-->
टेलिकॉम टॉवर्स

टेलिकॉम टॉवर्स

आता हायड्रोजनवर चालणारे पर्यावरणप्रिय
टेलिकॉम टॉवर्स 
 Published on 25 Feb-2012 KIMAYA
प्रसाद केरकर, मुंबई
आ पल्याकडे मोबाइलच्या टॉवर्सचे तंत्रज्ञान म्हणावे इतके अत्याधुनिक नसल्याने हे टॉवर्स पर्यावरणप्रेमी नाहीत. एक तर या टॉवर्सच्या देखभालीचा खर्च मोठा असतो, त्याशिवाय यातून कार्बन उत्सर्जन होत असल्याने पर्यावरणाला धोका होण्याची भीती व्यक्त होऊ लागली होती. मात्र, आता या सर्व अडचणींवर मात करीत आयडिया सेल्युलरने पर्यावरणप्रिय मोबाइल टॉवर्स तयार केले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी हे सर्व तंत्रज्ञान देशांतर्गत विकसित केल्याने भविष्यात हे तंत्रज्ञान आपल्या देशातून विदेशातही निर्यात होऊ शकते. 
आदित्य विक्रम बिर्ला समूहाच्या असलेल्या आयडिया सेल्युलर या कंपनीने देशातील पहिला अशा प्रकारचा टॉवर मध्य प्रदेशातील नागडा येथे तयार केला आहे. हा टॉवर क्लोरो अल्कली या उपउत्पादनातून तयार केलेल्या हायड्रोजनवर चालतो. यापासून वीजनिर्मिती करून हा टॉवर चालवला जातो, अन्यथा या टॉवरसाठी खास वीज आणावी लागत होती आणि वीज खंडित असेल त्या वेळी डिझेलवर हा टॉवर चालत असे. आता मात्र हायड्रोजनवर टॉवर चालत असल्याने त्याला वीजही लागत नाही किंवा डिझेलचीही गरज भासत नाही. त्याहून महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यातून कार्बन उत्सर्जन होत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे टॉवर्स हे पर्यावरणप्रिय ठरणार आहेत. आदित्य विक्रम बिर्ला समूहाची कंपनी ग्रासीमचा प्रकल्प मध्य प्रदेशात असल्याने तेथील उपउत्पादनापासून हायड्रोजन तयार करण्याची योजना आखण्यात आली. कंपनीने हे तंत्रज्ञान स्वत:हून शोधले आहे. सध्या बिर्ला समूहाने प्रायोगिक तत्त्वावर एक टॉवर उभारला आहे. भविष्यात ही संख्या वाढवत नेता येईल, असे समूहातर्फे सांगण्यात आले. सध्या देशात सुमारे 2 लाख मोबाइल टॉवर्स आहेत. पुढील पाच वर्षांत ही संख्या साडेचार लाखांच्या घरात जाईल. पूर्वी प्रत्येक कंपनीनिहाय टॉवर्स असायचे. आता मात्र ही पद्धती बदलून एकाच टॉवरवर अनेक कंपन्यांची सेवा देण्याची व्यवस्था करण्यात येते. त्यामुळे टॉवरची संख्या कमी होऊ शकते. मोबाइल टॉवरमुळे देशात सध्या 5.3 दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन होते, तर दरवर्षी या सर्व टॉवर्ससाठी सुमारे 6,400 कोटी रुपयांचे डिझेल लागते. ग्रामीण भागातले बहुतांशी टॉवर हे अंतर्गत भागात असल्याने त्यांना सुरक्षा पुरवण्याचा एक खर्च असतो. मोबाइल टॉवरना पर्यावरणप्रिय बनवण्यासाठी तसेच त्यांचा खर्च कमी व्हावा यासाठी संशोधन करण्याची मोठी गरज होती. त्यादृष्टीने आयडिया सेल्युलर कंपनीने हायड्रोजनवर मोबाइल टॉवर सुरू करून एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. या क्षेत्रात विदेशातही गेले काही वर्षे संशोधन सुरू आहे, परंतु भारतीयांनी या संशोधनात बाजी मारली आहे. 
prasadkerkar73@gmail. 

0 Response to "टेलिकॉम टॉवर्स"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel