-->
कमोडिटी फ्यूचर्सच्या संदर्भात ‘लिव्हरेज’चा अर्थ काय?

कमोडिटी फ्यूचर्सच्या संदर्भात ‘लिव्हरेज’चा अर्थ काय?

कमोडिटी फ्यूचर्सच्या संदर्भात ‘लिव्हरेज’चा अर्थ काय?

 प्रसाद केरकर, मुंबई (26/02/12) ARTHPRAVA

कमोडिटी फ्यूचर्स कॉन्ट्रॅक्टचे बाजारमूल्य निश्चित करण्यासाठी मार्जिनचा गुणक म्हणून काढली जाणारी ही संख्या आहे. कमोडिटीच्या वायदा सौद्यांमध्ये मार्जिन ही नेहमीच अधिक ठेवावी लागते, जी साधारणत: कॉन्ट्रॅक्ट मूल्याच्या 4 ते 10 टक्केही असते. त्यामुळे खरेदीयोग्य कॉन्ट्रॅक्टचे बाजारमूल्य हे मार्जिन रकमेच्या 10 ते 25 पट असले पाहिजे. 

‘बाइंग हेज’ आणि ‘सेलिंग हेज’ यांचा अर्थ काय? - बाइंग हेज म्हणजे कॅश मार्केटमध्ये शॉर्ट पोझिशन ‘हेज’ करून अर्थात अडकवून ठेवून फ्यूचर्स कॉन्ट्रॅक्टची खरेदी करणे होय. त्या उलट कॅश मार्केटमध्ये लाँग पोझिशन हेच करून फ्यूचर्स कॉन्ट्रॅक्टची विक्री करणे याला सेलिंग हेज म्हटले जाते. 

‘हेज रेशो’ काय आहे? - हेज रेशो म्हणजे कॅश मार्केटमध्ये असलेल्या मालमत्तेला ‘हेज’ (संरक्षक कुंपण घालता येईल) करता येईल यासाठी किती फ्यूचर्स कॉन्ट्रॅक्ट्सची खरेदी वा विक्री करायला हवी हे निश्चित करणारे परिमाण होय. कॅश किमतीतील फेरबदल आणि वायदा (फ्यूचर्स) किमतीतील फेरबदल आणि कॅश किमतीतील फेरबदलाचा प्रमाणित ºहास (स्टँडर्ड डिव्हिएशन) आणि वायदा किमतीतील फेरबदलाचा प्रमाणित -हास यांच्यातील परस्परसंबंध आणि गुणाकार करून हे प्रमाण काढले जाते. 

‘हेज रेशो’चे महत्त्व काय? -  हे खूप महत्त्वाचे आहे. कारण स्पॉट (कॅश) किमती आणि वायदा किमतीतील हालचाल सारख्याच प्रमाणात होत नसते. या रेशोचा वापर करून आपल्याला स्पॉट आणि वायदा किमतीतील तफावतीपासून उद्भवणा-या जोखमेचे अर्थातच बेसिस रिस्कचे संरक्षण करता येते. 

रिस्क/रिटर्न ट्रेड ऑफ कशाला म्हटले जाते? - रिस्क/रिटर्न ट्रेड ऑफचा संबंध कोणाही गुंतवणूकदाराने त्याच्या गुंतवणूक उद्देशाशी निगडित निश्चित केलेल्या जोखीम आणि परतावा याच्याशी असतो. 

जोखमेचे व्यापक वर्गीकरण कसे केले गेले आहे? - जोखमेचे ढोबळमानाने वर्गीकरण सिस्टिमॅटिक रिस्क अणि नॉन-सिस्टिमॅटिक रिस्क असे केले जाते. सिस्टिमॅटिक अर्थात नियोजनात्मक जोखमेला ‘नॉन-डायव्हर्सिफिएबल’ किंवा अटळ जोखीम अथवा ‘मार्केट रिस्क’ही म्हटले जाते, जी संपूर्ण बाजारासाठी एकसारखीच असते. चलनवाढ (इन्फ्लेशन), सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर, व्याजदर, मंदी वगैरे घटक सिस्टिमॅटिक रिस्कला कारणीभूत ठरतात. ही जोखीम आपल्या भागभांडारात फेरबदल करून टाळता येत नाही. दुस-या बाजूला नॉन-सिस्टिमॅटिक रिस्क, जिला डायव्हर्सिफिएबल अर्थात टाळता येण्याजोगी जोखीमही म्हणता येईल, ती विशिष्ट व्यक्ती अथवा कमोडिटीच्या समूहाशी निगडित असते.   जोखमेच्या अन्य वर्गांमध्ये क्रेडिट डिफॉल्ट रिस्क, विशिष्ट देशाशी निगडित जोखीम - कंट्री रिस्क, विदेशी चलन जोखीम, व्याजदर जोखीम, कायदेशीर आणि राजकीय जोखीम यांचा समावेश होतो.

0 Response to "कमोडिटी फ्यूचर्सच्या संदर्भात ‘लिव्हरेज’चा अर्थ काय?"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel