्भात ‘व्याजदर जोखीम’ याचा अर्थ काय? व्याजदरामध्ये झालेल्या घटीने कमोडिटीच्या कॉस्ट ऑफ कॅरी मूल्यावर प्रतिकूल परिणाम साधला जातो. याला ‘इंटरेस्ट रेट रिस्क-व्याज दर जोखीम’ म्हटले जाते. कमोडिटी मार्केटसंदर्भात ‘क्रेडिट किंवा काउंटर पार्टी डिफॉल्ट रिस्क’ कशाला म्हटले जाते? कमोडिटीच्या डिलिव्हरी वा पेमेंटसंदर्भात समोरच्या पक्षाकडून कॉन्ट्रॅक्ट्समध्ये विहित कलमांचे पालन न केले गेल्यास क्रेडिट रिस्क- पत जोखीम निर्माण होते. पोर्टफोलिओ अथवा भागभांडारात विविधता आणल्याने जोखीम कशी कमी होते? विविध प्रकारच्या वित्तीय साधनांमध्ये आपली गुंतवणूक विभागणे, विशेषत: परस्परांशी फारशे निगडित नसलेल्या साधनांमध्ये गुंतवणूक केल्याने एकाच प्रकारच्या गुंतवणुकीतील अनिश्चिततेची जोखीम राहत नाही आणि एकंदर गुंतवणूक भागभांडारातील जोखीम विभागली जाते. कमोडिटी एक्स्चेंजकडून अवलंबल्या जाणार्या वेगवेगळ्या जोखीम व्यवस्थापनाच्या उपाययोजना कोणत्या? प्रत्येक सदस्याला त्याच्या स्व-मालमत्तेची (नेट वर्द) र्मयादा, माजिर्न लिमिट्स ठरवून देऊन, किंमत सर्किट फिल्टर्स टाकून, एका ऑर्डरच्या आकारमानाला र्मयादा घालू आणि मार्क-टू-मार्केट तोट्यावर ऑनलाइन देखरेख ठेवून कमोडिटी एक्स्चेंजवर जोखीम व्यवस्थापनाची खातरजमा केली जाते. prasadkerkar73@gmail.com |
0 Response to "रिव्हर्स कॅश, कॅरी आर्बिट्राजची संधी केव्हा ?"
टिप्पणी पोस्ट करा