-->
फेसबुकला विस्तारासाठी हवे भारतीय क्षितिज

फेसबुकला विस्तारासाठी हवे भारतीय क्षितिज

फेसबुकला विस्तारासाठी हवे भारतीय क्षितिज 
Published on 15 Feb-2012 BUSINESS PAGE NEWS
प्रसाद केरकर । मुंबई
अमेरिकेत लवकरच खुली समभाग विक्री करण्यासाठी सज्ज होत असलेल्या सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने भविष्यात विस्तार करण्यासाठी भारतीय क्षितिजाला गवसणी घालण्याची योजना आखली आहे. या विस्तार योजनांनुसार भारताची सर्वात मोठी तरुणांची बाजारपेठ काबीज केली तरच भविष्यात कंपनी आपल्या विस्तार योजनांचेटार्गेट पूर्ण करू शकते. 
फेसबुकने भारताच्या खालोखाल चीन, ब्राझील, र्जमनी, रशिया व जपान या देशांतील जनतेला, प्रामुख्याने तरुणांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे ठरवले आहे. सध्या या देशात फेसबुकचे ग्राहक तुलनेने कमी आहेत. त्यामुळे हे मार्केट काबीज करण्यासाठी फेसबुकने आपली योजना आखली आहे. खुल्या समभाग विक्रीच्या मान्यतेसाठी अमेरिकन सिक्युरिटीज एक्स्चेंजला केलेल्या अर्जात याचा उल्लेख करण्यात आला आहे. भारताची अवाढव्य असलेली लोकसंख्या तसेच येथील मध्यमवर्गीयांची मोठी असलेली लोकसंख्या लक्षात घेता भारतात फेसबुकच्या विस्ताराला मोठा वाव आहे. सध्या जगातील विविध 70 भाषांत फेसबुकवर मेसेज पाठविले जातात. तर दररोज 48 कोटी लोक फेसबुकसाठी लॉग ईन करीत असतात. भारतातील बाजारपेठ काबीज करण्यासाठी फेसबुकने हैदराबादमध्ये आपले कार्यालय सुरू केले आहे. मात्र, त्याविषयी अधिक माहिती देण्यास नकार देण्यात आला. मुंबईत सर्वात जास्त फेसबुकचे सदस्य आहेत. त्याखालोखाल दिल्ली, बंगलोर, चेन्नई व पुणे या शहरांचा क्रमांक लागतो. फेसबुकच्या जगातील एकूण ग्राहकात भारताचा क्रमांक दुसरा लागत असल्याने भारतातील जाहिरातदारांनी फेसबुकचा वापर मोठय़ा प्रमाणावर करण्यास सुरुवात केली. याचा त्यांचा चांगला प्रतिसाद मिळू लागल्याने फेसबुकचे भारतातील जाहिरातींचे उत्पन्न चांगलेच वाढले आहे. फेसबुकने भारतातील जाहिरातींचे उत्पन्न किती आहे याची आकडेवारी प्रसिद्ध केली नसली तरी प्रतिक्लिक 24 रुपये आकारले जातात. अमेरिकेत प्रतिक्लिक हा दर सुमारे 55 रुपये म्हणजे भारतापेक्षा दुपटीने जास्त आहे. टाटा डोकोमो या कंपनीने फेसबुकचा वापर करून आपले उत्पादन सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. टाटा डोकोमो हा फेसबुकवरचा सर्वाधिक फॅन असलेला ब्रँड ठरला आहे. त्यांचे सुमारे 25 लाख फॅन्स आहेत. त्याखालोखाल व्होडाफोन्सच्या झू झूचे 22 लाख फॅन्स आहेत. 

0 Response to "फेसबुकला विस्तारासाठी हवे भारतीय क्षितिज"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel